Sikkim tourism
Sikkim blog
Sikkim tourism करिता रायपूर मध्ये ताईने दिलेले जेवण, सेल्फी किंग तुपे पाटलांचा मोबाईल फोन चोरी ह्या घडामोडीनंतर आम्ही सिलिगुडी मध्ये रात्री उशिरा झोपून सकाळी शक्य तितक्या लवकर उरकून हिमालयन bike (Royal Enfield) योगेशच्या ओळखीने भाड्याने घेतल्या.
त्यावर सर्व मंडळी आपला लवा-जमा बांधून योगेश-मी, वैभव-तुषार, सुनील-रोहित, महेश-संतोष, अमोल दादा-विषांत अश्या एका मागोमाग ठरलेल्या क्रमाने हिमालयन bike धुराळा उडविण्यासाठी पश्चिम बंगालच्या रस्त्यावर उतरल्या आणि सुरू झाली sikkim bike trip सुरू झाली.
नवीन दिवसासह मंग काय रु-रु करत दक्खनचे वादळ घुसल थेट sikkim capital गँगटोक तस एक शिस्तीच शहर येथे वाहन चालवताना हॉर्न वाजवण्याची गरज नाही, ज्याला त्याला आपली नैतिक जबाबदारी माहिती आहे,
कोणी उशीर झाला म्हणून उगाच overtake करीत नाही की कॉर्नर आला तरी हॉर्न वाजवीत नाही जो तो आपल्या ठरलेल्या रेषेत गाडी चालवत होते त्यामुळे अपघात ही भानगड नव्हती एक मात्र नक्की ज्याच्या अंगी कंड त्याला 1/4 तिकीट पास मिळण्याच्या संधी जास्त उपलब्ध होत्या,
![]() |
Sikkim bike tripsikkim capital गँगटोक मधील महत्वाचे ठिकाण म्हणजे MG MARKET होय महात्मा गांधी मार्केट आपण परदेशात असल्याचा भास या ठिकाणी होतो, येथील माणस तुम्हाला शांत दिसतील प्रेमाने वागतील आपण सुद्धा त्याना योग्य प्रतिसाद दिला तर ते स्मितहास्य करून पुढे निघून जातात, Sikkim capital गँगटोक येथून काही परवाने गोळा करून आमची स्वारी निघाली लाचेन मुक्कामी, तेथे जाताना रस्त्यात अंतर अंतरावर लागणारे पोलीस नाके तेथील पोलीसांची सर्वांना दिलेली आदरपूर्वक वागणूक मन जिंकून घेते त्यांनी कधी कोणाला उद्देशून बोललेला उलटा शब्द ऐकिवात आला नाही, रात्रभर sikkim bike trip हाकत अखेर पोहचलो आम्ही लाचेन मुक्कामी जाताना रस्ते काहि चांगले तर काही खूपच खराब होते, आमच्याशिवाय सह्यादीतील दगड धोंडे म्हणून कोण्ही नव्हते, इकडचे रस्ते पूर्णतः मातीचे एक मोठा पाऊस आला तरी वाहून जाणारे इकडे नैसर्गिक सौंदर्य जेवढे छान त्यापेक्षा कितीतरी पटीने अक्राळविक्राळ आहे, हे आपण खचलेले रस्ते, वाहून गेलेल मोठाले पुलच्या पूल पाहिल्यावर समजत, त्यामुळे बहुदा इकडील घरे लाकडाची असतात व त्यांना खालून लाकडाचा, सिमेंटचा आधार असतो...
