Facebook SDK

सगळ्यात भारी आमचा रविवार असायचा खरच त्याची सर अजूनही कोणत्या दिवसाला देण म्हणजे त्याचा अपमान ठरेल, कारण आमची सकाळ हेमा मालिनीच्या रंगोळीने व्हायची तेवढ्यात पटकन उरकून कृष्णमालिका बघत बघत दुपार कधी झालेली समजत सुद्धा नव्हती, मंग 12 वाजता आमचा लाडका शक्तीमान सुरू व्हायचा खरच मुकेश खन्नाचे आभार की त्याने आमच्या बालवयात एक चांगला सुपरहिरो दाखवला आताच्या avengers ने किती सुद्धा पैसा कमवू रेकॉर्ड वर रेकॉर्ड करू पण शक्तीमानच्या एका भागाची सर त्याला नाही, त्यांच्या खलनायक टेनोस पेक्षा आमचा अंधेरा कायम रहे म्हणणारा तमराज किलबिस खूपच भारी आणि सरस होता, ज्याला आम्ही कधी विसरू शकत नाही न भूतो न भविष्यती असा हा प्रवास !!! माफ कर स्टोनी स्टार्क तुझ्याकडे सगळे सुपर हिरो असतील अगदी कर्णधार अमेरिका, हल्क, thor पण यांच्या पॉवर पेक्षा डॉक्टर जेकॉल याने जोरात ओरडले पॉवर हे वाक्य नेहमी लक्षात राहील, ती गीता विश्वास, कपाला, सुर्यांशी ते विश्वच वेगळे होते... त्यात अलिफ लैला असू नाहीतर चंद्रकांता की कहाणी कदाचित त्यामुळेच हमारी हिंदी अजून सुधारलेली है... त्यात आंखे नावाचा रामानंद सागर निर्मिती असलेला कार्यक्रम रात्री 11 वाजता तरी असला तरी त्यातील कर्नल, हर दयाल किंवा कांगारू, कारलॉस यांची जुगलबंदी पाहायला मज्या यायची...

दुपारचे जेवण झाले की सर्व शेतातील कामे उरकून, त्यावेळी क्रिकेटचा नाद कमी असायचा असच म्हणू कारण बाकी खेळ त्यावर मात करीत होते, 4 वाजले रे वाजले सह्याद्री वाहिनीवर अशी ही बनवाबनवी, धूम धडाका, थरथराट, धडाकेबाज, बिन कामाचा नवरा, आयत्या बिळात नागोबा असे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर एकेकाळी मराठी सृष्टीवर व आमच्या मनावर अधिराज्य गाजवलेले कलाकार आमच्या रविवारचा शेवट गोड करी, हे चित्रपट नित्यनेमाने लागले तरी आम्ही आवर्जून बघायचो, त्यावेळी तात्या विंचू, टकल्या हायवान, कुबड्या, कवट्या हे खलनायक हिरोच्या तोडीस तोड देत असत, कधी नातेवाईकांच्या, मित्रांच्या तिथे असलेल्या रंगीत 21 इंची रंगीत tv वर चित्रपट पाहायला गेलो व रिमोट वर कोणी आवाज वाढव बोलल तरी रिमोट हातात घेतला तरी बाप फील यायचा... जर चुकून कधी हळद रुसली कुंकू हसल, सतीश पुळेकर, विजय कदम व अश्विनी भावे यांचा चित्रपट किंवा माहेरची साडी अलका कुबल यांचे रडकथापट असतील तर आम्ही काढता पाय घेऊन खेळायला किंवा शेतात ऊस किंवा हंगामी पिकांवर तुटून पडायचो...

त्यावेळेस मराठी चित्रपटांची दर्जा काही औरच होता पण आताच्या पिढीला त्या बालक पालक, timepass, boys, टकाटक असल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटांची दर्जा फार खालच्या पातळीवर आणला तुम्हाला काही शिकवायचे असेल तर ज्ञान पुस्तकांतून सुद्धा मिळेल की मंग असला विषय मोठ्या पडद्यावर मांडणे कितपत योग्य अजून आपली संस्कृती याला परवानगी देत नाही अस माझे वैयक्तिक मत... खरच त्यापेक्षा आमचा जी ज्याम ज्यामी भूम करणारा जुनियर जी किंवा नंदू अपना भारीच होत... क्रिकेटच्या सामन्यांविषयी काय बोलणार, कस काय यांच्या प्रेमात पडलो अजून समजल नाही यातून अजून बाहेर पडला आलेले नाही. महमंद अझरुद्दीन, अजय जडेजा, नयन मोंगिया, प्रसाद, कपिल कित्येक नाव समोर येथील पण मारवन अट्टापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन सनथ जयसूर्या व कालूतिरना खेळायला आलिकी भारतीय गोलंदाजी पाहू वाटत नव्हती त्यात रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या ते प्रकरण असो किंवा हेडन, गिलक्रिस्टची पावरप्लेमधील दहशत काही औरच होती....

क्रमशः
#गावाकडचा_आशिक
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा

.
**************************************
Our Sunday used to be the heaviest, but it would be an insult for him to give his head to any other day, because our morning was over with Hema Malini's rangoli and we didn't even know when it was noon. Thank you Mukesh Khanna for starting our darling Shaktiman at 12 noon.  He showed a good superhero in our childhood. No matter how much money the current avengers make on record, but he is not the head of a part of the mighty, Tamraj Kilbis who said that our darkness lasts longer than his villain Tenos  This is a journey without ghosts !!!  I'm sorry Stony Stark, you will have all the superheroes, even the power of Captain America, Hulk, Thor, but Dr. Jacquel shouted louder than the power.  Otherwise, the story of Chandrakanta is probably why our Hindi has improved even more ... Even though it is a Ramanand Sagar production program called Aankhe at 11 pm, it was fun to watch the juggling of Colonel, Har Dayal or Kangaroo, Carlos ...


 After lunch, when all the farm work was done, the sound of cricket was low because the rest of the game was overcoming it.  Berde, Ashok Saraf, Mahesh Kothare, Sachin Pilgaonkar, the artists who once dominated the Marathi world and our minds, made the end of our Sunday sweet. Even though these films were a regular occurrence, we used to watch them regularly. At that time, Tatya Vinchu, Takalya Haiwan, Kubadya  Asat, when I went to see a movie on a 21 inch color TV of relatives and friends and even if someone spoke loudly on the remote, even if I took the remote in my hand, my father would feel ...  If it was Bhave's film or Maher's sari, Alka Kubal's story, we would take it out and play or fall on the cane or seasonal crops in the field ...


 At that time, the quality of Marathi films was different, but for the present generation, those films like Baalak Palak, Timepass, Boys, Takatak brought the quality of Marathi films to a very low level.  My personal opinion is that it doesn't allow ... In fact, our JJ Jamu Bhoom's junior G or Nandu would have been heavier than that ... I don't know what to say about cricket matches, I fell in love with Kas, I still don't get out of it.  Mohammad Azharuddin, Ajay Jadeja, Nayan Mongia, Prasad, Kapil are some of the names in front but Marwan Attapattu-led Sri Lankan Sanath Jayasuriya and Kalutir did not want to see Aliki Indian bowling.  ....


 Respectively

 # गावकडचा_आशिक

 #life_will_not_meet

Post a Comment

Previous Post Next Post