Facebook SDK

Sikkim tourism 

 Sikkim tourism blog 02 मध्ये आपण पाहिले की, Sikkim bike ride करत बर्फ तुडवत. आम्ही gurudongmar lake  येथे जीवघेण्या थंडीत पोचलो, तेथील भारतीय सैनिकांचे सोबत गप्पा मारून, मिठाई वाटून आता पहा कुठे जातो ते sikkkim blog 03 मध्ये.

Sikkim blog 03 

Sikkim tourismलेंडक ने आमची सोय खूप छान केली, सिक्कीमच्या माणसांना आपण नेपाळी, चिनी म्हणून हिनवतो तरी खरच ही माणस प्रेमाची भुकेली आहेत, त्यांना प्रेम द्या ते तुम्हाला अतोनात प्रेम देतील, 

सकाळी सकाळी लवकर उठून फ्रेश झालेनंतर आम्ही गाडीला किक मारली रे मारली की, इथल्या जीवघेण्या थंडीत थोड जरी शरीर उघडे पडले तरी बोचरी थंडी शरीर सुन्न करते, काही किलोमीटर अंतर पार केले असता Sikkim bike tour ची खरी कसरत सुरू झाली, 
Sikkim tourism blog

Sikkim tourism blog


पुढे भरपूर मोठा बर्फाचा तसाच पाण्याचा patch होता, आम्ही तरी रुळलेल्या वाटेवरून मोटारसायकल सुरू केली, परंतू थंडीने जमलेल्या बर्फावरून आमची मोटारसायकल घसरली मागील गाड्या मागच्या मागे स्तब्ध झाल्या, 

कोणाला काही दुखापत झाली नाही तरी खबरदारी म्हणून असा बर्फ अथवा पाणी दिसले तरी गाडीवरून पाठीमागील जोडीदार तेवढे अंतर चालत येत असे त्यात कोणाची गाडी अडली तर आमचे आधारस्तंभ अमोलदादा लिमन त्यास मदत करत, 

असे थोडेबहुत अडथळे पार करून आम्ही यमतांग  yumthang valley व्हॅली मध्ये धडक दिली, या ठिकाणी मस्तपैकी खरेदी, shop number 43 मध्ये नाश्ता करून बाजारपेठेचा आनंद लुटून sikkim yumthang valley वरून निघालो थेट zero point आता उन्हे कुठे अंगावर अलगद पडायला सुरूवात झाली होती त्यात कोमल उन्हामुळे रस्त्यावरील बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याने परत गाडी पुढे कुठेही घसरली नाही.
वेडी-वाकडी वळणे चुकवत पोहचली आमची वरात zero point च्या ठिकाणी sikkim zero point म्हणजे सर्वत्र बर्फच बर्फ, हा बर्फ मऊ गुबगुबीत नसल्याने सुनीलच्या कपड्यात हा बर्फ टाकण्याचा बांदलाचा मनसुबा उधळून गेला, 

याचठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून भारत माता की जय, जय भवानी जय शिवराय या घोषणांनी हे ठिकाण दुमदुमून गेले व सर्व यात्रेकरू आमच्या आनंदात तो तिरंगा पाहून सामील झाले त्यात कोणी पंजाबी होता तर कोणी बंगाली, तेथून सर्वांची रजा घेऊन आम्ही पोहचलो लाचुंगला.
तेथे लेंडकची सासू स्वर्गवासी झाल्याने तो त्याच्या मार्गे व आम्ही आमच्या मार्गे मार्गस्थ झालो, जाता जाता वाटेत दिसलेले हरीण तसेच इतर प्राण्यांचा आल्हाददायक सुखद धक्का पचवत पोहचलो Sikkim capital गँगटोकला sikkim hotel मध्ये मुक्कामी....

आमच्या प्रवासाचा शेवटचा दिवस ठिकाण Sikkim capital गँगटोक, या शहरात स्थित black cat commando संग्रहालय यास भेट देऊन सिक्कीम, भूतान, डोकलाम प्रकरण समजून घेऊन हरभजन बाबा यांची कहाणी ऐकून तेथे एक दिवाळी सैनिकांसोबत हा उपक्रम राबविला आणि त्या सर्वांचा राम राम घेऊन पोहचलो बागडोगरा विमानतळावर तेथे ultimate man योगेश अलेकरी यास sikkim airport म्हणजे जवळील विमानतळ गुवाहाटी येथे विमानात बसवून दिले.