त्यात इकडे पेट्रोलसाठी काहीही सोय नाही म्हणून आम्ही हरएक गाडीवर 10 लिटर पेट्रोलची कॅन बांधून घेतलीत, अखेर दिवसाची सांगता म्हणून दाबके भात और ऑम्लेट खाऊन सकाळी 5 ला सर्वांनी उठायचे म्हणत #ultimate मंडळ झोपी गेले... 4.45 ला दरवाज्यावर मोठ मोठयाने कोणाची तरी थाप पडली भूत असेल काय, का मला झोप नसल्याने कसला भास होतोय काही समजत नव्हत दरवाजा खोलला तर नसरापूर फाट्यावरचा असुर होता ( आमचा अक्राळ मित्र ) विषांतने सर्वाना झोपेतून वेळेअगोदर उठवले असता पाटील म्हणाले, सबका हिसाब होगा, सबका बदला लेगा ये फैजल अस म्हणत सर्व भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत उरकून गाडीवर स्वार झाले ते gurudongmar lake च्या दिशेने Sikkim bike trip करत....
प्रवासातल्या गोष्टी नक्की वाचा तवांग मधील बौद्ध धर्म नेमका आहे कसा दलाई लामांची निवड कशी होते सफरचंद मधून देणारी तवांगची सुंदरी रस्ता खूप छान पण वळणा-वळणाचा, त्यावर उभारलेले अफलातून पूल आणि शेजारी उभे केलेले रंग बेरंगी शांततेचे प्रतीक असलेले ध्वज यामुळे कंटाळा काय तो प्रवासात आलाच नाही असे करत पोहचलो अखेर 15000 फूट उंचीवर असलेल्या आर्मी कॅम्पस तथा चेक पोस्टमध्ये. gurudongmar lake येथे सर्वांना साधारण थंडीचा त्रास तसेच डोक (नसले तरी) गरगर करायला सुरुवात केली मंग लगेचच तेथील कॅन्टीनमध्ये जाऊन गरमागरम पाणी व कॉपीचे (फ्री मध्ये) 2,3 ग्लास रिचवले तेव्हा कुठे बर वाटायला लागले येथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच कूच केली ती gurudongmar lake च्या दिशेने, साधारण 18000 फुटांवरील gurudongmar lake प्रदेशात Acute mountain sickness (AMS) जेथे अचानक चक्कर येणे, दोन पाऊल चालले तरी थकवा जाणवणे, दम लागणे, ऑक्सिजनचा तुटवडा जावणून श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक नाकातून रक्त येणे अशा बर्फाच्छादित प्रदेशात आपले भारतीय सैनिक अहोरात्र आपली सेवा करीत आहेत, येथे कमीतकमी आलेले सर्व पर्यटक वरील समस्येने हैराण होते, आमच्यामध्ये फक्त एकटा iron man सुनील जाधव सुस्थितीत होता त्याला कोणत्याच प्रकारच्या त्रास जाणवला नाही की साधी चक्कर सुद्धा आली नाही, त्यात आमच्या एका जवळच्या मित्राला खूप त्रास होऊन मळमळ होऊ लागली तरी आम्ही साधारण असल्या ठिकाणी 2 तासापेक्षा जास्त तग धरून होतो हा एक प्रकारे आमच्या शरीरातील शक्तीचा विजयच होता, gurudongmar lake वरील नजराणा म्हणजे निसर्गाचा एक अनमोल ठेवाच होता जणू, मात्र हा नजराणा लुटायला येणारे भारतीय मात्र बोटावर मोजता येथील एवढेच होते बस हेच काय ते दुर्देव ह्या नजराण्याचे थोडे फोटो शोटो काढून ultimate मंडळ खालील कॅम्पवर एक दिवाळी सैनिकांसोबत ह्या उपक्रमात सामील झाले.
आणि लाचेन येथील तळ हलवून (lachung) लाचुंग येथे यजमान- लेंडक (हसू नका नाव आहे हे) याच्या sikkim best hotels कडे रवाना झालो… हा लेंडक अचानक कसा भेटला, औरंगाबादचा आर्मी पोलीस याची झालेली अचानक भेट हे पुन्हा केव्हातरी... © शैलेश कदम #जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा #ultimate_travellers_and_hikers क्रमशः |
Post a Comment