Facebook SDK


नव्वदच्या पिढीने सर्व बदल पाहिले अस म्हंटलेल वावग ठरणार नाही, खरच आमचा काळ सुवर्णमय होता... ह्या दशकात जन्मलेल्या प्रत्येकाला याचा अभिमान नक्कीच असेल, मराठी शाळेत असताना खाकी हाफ चड्डी आणि सफेद हाफ शर्ट हाच बुधवार, रविवार सोडला तर आमचा ड्रेसकोड, मुख्याध्यापक बदलले तर कदाचित गांधी टोपी डोक्यावर चढत - उतरत असे, ग्लासभर केसरी दूध व अस्सल सुगडी खाल्लेली पोर आम्हीच, शाळेत असताना अभ्यास नित्यनेमाने करावाच लागे नाहीतर आमच्या नाजूक हातावर सरांच्या सपासप पडणाऱ्या छड्या तो करायला भाग पाडे, आता खरच तो मार योग्य वयात बसला त्यात आईबाप सुद्धा मुभा देत होते ती गोष्ट वेगळी कारण शिस्त ही महत्वाची. शाळेत असतानाच आम्हाला प्रार्थना तोंडपाठ होत्या जस की इतनी शक्ती हमे देना दाता, उठा राष्ट्रविर हो अश्या कविता, गीत.

शाळेत असताना पकडा-पकडी, लंगडी, कबड्डी, साखळी, रुमाल-पाणी, डोंगर की ऊन, कागदाचा- कापडांचा लगदा करून त्यात चार-पाच बारीक खडे टाकायचे व त्याला सुटुळीने करकचून बांधून एका मेकाला बेदम मारायचो त्याला आम्ही बदका बदकी म्हणत, काय दिवस होते ते !!! चित्र डोळ्या समोरून अलगद निघून जाते, त्यात कधी कधी लंगोरी, लोखंडी सळी घेऊन रवा रवी, सूर पारंब्या, विटी दांडू त्यात पण भरपूर प्रकार आब- दुब असो किंवा टिबुनीचा प्रकार, गोट्या-हाडक्या, मामाचे पत्र हरवले ते अजून सापडले नाही वाईट वाटत पण आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे तर लागणारच ! कदाचित या सर्व खेळा मुळेच आमच्या शरीराची वाढ झपाट्याने झाली आताच्या पंधरावी करणारा मुलगा आणि त्यावेळेस सातवीत असणारा कदाचित एकाच बांध्याचे असतील, आताच्या मुलांची बौध्दिक पातळी जास्त असेल पण त्यावेळेस जेवढे आम्ही सुखी होते तेवढे हे नाहीत....

शाळेत असताना मधल्या सुट्टीत जेवण झाले की साधारण 10-16 मिनिट जादाचे मिळायचे त्यात आम्ही कुठे चिंचा, आंबे, बोर, बिबवी, आवळा, भुईमूग, तवसी, काकड्या यावर ताव मारून शाळेत हजर व्हायचो, शेतातील चोरीला गेले म्हणून कोणी शेतकरी बोंबा मारीत नव्हत, लहान पोरांना कधी हटकायचे नाही हाच त्यांचा जातीधर्म आणि हाच माझ्या माय-बाप शेतकऱ्यांचा चांगुलपणा !!! शाळेची घंटा वाजली रे वाजली की सर व मॅडम सुद्धा एसटी पकडण्यासाठी धडपड करत व आम्ही घरी जायला घरी जाऊन कायतरी प्रतीक्षा लोणकर लीड रोलमध्ये असलेली दामिनी मालिका बघण्याचा आतुरता असायची, त्यावेळेस आम्ही ह्या मालिका आवर्जून बघायचो, कारण त्यावेळेस 15 इंच, 17 इंचचा videocon, BPL चे (black and white) कृष्णवर्णीय TV  संच सुद्धा गावात दुर्मिळच असायचे त्यात चालती बोलती चित्र म्हंटल तर त्यांना पाहण्याचा, त्यांच्या दुनियेत जगण्याचा मोह कोणाला आवरेल ?

