२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही!
पुस्तकदिना निमित्त काही पुस्तक सुचवतो जी आपल्याला दररोज नाही परंतु फावल्या वेळात म्हणजे कधी एसटीच्या प्रवासात, कधी रेल्वेच्या प्रवासात वाचायला नक्की आवडतील.
तस पाहायला गेल्यावर प्रत्येक पुस्तकाचे भावविश्व वेगळे असते, प्रत्येकाचा सार वेगळा असतो, हे वाचल्याशिवाय समजणार नाही, मराठी शाळेत बालभारतीच्या पुस्तकातील "दमडी, झोम्बी, स्माशानातील सोन, विसरभोळा गोकुळ, अंतू बर्वा या अशा धड्यात आपण कित्येकदा हरवून गेलो होतो अजून त्या आठवणी नाव घेताच ताज्या होतात. "एक गोष्ट मात्र नक्की नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी पुस्तकांसारखा मित्र नाही". त्यामुळे जेवढ्या चांगल्या पुस्तकांच्या सहवासात राहताल तेवढेच वैचारिक दृष्ट्या प्रबळ होताल.
#जागतिक_पुस्तक_दिन
Post a Comment