Facebook SDK

"ढाक बहिरी" हे नाव ऐकताक्षणी कायतरी वैशिष्ट्यपूर्ण असणार हे आपण उमजून जातो, तीन-चार दिवसांपूर्वी या ठिकाणी जायच आमच्या अचानक ट्रेकर्सच ठरले, पण अश्या अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी कस जावे, कुठून जावे याची माहिती अगोदर एकत्रित केली तेथे झाडे झुडपे असल्याने रस्ता चुकण्याची भरपूर शक्यता सोबत स्थानिक वाटाड्या घ्यावा तसेच वरती जाण्यास 4 तास लागतात अशी माहिती भेटली, पण मोठी समस्या होती जेवणाची ती अनेकांचे personal blogs चाळले तरीदेखील मिळाली नाही, मंग आम्हीही ठरवल काहीतरी तुटक मुटक खाऊ पण ढाक बहिरीचा नाद करूच.
मंग ह्या रविवारी आम्ही फुकटे (बिना तिकीट) सकाळी 06.15 ची ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक - 05 वरील इंद्रायणी एक्स्प्रेस मधील मासिक पास धारक डब्यातून प्रवीण पवार व प्रवीण चव्हाण यांच्यासह प्रवास सुरु केला, आम्हाला कल्याणला मिळाले अचानक ट्रेकर्सचे सदस्य नितीन मालूजंकर, साई आरज व गिरीश पाटील मंग गप्पा मारत पोहचलो तेथ कर्जतला तेथे मिळाले मल्लखांब गुरू - अविनाश जगताप सोबत, श्रीकांत भोसले व सचिन सरडे इथे झाली आमची अचानक टोळी पूर्ण मंग रेल्वे स्टेशन बाहेर यतेच्छ मेदू वडा खाऊन, घाटले कर्जत एसटी स्टॅन्ड व पकडली 8.15ची कर्जत ते सांडशी लालराणी 17 रुपये प्रत्येकी तिकीट काढून पोहचलो थेट सांडशी गावात, तेथे गेल्यावर साई आरज (मास्तर) यांच्या ओळखीने जेवणाचा प्रश्न सुटला आणि येथेच राजा ढाक बहिरी आम्हा भक्तांवर खुश झाला होता, लक्ष्मण तुराडे (भ्रमणध्वनी - 8237551718) यांचेकडे जेवणाचे 500 रुपये आगाऊचे देऊन निघालो ढाक बहिरीकडे, पण सोबत वाटाड्या न घेता कारण सोबत वाटाड्या असेल तर "वऱ्हाडाच्या गाडीत बसल्यावानी लग्नाला जायच अक्षदा टाकायच्या अन गपगुमान निघून यायच काय मज्या राहिली मंग राव ह्यात", त्यामुळे आम्ही स्वतःची खाज म्हणा किंवा अजून काही कारण रस्ता चुकत नसेल व आपण शोधू शकत नसेल तर भटकंतीची काय मज्या... म्हणून आम्ही वाटाड्या न घेता 09.30 वाजता केली डोंगरात दिसणाऱ्या बहिरीदेवाच्या डोंगराकडे वाटचाल, आमचा अंदाज चुकला काही वेळामध्येच आम्ही रस्ता भरकटलो, पण त्याचा पश्चाताप नव्हता तो आमचा निर्णय होता तरी तेथील स्थानिक एका म्हतारबाबाला विचारून लगेच योग्य रस्ता पकडला तो शेवटपर्यंत, जाता जाता काही हौशी ट्रेकर्स मित्रांनी झाडाला तसेच दगडावरती दिशा दर्शक खुणा लावलेल्या आहेत, त्यांचे आभार त्यामुळे आपण बरोबर वाटेवरती असल्याचा अंदाज येऊन जातो, गडाचा रस्ता चालतोय, चालतोय पण रस्ता काय संपत नव्हता, रस्ता रानवाटेतुन जाणारा असल्याने फक्त पायपीट होत होती, तरी ह्या वाटेत ना कोणी चितपाखरू दिसत होते. पहाण्याचे ठिकाण जर सोपे असेल, त्याच्या पायथ्याशी गाडी येत असेल तर अश्या ठिकाणी लोक तोबा गर्दी करतात, अन अवगड असेल शुकशुकाट याचा प्रत्यय इकडे येतो. कस बस हो कस बसच म्हणायला पाहिजे कारण आज वरुणदेव आमचा अंत पाहात होता, कलावंतीनवरील वारा हा झिंगणारा होता अन इथे हा कुठल्या गुहेत लपून बसला कुठे सूर पारंब्या खेळायला गेला, भाई शेवटपर्यंत काय सापडला नाही, इथे आम्ही काहीवेळ विश्रांती घेत लाकूड खांद्यावर घेऊन बाहुबलीची शुटिंग केली, जाता जाता मल्लखांब विद्येचे गुरू अविनाश जगताप हे कोणत्याही झाडावर जाऊन लटकायचे, कुठे फांदीवर उलटे व्हायचे हे पाहून स्वतःच्या कपाळावर हात मारला व पुढे मार्गस्थ झालो आता आम्ही कुठे बहिरीदेवाच्या मुख्य पायथ्याशी पोहचलो होतो तो पर्यंत सातारचे वीर भोसले व नाशिकचे आशिक मालुंजकर देवाच्या गाभाऱ्यात पोहचले देखील होते पोरांची गती तेजस एक्स्प्रेसवाणी आहे हो नुसते सुसाट आहेत मावळे.....