शुक्रवार म्हंटल की रात्री 09.30 ला हिंदी चित्रपट, पूर्ण गाव जागायचे कधी कधी आम्ही मित्रांच्या घरी, मित्र आमच्या घरी चित्रपट पाहण्याला गर्दी करायचो, रात्री 12.30 ते 01.00 वाजता तो कंटाळवाण्या लक्स, हमाम, बबुलच्या लांबलचक जाहिराती करून चित्रपट सम्पून जायचा मात्र गावातील भुताच्या भयानक कहाण्या त्यावेळी मन गट्ट करून ऐकल्या होत्या, अजून सुद्धा गावी एकट फिरायचे म्हंटल तरी अंगावर काटा येतो, त्यात लहानपणी हाक मारी म्हणून एक बाई असायची ती आपल्याला आपल्या नावाने हाक मारायची आपण तिला प्रतिसाद दिला की आपण मरून जायचो अस काहीतरी कथा होती ती, म्हणून सर्व घरांच्या दारावर चुन्याने cross ❌✖️❌ अश्या खुणा मारल्या जात, कमीतकमी सर्व घरांच्या दारावर ह्या खुणा आढळत, त्यात घरी एकट जायच जिवावर यायच मंग पळत पळत मागे पुढे न बघता थेट आपल्या घराच्या दरवाज्यावर जोरात ठोके मारायचे आतुन आवाज आला की सर्व भीती नाहीशी व्हायची मंग आपण कोणाला घाबरत नसल्याचा आव आणायचा !!! चित्रपटाचा विचार करत शनिवारी लवकर उठायच्या नादात झोपी जायचे, शनिवारी लवकर उठून जवळपास मित्राचा गुरांचा गोठा शोधून प्लास्टिक पिशवीमध्ये गरमागरम शेण स्वतः भरून शाळेत न्यायचे, आमच्या सरांचा दर शनिवारचा दंडक असायचा की, शनिवारी शाळा शेणाने सारवून घेतली पाहिजे त्यामुळे शाळेत संसर्गजन्य रोग यायला घाबरायचे.....

क्रमशः
#गावाकडचा_आशिक

.*******************


It would not be a stretch to say that the nineties saw all the changes, indeed our time was golden ... Everyone born in this decade will surely be proud of it.  Maybe Gandhi's hat was coming and going on his head, we were the ones who ate a glass full of saffron milk and authentic sugar, we didn't have to study regularly when we were in school, otherwise he would force us to do it with sticks falling on our delicate hands, now he is really old enough.  It's different because discipline is important.  When we were in school, we used to recite prayers, such as Hame Dena Data, Utha Rashtravir Ho, such poems and songs.


 When I was in school, I used to catch, lame, kabaddi, chain, handkerchief, water, mountain key wool, paper-cloth pulp and put four or five fine stones in it and tie it tightly and beat a mecca to death.  That !!!  The picture goes away in front of the eyes, sometimes with langori, iron rod, semolina ravi, sur parambya, viti dandu, but there are many types of ab-dub or tibuni type, gotya-hadkya, uncle's letter lost  You have to deal with that situation!  Probably due to all these games our body grew rapidly. The boy who is now in his fifteenth year and the boy who is in his seventh year at that time may be of the same age.


 When we had a meal in the middle of school break, we used to get extra 10-16 minutes in which we used to come to school with tamarind, mango, bor, bibvi, amla, groundnut, tawasi, cucumber.  This is their caste religion and this is the goodness of my parents and farmers !!!  When the school bell rang, Sir and Madam were also struggling to catch the ST and we were eager to go home and wait for something to watch the Damini series in the lead role.  (black and white) Black TV sets were also rare in the village.


 On Fridays, he would wake up at 09.30 pm to watch Hindi movies, the whole village. Sometimes we would rush to our friends' houses to watch movies.  I had heard it in my mind, even though I still want to walk alone in the village, there is a thorn in my side. There was a woman who used to call me by her name as a child.  cross ❌✖️❌ Such marks are being made, at least these marks are found on the door of all the houses, in it you have to go home alone, come to life, don't run back and forth, knock directly on the door of your house, there is a sound from inside that all fears are gone  Pretend !!!  We used to go to bed thinking of getting up early on Saturdays thinking of a movie, we used to get up early on Saturdays and find a friend's cattle shed and fill the hot dung in a plastic bag and take it to school, our teacher used to punish us on Saturdays.  ..


 Respectively

 # गावकडचा_आशिक

Post a Comment

Previous Post Next Post