Facebook SDK


त्या पप्पु पेजरच्या पेजर, nokia च्या जाड जुड मोबाईल पासून, रिलांयन्स, tata ते आताच्या oppo, vivo, i phone पर्यन्त बदल पाहिलेली व स्वताला त्यात सामावून घेतलेली ही 90ची पिढी, आमच्या काळात मोबाईलने कुठे श्वास घेण्यास सुरुवात केली होती, मुंबई चौफेर त्यावेळी चौफेर उधळत होता आता त्याच मोबाईलचा बाजार सूरु आहे... त्यावेळेस चायना मोबाईलने बराच बाजार सामावून घेतला होता, दिलवाले, कयामत, दिलजले, सर्फरोश, अंदाज अपना अपना, सिर्फ तुम, अल्ताफ राजा, राजा हिंदुस्थानी, राज, जिगर, तू खिलाडी मै अनाडी अश्या असंख्य चित्रपट व त्यांचा गाण्यांनी आमच्यावर काळजावर कब्जाच केला होता, उदित नारायण, कुमार सानु, अभिजित, अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार गाणारा सोनू निगम, साधना सरगम, अलका यादनिक, अनुराधा, दक्षिणात्य हरिहरन, के बाल सुब्रमण्यम असे कित्येक नाव व त्यांची अफलातून गाणी अजूनही तोंडावर नकळत गुणगुणत असतात. त्याकाळी ही गाणी आम्ही मिर्चीवर (साधारण चष्मा ठेवतो तस नाजूक बॉक्स सारखा रेडियो) त्यावर ऐकत असू, त्यात मंग थोडे पैसे जमवून एखादा soni किंवा panasonic चा वॉकमन खरेदी करायचा, पण त्यात साधारण वर्ष निघून जायच कारण सगळ्यात जास्त पैसे आम्हाला गावची जत्रा सोडली तर दुर्लभ होते... त्यासाठी लागणारे कॅसेट घेण्यासाठी 55 ते 60 रुपये खर्च न परवडणारा महिन्याकाठी पैसे साठवून त्यावेळी t series खूप फॉर्ममध्ये होती तिच्या कॅसेट पेक्षा आम्ही venus ला प्राधान्य देत असू कारण त्याच्या दोन्ही बाजूला दोन चित्रपटांची गाणी मिळत, जस की दिलवाले व कयामत, आशिकी व राज... त्यावेळी गावातील कोणती सुद्धा प्रवाशी गाडी असो किंवा ट्रॅकटर त्यावर सुद्धा जो भी कसमे खाई थी हमने, जीथा था जिसके लिये, परदेशी परदेशी ह्या गाण्यांच अधिराज्य होत. आताच्या दोन बोटल वोडका पेक्षा तिरंगा मधील पिले पिले ओ मोरे राज्या हे गाण्यात अजून तीच नशा वाटते...

मामाच्या गावाला जाऊया ही युक्ती सध्या tiktok वर मुलगी लय सुंदर हो मामी तुमची मुलगी लय सुंदर पुरती मर्यादित आहे परंतू आम्ही सुट्टीत हमखास मामाच्या गावाला जात असू त्यावेळी आजोळी कमीतकमी सर्व घरात आम्हाला नावानिशी ओळखत तीच ओळख अजून टिकून आहे. गावी सायकल ice cream वाला येत असे म्हणजेच आम्हा सर्वांचा गारीगार वाला, आठाणे, भाराने रुपया मध्ये बर्फ, दुधाचे गारीगार मिळत खरच आताच्या 500 रुपयांची सर नसेल त्या पन्नास पैशाला कारण त्यात आमच्या गरजा पूर्ण होत होत्या, आता गरजा भागवून घेतो त्या पूर्ण होत नाहीत. गावात फिरता फिरता दारूच्या बाटल्या, आपली चपटी हो नागपुरी संत्रा एका जागी जमवून ठेवणे हा वेगळा छंद होता कारण तिची किंमत पन्नास पैसे होती किंवा जिभेवर गोडवा निर्माण करणारा गुलाबी गुबगुबीत मावा... बाकीच्या आठवणी म्हणजे सोनेरी भुंगे, मध, डिंक गोळा करणे,  पोहायला शिकणे, शिकताना मरता मरता वाचलो ती गोष्ट वेगळी, चतुरपणे चतुर घोडे पकडणे त्यांच्या शेपटीला स्वतःच्या नावाची चिट्टी लिहून ठेवणे तो चतुर परत कधी तरी भेटायला येईल ही आमची भाबडी समज तो चतुर आणि आमचे गेलेले बालपण अजून कधी भेटलच नाही हो... 

जत्रेत घेतलेली रिमोट गाडी, black and white टीव्ही वरती खेळलेली टुनुक टुनुक उड्या मारणाऱ्या सुपर मारियोची गेम, परत छोट्या गेम वरची रेसिंग गेम, कॅरम, सापसीडी,  प्रत्येक जत्रेला आमची पोलीस गाडी ठरलेली चावी दिली की काय भुंग भुंग करत भुंगा पळायची तोड नव्हती तिला हे आठवल तरी डोळ्यात चट्कन पाणी येत. मुंबईतील मुले सुट्टीसाठी गावी येत असत तेव्हा त्यांच्या तोंडून WWF हा शब्द पहिल्यांदा कानी पडला, रॉक, अंडर टेकर, केन मरून जिवंत झालीत वगैरेच्या गप्पा !!! यांचे पत्ते सुद्धा बाजारात आले की आवर्जून खरेदी होऊ लागली त्यात तालुक्याला गेले तरी सिकंदर झाल्यासारखे जग जिंकलय असच वाटायच, गावात 2 तासाने येणारी st त्यापेक्षा इथले जगणे वेगळ होत, वडापाव गाडा, उसाचा रसवाला सातवीच्या पुस्तकात दमडी वाचावी तशीच काही ही कहाणी !!! 