आता ढाक बहिरीचा महत्वाच्या टप्प्यात आम्ही आलो होतो, ज्या ठिकाणावरून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो असा सुळका पायऱ्यांमध्ये कोरलेला होता त्याला दोरखंड व लोखंडाच्या मजबूत तारेचा सहारा होता, नाहीतर वरती जाणे मुश्किल ही नही अशक्य होत... एक गोष्ट इथे नमूद करावी वाटते ज्यांनी किल्ला हरिहर केला असेल त्याठिकाणी पायऱ्या ह्या जवळ जवळ आहेत व पकडण्यास खोबण्या आहेत इथे हा प्रकार नाही. येथील पायऱ्या ह्या कोरीव अश्या नाहीत, एकदम 90 अंशाच्या दगडावर सरळ रेषेत असून दूर अंतरावर आहेत त्यामुळे स्त्रेचेबल पॅन्ट असावीच असावी. पूर्ण भटकंतीचा आमचा खरा कस इथे लागला होता, तो सरळ एक टप्पा कसा बसा पार करतो तोच, दुसरा टप्पा सुरू झाला, इथे एक सरळ रेषेत आडवा दगड व एका वेळी एकच पाय ठेवता येईन अशी त्याची नाजूक कड, ह्या दगडाच्या कातळ कडेवरून दगडाचा व तारेचा सहारा घेत श्वासागणिस एक एक पाऊल ठेवत आम्ही पुढे जात होतो, इथून खाली पडला तर माणूस खाली न जाता डायरेक्ट ढगात..... हा दुसरा टप्पा पार झालेनंतर शेवटचा टप्पा हा सुद्धा सरळच इथे एका मजबूत झाडाचे भरपूर फांद्या असलेले सुकलेले लाकूड गावकऱ्यांनी ठेवले होते यावरून दोरखंडाचा सहारा घेत पोहचलो अखेर बहिरी देवाच्या मंदिरात.... अन देवाच्या पाया पडता पडता, देवाला म्हणालो, आरे देवा..... एवढ्या लांब का र बाबा येऊन बसलास, जरा खाली तरी थांबायच होत, यावर बहिरी देव म्हणतो कसा " हे पोरांनो, नाद करा पण आमचा कुठ"  खर रे बाबा तुझ म्हणत दुनियादारीमधील गाण सुरू केल, देवा तुझ्या गाभाऱ्याला येण्यासाठी.... रस्ताच नाही... सांग कुठे ठेऊ पाय (घंटा) जागाच नाही...म्हणत हळूच त्याच्या पुढचा खोबऱ्याचा तुकडा उचलून तोंडात टाकला (गावातल्या जुन्या खोड्या, भुरटा चोरच शेवटी) अन तिथल्या थंडगार पाण्याने तोंड धुवून मनसोक्त गटागटा पिऊन निवांत बसलो...इथे काही लोक कोंबडा, बकरे कापतात व इथेच खातात व वापरलेली भांडी धुवून पुन्हा तिथल्या पाण्यात ठेवून देतात, दुसऱ्या माणसांना वापरण्यासाठी, येथून पाहिलेला नजरा हा घनदाट जंगलाचा असून येथून रायगड जिल्ह्याचे बरेचसे रुपडे पहायला मिळते, कर्नाळा, प्रभाळगड किल्ला ई. तसेच येथूनच सुरू होते आम्हा पुणेरी भामट्यांच्या पुण्याची हद्द, थोडे फार फोटो काढून थोडी विश्रांती घेऊन चांगभल म्हणा चांगभल, बहिरीच्या नावान चांगभल म्हणत गड उतरण्यास सुरुवात केली, गड उतरताना सोप्पा वाटतो त्याचे एकमेव कारण म्हणजे चढताना आपण हातावर व पायांवर जोर देत सर्व शक्ती एकवटत असतो व तोल जाण्याची शक्यता असते अन उतरताना पूर्ण पायांवर जोर असतो व हाताची पकड मजबूत असते, महिलांसाठी याठिकाणी चढाई माझ्यामते धोकादायक आहे कारण उंचीवरून खाली पाहिल्यावर चक्कर येण्याचे चान्सेस सुद्धा जादा आहेत, त्यामुळे काही महिला खालीच थांबल्या होत्या..... उतरताना हे दोन्ही टप्पे आम्ही सावधगिरीने उतरलो, थोडी जरी गलतीसे मिसटेक झाली तर मी किती टप्प्यात खाली जाईल हे बहिरीलाच माहीत होत, आपणास पायातील बूट खाली काढावे लागतात, त्यामुळे तळव्यांना घाम सुटतो त्यामुळे जरा जपुनच पाऊल ठेवावे लागते...