Facebook SDK

Sikkim tourism

एक दिवाळी सैनिकांसोबत ह्या आमच्या सिक्कीम -  Sikkim tourism स्पेशल ट्रिपचा facebook वर खूप गाजावाजा झाला, शेवटी मुहूर्ताचा दिवस 4 नोव्हेंबर जवळ आला, पण त्याअगोदर Sikkim tourism च्या कहाणी मे थोडा, थोडा नाही लय वंगाळ ट्विस्ट आ गया. त्यावर लिहिलेला हा Sikkim tourism blog कसा वाटतो नक्की सांगा.

Sikkim blog 

Sikkim tourism ला जाण्यासाठी आम्ही दोन महिने अगोदर लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सिलिगुडी या कामाख्या वातानुकूलित ट्रेनचे बुक केलेले टिकीट अजून waiting होत ते कन्फर्म होईल याची आशा आमच्या डॉक्टरांनी सोडली होती. 


मंग आता दुसरा मार्ग काय तर रेल्वेच्या आरक्षण केंद्रात जाऊन तात्काळ कोठा मारणे बस ते सुद्धा नाही झाले तर शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी दिलेले दिवाळीचे लाडू पक्कड, फुकणीने गावच्या घरी फोडून गप्प गुमान खाणे, 

Sikkim torusim blog

Sikkim tourism blog 


ठाणे येथील रेल्वेच्या बुकिंग कार्यालयात लेह-लडाख टूरिस्टचे, Sikkim tourism, nepal tourism, Bhutan tourism अजून बरेच चे ब्रँड अँबेसिटर ultimate योगेश अलेकरी, फेसबुकवर राडा करणारे इंजिनिअर- तुषार दुधाने असे आम्ही तिघे जाऊन IRCTC ह्या रेल्वेच्या अधिकृत side वरती कामाख्या गाडीचे 171 तात्काळ सीट उपलब्ध होत्या शार्प 10 वाजता.

आम्ही तिघांनी सीट बुक करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला असता 1 मिनिटमध्ये उपलब्ध 171 सीट सम्पल्या, तेव्हा पासून आमचा माणुसकी वरील विश्वास उडून गेला राव अस असत का कुठे ?


आता Plan no 2- कोलकत्ता मार्गे Sikkim म्हणून मुंबई ते हावडा या गाडीचे तात्काळ तिकीट काढणे, आम्ही irctc चा नाद सोडून 11 वाजता सुरू होणाऱ्या स्लीपर क्लासच्या line मध्ये उभे राहून तिकीट काढण्यासाठी गेलो असता

आम्हाला 10 पैकी 6 सीट बुक झाल्या त्यापैकी 2 सीट ह्या दलालाला सांगून एका हावड्याला जाणाऱ्या व्यक्तीच्या तिकीट मध्ये ऍडजस्ट केल्या आमच्या ह्या रक्तरंजीत युद्धाला 4 तास लागले.

अखेर तो 4 नोव्हेंबर उजाडला सर्व मंडळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे मोठ्या उत्सुतकेने पोहचली असता 11.05 मिनिटाने सुटणारी 18069 ही ट्रेन 13.30 ला सुटेल आम्ही सर्व ताजेतवाने होतो.


थोडा बहुत time pass केल्यानंतर हावडा गाडीत चढलो त्यानंतर आमच्या 1 ल्या तिकीट वरील 4 seat वर आमची मंडळी विराजमान झाल्यानंतर शिल्लक 2 seat कडे मोर्चा वळवला असता त्या 2 seat आम्ही बसलेली हावडा गाडीच्या नसुन रात्रीच्या हावडा गाडीच्या त्या दलालाकडून बुक झाल्या होता, 


जर आमच्या सोबत शोले चित्रपटातील गब्बर सिंग असता तर तुपे पाटलांकडे पाहून नक्कीच, सीट चार और आदमी दस, एतो बहुत ही बडी नाइंसाफी हुई पाटील अस नक्कीच म्हणाला असता, 

हे सुद्धा वाचा - 

Arunachal pradesh tourism
दलाई लामा निवडतात तरी कसे 

तरी आम्ही अच्छे दिन आयेगे म्हणत कसबस 4 सीट वर 10 लोक ऍडजस्ट होऊन प्रवास सुरु केला, त्यात नसरापूरचे WWE heavy weight champion सुनील जाधव यांना कस व कुठे adjust कराव हा विक्रम और वैताल कार्यक्रमातील जटील प्रश्न होता, 