सध्या मोबाईलच्या कँडी क्रश पेक्षा
तो उधळलेला गोट्यांचा डावच बरा होता...

PUBG च्या enemy is ahead पेक्षा
गुरुजी आलेत पळ हा धाकच काही और होता...

बापाच्या पैशावरील ह्या duke bike पेक्षा
चावीवर पळणाऱ्या पोलीस जीपचा वेग काही और होता

superman, spiderman, ironman पेक्षा
शक्तिमानच आमच्यासाठी, यह अवतार नही इनसान होता

चारचाकीच्या काचेमागून पाहिलेल्या मान्सूनपेक्षा 
खरा गारांचा मारा तर,
दप्तर झाकून जमिन पांघरलेल्या रेनकोटवर होत होता

बादशाह, हनी सिंगच्या कर्णकर्कश रॅप song पेक्षा
बप्पी लहिरीचा तम्मा तम्मा लोगे, 
अन अल्ताफ राजाचा तुमतो ठेहरे परदेशीचा नादच वेगळा होता.

आमच्या ह्या टुकार वाढलेल्या हायब्रीड जिंदगीला खरच
उनाड बालपणीच्या लेबलशिवाय काय घंटा अर्थ होता !!!
काय घंटा अर्थ होता...

समाप्त 🙏
#गावाकडचा_आशिक
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
.
.
******************************
From that Pappu pager's pager, Nokia's thick jute mobile, Reliance, Tata to the current oppo, vivo, i phone, the 90's generation that saw the change and accommodated itself in it, where the mobile began to breathe in our time, Mumbai chauffeur  The market for the same mobile has started now ... At that time, China Mobile had captured a lot of market, Dilwale, Qayamat, Diljale, Sarfarosh, Andaz Apna Apna, Sirf Tum, Altaf Raja, Raja Hindusthani, Raj, Jigar, Tu Khiladi Main Anadi  Films and their songs have captured our heart, Udit Narayan, Kumar Sanu, Abhijit, Achcha Seela Diya Tune Mere Pyaar Singer Sonu Nigam, Sadhana Sargam, Alka Yadanik, Anuradha, Dakshinatya Hariharan, K Bal Subramaniam and many more.  There are unknowing murmurs on the face.  At that time we used to listen to these songs on Mirchi (radio like a delicate box like ordinary glasses), Mang used to save some money and buy a Soni or Panasonic Walkman, but it would take a year because most of the money would be scarce if we left the village fair.  ... The t-series was in very good shape at that time, saving money for Rs. 55 to 60 per month for the cassettes.  ... At that time, whatever the passenger car or the tractor in the village, whatever we swore on it, we were the ones for whom the songs of foreigners were dominant.  The song Pile Pile O More Rajya from Triranga still feels more intoxicating than the current two bottles of vodka ...

 The trick to go to mama's village is currently limited to tiktok girl rhythm beautiful ho mami your daughter rhythm is beautiful but at the time when we were going to mamma's village on vacation, at least in all the houses, the same identity still survives.  The bicycle used to come to the village with ice cream, which means we all get ice cream in the rupee, milk, ice cream in heavy rupees, milk money.  Walking around the village with bottles of liquor, hopping your flat Ho Nagpuri orange in one place was a different hobby as it cost fifty paise or a pink fluffy mava that creates sweetness on the tongue ... The rest of the memories are collecting golden beetles, honey, gum, learning to swim  It's a different story to read while learning, to catch cleverly clever horses, to write one's own name on their tails, to be smart again, to meet them someday, our nephew's understanding that he is clever and our past childhood has never met again ...

 Remote train at the fair, Super Mario jumping games played on black and white TV, Racing games on the little game, Carrom, Sapsidi, our police car was given the key to each fair.  Tears well up in my eyes.  When the children from Mumbai were coming to the village for holidays, the word WWF came to their ears for the first time, chats about rock, under taker, Ken dying and coming back to life !!!  His address also came in the market and he started buying it. Even if he goes to the taluka, it feels like he has conquered the world like Alexander. Living here is different from the st that comes to the village in 2 hours, Vadapav Gada, Usacha Raswala should be read in the seventh book.

 Right now than Mobile's Candy Crush
 He was the only one who was healed of the scattered goats ...

 PUBG's enemy is ahead
 Guruji Alet Pal was just something else ...

 Than this duke bike on dad's money
 The speed of the police jeep running on the key was something else

 than superman, spiderman, ironman
 For us, this incarnation was not human

 Than the monsoon seen behind a four-wheeled glass
 If true hail strikes,
 The rucksack was covered with a raincoat covering the ground

 Badshah, than Honey Singh's raucous rap song
 Bappi Lahiri's Tamma Tamma Loge,
 Un Altaf Raja's Tumto There Pardeshi's voice was different.

 Really to our increased hybrid life
 What a bell meaning without the Unad childhood label !!!
 What does the hour mean ...

 Finished
 # गावकडचा_आशिक
 #Life_not_will_ meet

Post a Comment

Previous Post Next Post