आता शेवटचा टप्पा उतरण्यास सुरुवात केली असता डाव्या बाजुच्या आमच्या पासून 3 फुटाच्या अंतरावर एका कपारातून एक सर्पराज उन्हाच्या तापिला बाहेर निघाले, विषारी का बिनविषारी ते विचारू नका ! हर सरपटणारा प्राणी मुझे विषारीच दिखता है, आता उतरताना गडबड न करता all is well, all is well म्हणत कसे बसे आम्ही गारुडी उतरलाे... सपाटीला असता तर, त्याला सोडला नसता, भुंगाट पळत सुटलो असतो, आता भला मोठा कातळकडा समपल्यावर आम्ही आता नालीतून चालायला सुरुवात केली 20-25 मिनिट चालल्यावरती वरून मुलांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला ? वरती पाहिले तर काय ! एक भला मोठा दगड विजेच्या गतीने नालीतून खाली येत होता काही समजायच्या आतमध्ये आमच्या एका मित्राच्या तो हातावर जोरदार आपटला व त्याच गतीने उडून खाली गेला, आमचा मित्र त्या आघाताने काहीसा बाजूला झाला व त्याच्या अंगावर बऱ्यापैकी दुखापत झाली तसेच त्याच्या खालचा दुसरा मित्राने बाजूला उडी मारल्याने त्यालाही खरचटले... अशी काही मूल बेजबाबदारपणे मस्ती करीत ट्रेकिंग करतात मस्करीमध्ये जरी दगड खाली फेकला तरी तो एखाद्याचे प्राण घेऊ शकतो एवढी बुद्धी यांना नसेल का ? कोण होते आम्हाला समजल नाही, का आम्ही पारोशे (अंघोळ न केलेले) होतो त्यामुळे अस घडल का आमच मन स्वच्छ होत म्हणून वेळोवेळी संकटातून वाचलो या प्रश्नांची उत्तर न मिळालेलीच बरी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करीत सांडशीकडे पायांना वेग देत निघालो, मध्येच भाताच्या शेतात लहान मूल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळत होती त्यांना 2 पार्लेचे पूडे दिले व साई आरज व मी लगान टीम सोबत थोडा फलंदाजीचा आनंद घेत ह्या आठवणी मनात साठवून पोहचलो लक्ष्मण तुराडे यांचे घरी, सांडशी गावातील माणस खूपच मायाळू हो आमचा ज्यापध्दतीने त्यांनी पाहुणचार केला अचानक ट्रेकर्स धन्य झाले... 150 रुपये चीकन थाळी व व्हेज थाळी 120 यांमध्ये खा दाबून, पोट भरून मस्त तांदळाची भाकरी सोबत, पण जेवण झाल्यानंतर पश्चाताप झाला कारण व्हेज खाणाऱ्या रताळ्याना मस्तपैकी श्रीखंड, पनीर होते हे एकूण माझ मन पनीर पनीर झाल, अन रविवार असल्याने मल्हार भक्त गिरीश पाटिलचा खरा खुरा उपवास घडला, जाताना अन्नदात्यांचे आभार मानून 5.15 ची कर्जत एसटी पकडली व पुन्हा वर्षातून किमान 1दा तरी बहिरीला यायचय म्हणत झालो राहटगाड्याकडे मार्गस्थ...
भटकंतीचा नाद आमचा, गडकोटांवर निघते अचानक आमची स्वारी
भेटण्या तुज हे बहिरी देवा, हौश होती रे आमची भारी
जीवघेणे बेलाग कडे पार करुनी पोहचलो जेव्हा तुझिया दारी
शिवरायांचे मर्द मावळे असतील कैसे पोलादी, हे जाणिले रे आम्ही त्रिशूलधारी.....
©शैलेश कदम 
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
#अचानक_ट्रेकर्स
http://kadamshailesh99.blogspot.in
◆ राहण्याची सोय- वरती बहिरीच्या गुहेत किंवा तंबू असेल तर गावात राहू शकता( जंगलात राहणे धोक्याचे आहे)
◆ पाण्याची सोय - वरती बहिरीच्या गुहेत होते.
◆ जेवणाची सोय- वरती साहित्य असते किंवा गावकरी करतात ( वरती संपर्क दिला आहे)
◆ मार्ग- मुंबई- कर्जत- सांडशी एसटी.