आता आमच्या special 9 कमांडो वरती संकट होत ते म्हणजे थकलेल्या अवस्थेत NJP ते मुंबई भेटेल तेथे बसून जाण्याची कारण तिकीट कन्फर्म नसल्याने ही परिस्थिती ओढवली होती, त्यात विशांत बोलला होता, 

ज्याने त्यानी आप-आपल्या कौशल्याने जागा काबीज करावी, खास करून सुनिल जाधव कारण येताना बिचाऱ्याने खूप हाल सोसले परत सोसायची ताकद नव्हती गड्यात त्यामुळे आमची अवस्था " उसावल गणगोत सार, आधार कुणाचा नाही, बळ दे झुंजायला, R.A.C ची सीट दे, विनवीत irctc, गाडी मोकळी छान दे....खेळ मांडला म्हणत, 

गाडी फलाटावर येताच आम्ही त्यामध्ये मुंबई लोकलचे दिवा स्टेशन समजून चढलो, पण गाडीत चढले नंतर एकदिवस अगोदर आपली सर्व सीट कन्फर्म झाल्याची वार्ता मी सर्वांनी दिली, त्यावेळी सर्वांचा जीव सीटवर पडला आणि सर्व मंडळी कन्फर्म झालेल्या कामाख्या कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये खुषीखुशी विराजमान झाले. 

येता येता काही महाराष्ट्र मधील फौजि सुद्धा आम्हाला भेटले त्यांनी वर्णन केलेल्या रक्तरंजित कहाण्या, अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा त्यात खास म्हणजे गावाकडची भूत ह्या विषयावर प्रमोद पवार ह्या फौजीने रानात पाणी सोडायला गेलो असता, भुताची आहट जाणवल्याने उसाच्या फडातून पळताना मागून भूताने मोठयाने दिलेला, "वाचलास" हा आवाजाची कहाणी सांगून मन जिंकून घेतली. 

त्यात वस्ताद- संतोष जुगदार यांची सदाबहार गाणी व इतर कोरस मंडळींनी मैफिल बनवली होती (झोपलेले जागे व्हायचे पण आमचे मजबूत मित्र मंडळ पाहून गपगुमान निजायचे).

आमचे आधारस्तंभ पै. सुनील जाधव यांनी समोर बसलेल्या पर-प्रांतिय व्यक्तीस (त्याने सुनीलला अनेकवेळा मुद्दाम खुन्नस तथा गेल्या जन्माचा राग मनात धरून जागेवरून उठवल होत) म्हणून त्याला ठोकायची भीष्म प्रतिज्ञा त्याने केली 

आणि मुन्ना मुन्ना म्हणत त्यास कल्याण स्टेशनजवळ मुन्नाच्या उद्धटपणाच्या संधीचा फायदा घेवून त्यास जय चिंगा भुंगा म्हणत थोडा चिंबवला आणि मुंबई पहिल्यांदा आलेला तो मुन्ना आता पुरता हनुमान झाला होता (यात मित्रहो सुनीलची काही चूक नव्हती.
आपण महाराष्ट्रभाषी लोक मुद्दाम कोणाच्या वाट्याला जात नाही हे खुद्द आलमगीर सुद्धा जाणतो) अस करत आम्ही सर्व आप-आपल्या ठरलेल्या ठिकाणी उतरून घराकडे मार्गस्थ झालो, हिमालयनने जवळपास 800 किलोमीटर अंतर पार केलेल्या प्रेमळ सिक्किमच्या आठवणी मनात साठवून आणि 6 मराठा बटालियनच्या योध्याना श्रद्धांजली वाहून.....

© शैलेश कदम
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
#ultimate_travellers_and_hikers
Sikkim tourism blog समाप्त


हे सुद्धा वाचा - 


Post a Comment

Previous Post Next Post