शेवटी त्यांनी दोन सीटच्या मध्ये स्वतःचे मास्टर बेडरूम खोलून सात बारा स्वतःच्या नावावर केला आणि आमचा बेभरोशी प्रवास सुरू केला, कल्याण स्टेशन सुटलेनंतर खडवली स्टेशनजवळ आमची गाडी साधारण 3 वाजता इगतपुरी येथील ब्लॉकमुळे थांबली, 


आम्ही म्हणालो होईल लगेच सुरू म्हणता म्हणता 4 वाजले, 5,6, म्हणता म्हणता 7 वाजता ही गाडी सुरू झाली, तस म्हंटल तर पनवती असली तरी अनुष्का शर्माचा आणि माझा काही काडीचा सबंध नाही तरी आमच्या गाडीला कोणती पनव्ह्ती लागली देव जाणे अजून किती दिवसांचे Sikkim tourism होणार देव जाणे. 


गाडीमध्ये बसलेली सर्व मंडळी पूर्ण वैतागून गेली होती, त्यात सर्वांनी याच खापर पहिल्यांदा रेल्वे प्रवास करणाऱ्या सुनील जाधव यांच्यावर फोडले शेवटी पनव्हती अनुष्का नसून नसरापूर नरेश सुनील जाधव असल्याचे वैभव बांदल यांनी थापा 24 तास 6 तास मागे कॅमेरामन तथा रिपोर्टर संतोष जुगादार यांच्या मुलाखतीत सांगितले, 


सर्वांची परिस्थिती अर्धमेल्या सारखी झाली होती त्यात अंगावर काही जिम्मेदारी त्यात विषांत भाऊ यांनी पुढाकार घेऊन सांगितले की आपण Sikkim tourism करण्याचा उद्देश हा Sikkim state किंवा Sikkim capital फिरण्यासाठी नाही तर भारत चीन सीमेवर आपण खास सैनिकांना मिठाई, ग्रीटिंग घेऊन जात आहोत तरी त्यापेक्षा सैनिकांच्या मनात, देशात कोणीतरी आहे जे आपली आठवण काढत आहेत त्यासाठी हा अट्टाहास आहे., 


ज्यांचा आपल्याला पूर्ण मनापासून सपोर्ट आहे हे खूप महत्त्वाच आहे, त्यामुळे सैनिकांना आपण सीमेवर ऊन, थंडी, पावसात देशाचे रक्षण करीत असल्याचा अभिमान वाटतो, 

काही वेळात साधारण 7 वाजता गाडी सुरू झाली त्यावेळी सहज आजचे वर्तमान पत्र हातात घेतले तर त्यावर ह्या इगतपुरी ब्लॉकची बातमी होती आणि खाली लिहिल होत, आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल मध्य-पूर्व रेल्वे क्षमस्व आहे, 


आपली यात्रा सुलभ हो, डोक्यावर हात मारला व घरून आणलेले डबे खाऊन एका सीटवर दोन अशी मंडळी 8 अशी मास्टर बेडरूममध्ये सुनील जाधव व महेश आरोटे यांनी जागून infinity war व black panther movie पाहत night shift केली त्यात आम्ही 12 तास उशिरा पोहचलो त्याबद्दल भारतीय रेल्वेच्या ब्लॉक बद्दल आमची काहीएक तक्रार नाही 


परंतु ट्रेनमधील साफ-सफाई, पाण्याची कमतरता, टॉयलेटमध्ये अस्वच्छता या बोंगळ कारभाराला आम्ही पुन्हा एकदा सामोरे गेलो, प्रवासा दरम्यान खिडकीतून बाहेर डोकावल तर नजरेच्या टप्प्यात फक्त अन फक्त भात शेती दिसत होती 


आणि फुटबॉल साठी तयार केलेली लहान मोठी मैदाने असा प्रवास करत करत अखेर पोहचलो दि.06/1/2018 ला हावडा स्टेशन आणि तेथून 500 रुपये सुमो गाडीला देऊन कोलकत्ता स्टेशनवर ते सुद्धा गाडी सुटायच्या अर्धा तास अगोदर 

सिलिगुडीला निघणाऱ्या गाडीमध्ये दोन दिवसांच्या अंघोळीच्या गोळ्या खाऊन बसलो आणि अखेर पोहोचलो महेश आरोटे याने ऑनलाईन बुक केलेल्या सिलिगुडी मुक्कामी हॉटेलमध्ये खास Sikkim tourism करण्यासाठी ...


© शैलेश कदम
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा

क्रमशः

ह्या भागात आपण Sikkim tourism ने प्रवास करत पोहचलो सिलिगुडी मध्ये तेथून पुढे bike व बर्फाचे रस्ते व भारतीय सैनिक त्यासाठी  Sikkim blog चे part खाली देत आहोत. 

SIkkim blog 02

Arunachal tourism blog 

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post