*********************

We know that when you hear the name "Dhak Bahiri", it is very unusual for us to go to this place three or four days ago, but suddenly our trekkers decided, but before going to such a strange place, we have gathered information about where to go and where there are bushes.  Found that it takes 4 hours to get local peas as well as uphill, but there was a big problem  Evanaci though she did not have many personal blogs calale, TUE, we decided to eat something dashed mutaka but think of the sounds of Dhak bahirica.
 On this Sunday we started the journey with Praveen Pawar and Praveen Chavan from the passenger compartment of the Indrayani Express at Thane Railway Station Falat No-05 at 06.15am on Fukate (without ticket). We got Kalyan Suddenly Trekkers members Nitin Malujankar, Sai Arj and Girish.  Karjat got Mallakhambu Guru when he reached Patil Mang chat, along with Avinash Jagtap, Srikant Bhosal.  Sade and Sachin Sarde got here suddenly our entire gang eating out of Medu Wada, Ghat Ghat Karjat ST stand and catching Karjat to Sandashi Lalrani of Rs. 175 each took a ticket and reached straight to Sandashi village.  Dining question was resolved and this is where King Dhak Bahari was pleased with us devotees, Lakshman Turade (tour - 8237551718) had a dinner of 500.  Rupees advance in advance to Dhaka, but without having to negotiate, because if there is a commotion, "It was fun to go to Akshada just to get married while sitting in the carriage of Wada, in Mang Rao", so we will say our own itch and for no other reason.  If you can't find out what fun to wander around ... so we see the Kelly Mountains at 09.30am without taking the peas.  On our way to the mountains of Bahirideva, we missed the road within a short time.  Thanks so much that you're guessing you're on the right track  Calatoya of the road, but it was not the end of what calatoya road, the road ranavatetuna was just hiking, but this is not the way one would seem to citapakharu.  If the place is easy to see, the train is coming at the foot of it, then in such a place, people are crowded and unaffected.  Kas bus bus kas bus should be called because today Varun Dev was watching our end, the wind on Kalavantin was shivering and he hid in some cave where he played Sur Parambi, brother did not find anything till the end, here we rested for some time.  On the way, Avinash Jagtap, the guru of Mallakhambh Vidya, used to go to any tree and hang it on a branch.  After seeing Hi's hand hitting his forehead and leading the way, now where we reached the main footpath of Bahri Deo, Satir's heroic Bhosale and Ashish Malunkar of Nashik also reached the Godavari. The speed of Por is Tejas Expresswani.
 Now we have come to the crucial stage of Dhaka Bahri, the place from which one person could go at a time, in the conical stairs, was supported by strong cords of iron and iron, otherwise it would not be difficult to climb up.  This is not the case where the steps are close and there are knobs to catch where the harihar is done.  The steps here are not so narrow, they are straight line on a 90 degree stone and are at a distance so it should be feminine pants.  Our true wanderlust was here, how it crosses a straight stage, the second phase begins, here a horizontal stone in a straight line and one delicate straw at a time can be placed at one end, with the support of stone and stars.  Taking the breathing step one step, we were moving forward. If it falls down here, the person does not go down into the direct cloud ..... After passing the second stage, the last step is also sir.  Finally, the villagers kept the dried wood with a large branch of a strong tree. We arrived at the temple of deaf God. Finally, at the feet of God, we fell to God, and said to God, 'Oh my God .....  On the way down, the deaf god says, "Hey guys, shout, but ours."  There is no way to get to the village ... there is no place for the place where the bell is located ... he says, lifting the piece of cigarette in front of him and throwing it in his mouth (old puddles in the village, at the end of the rocks) and washing his mouth with cold water.  Sitting down in bed ... Some people cut the hens, goats and eat here and wash the dishes and put them back in the water, use them for other people.  For this reason, the view seen here is of dense forest and from here many forms of Raigad district can be seen, Karnala, Prabhagalgarh fort.  It also starts here. We take the rest of the Pune Phani Bhatni, take a few photos and take some rest and say good-bye.  There is a possibility of weight gain and the full foot is stressed and the hand grip is strong, ladies  Climbing here is dangerous for me because the chances of getting dizzy when looking down from a height are too high, so some women were stopping at the landing ..... Both of these steps came down with caution, though a little mistakenly I know how many stages I will go down.  Well, you have to take the shoes off of your feet, so that the palms get sweaty so you have to be careful.  Wool to keep ... Now the last phase of the inn went out of the heat of a sarparaja Tapia kaparatuna a distance of 3 feet from our side were left began, do not ask to slow the poison!  Every crawling creature looks like a poison to me. Now, without messing with the landing, all is well, all is well. How do we settle down? If we were flat, we would not have left it, we would have escaped.  After walking for 20-25 minutes, there was a loud noise from the children?  What if you look up!  A good stone was coming down from the drain at lightning speed. Something inside of us fell heavily on his hand and went down at the same pace.  ... some such kids are jokingly trekking in Muscari  Although he threw down the stone derives not so much the brain can take one's life?  We do not know who was, why we were parrots, so why did it happen that our minds were saved from time to time as a result of cleanliness?  He was playing cricket and gave him 2 parlors and Sai Arz and I enjoyed a bit of batting with the Logan team.  These memories came to our mind at Laxman Turade's house, the man in the village of Sandashi was very kind to us.  The regrets were because the vegetarian who consumed the veggies had a Shrikhand, Paneer in the head.  Malhar devotee has happened Girish patilaca very fast shot, are captured by the annadatyance ST 5.15 to Karjat and thanks again for at least 1 year in transit provider when I say bahirila yayacaya rahatagadyakade ...

 The sound of wandering is ours, suddenly our rush on the rocks

 Meeting you, deaf god, was cheerful

 The life-threatening crossing reached Belaugi when your door

 Shivarai's men will know how to be brave, we know that we are Trishuldhari .....

 © Shailesh Kadam
 http://kadamshailesh99.blogspot.in

 * Accommodation - If you live in a cave or tent above, you can stay in the village (living in the jungle is dangerous).
 * water facilities - upstairs in the outer cave.
 *Dining facilities - Contains above-the-clock materials or by the villagers (Contact is provided above)
 * way- Mumbai- Karjat- Sandashi ST.

 

2 Comments

  1. Khup bare vatle mahiti pn milali aani next time mala pn sanga me pn yeil odh lagli aamche lahan bandhu pc 518 kadam yanchya sobat firaychi 😎

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post