aayushya marathi lekh आयुष्य कसे जगावे

aayushya marathi lekh

आयुष्य कसे जगावे ही एक कथा जी तुम्हाला आयुष्य जगायला प्रोत्साहन देईल आवडल्यास नक्की अभिप्राय द्या तर चला लेखाला सुरुवात करतो. aayushya marathi lekh आयुष्य कसे जगावे

आयुष्य कसे जगावे

आयुष्य कसे जगावे यावर बोलावे तेवढे कमी वाटत, वपु बोलतात ना, माणूस म्हणजे एक कोड त्यात एक माणूस तो ही एकदा ते अजून एक कोड.
मित्रांनो आपण फक्त लग्नाच्या पत्रिकेपुरते चिरंजीव असतो, बाकी आपण जन्म झाला तेव्हा पासून मृत्यू वैताळासारखा मानगुटीवर आहेच.


पुराणानुसार आपण सप्त चिरंजीव ओळखतो ते म्हणजे आपले बजरंगबली, बिभीषण, परशुराम, महर्षी व्यास, कृपाचार्य जे हस्तिनापूरचे आचार्य होते द्रोणाचार्य यांच्या अगोदरचे, असुरराज- बली हा भक्त पुंडलिकाचा नातू, शेवटचा चिरंजीव अश्वत्थामा, याचा जन्म होताना याने घोड्यासारखी गगनभेदी किंकाळी दिली म्हणून हा द्रोणपुत्र अश्वत्थामा, याचेवरील पुस्तक नक्की वाचा आवडेल तुम्हाला कदाचित कर्णानंतर हे पात्र आवडून सुद्धा जाईल.

आयुष्य जगताना थोडेफार पुण्य आपल्या सोबत असल्याचे एकमेव कारण म्हणजे आपले बालपण आणि चांगुल मन !

आपल्या बुद्धीमध्ये वाढ होईल तस आपल्याला नकळत का होईना स्वार्थ चिटकत जातो. बाल्यावस्थेत आपण निस्वार्थ असतो. आपल्यात एकप्रकारे परमेश्वर वास

आयुष्य कसे जगावे
आयुष्य कसे जगावे

करीत असतो, कामावरून थकून आलेला बाप, चौकटीत पाऊल टाकताच आपल्या खिळखिळणाऱ्या आवाजाने ताजातवाना होऊन जातो काय जादू असावी त्या आपल्या बोबड्या वाणीत. कधी कधी वाटत शेवटी म्हातारपण येण्याऐवजी The Curious Case of Benjamin Button ह्या ब्रॅड पिटच्या चित्रपटासारखे आपला जन्म म्हातारा म्हणून होऊन शेवटी बालपण जगावे.

पण आयुष्यात काहीही केले, कितीही केले तरी आपले मन भरत नाही, दीपिकाच्या डायलॉगप्रमाणे आयुष्य कसे जगावे तर

life मे कितना भी try करलो बनी कुछ तो छुटही जाता है !

मंग आयुष्य जगताना एकाच चाकोरीमध्ये का जगावे ? आपल्या असंख्य छटा का उमटू नयेत भूतलावर ? मात्र दुसरे उत्तर समोर येते फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागल्यास आपण सचिन तेंडुलकर होऊ देखील, मात्र कधी विचार केलाय का ? 

सचिन किंवा इतर उचभ्रू गृहस्थ कधी फिरले असतील का हो मित्रांसोबत गावच्या जत्रेत मनसोक्तपणे, कधी घेतला असेल का त्याने आनंद भरपावसाळ्यात हरीहर, कलावंतीण, राजगड चढण्याचा ? तुम्ही म्हणाल काय बालिश बोलतो आहे हा !! 

म्हणजे श्रीमंत झाल्यास त्याने मोठमोठाले शौक करावे आणि बाकी राहिलेली ट्रेकिंग असो किंवा व्हराड्याच्या टेम्पोत टपावर बसण्याचा आनंद, येवले चहाचा गरमागरम घोट फक्त मध्यमवर्गीय लोकांना राखीव आहे का ? सांगायचे एवढेच की प्रत्येकाची कक्षा ठरलेली आहे, काही पकडले तर काहीतरी सुटणार आहे ! आपण सचिन सारखे जगू शकत नाही किंवा तो आपले आयुष्य जगू शकत नाही...

आयुष्य कसे जगावे तर मंडळी आपल्या ह्रदयाचे ठोके सुरू आहेत तोपर्यंत मज्या मारून घ्या,

उगाच त्याने माझ्या जन्मदिवसाचे स्टेटस ठेवले नाही, माझ्या लग्नाला आला नाही दाखवतो तुला ! बंद करा राव असले माकडचाळे माणूस आहोत आपण माणसासारखे वागा 🙏 कारण #जिंदगी_नाही_भेटणार_दोबारा
तुमचाच
@ शैलेश कदम

तर aayushya marathi lekh - आयुष्य कसे जगावे हा लेख कसा वाटला नक्की अभिप्राय द्या तुम्ही सुद्धा खाली कमेंट मध्ये सांगा आयुष्य कसे जगावे तुमच्या भाषेत कवितेतून aayushya marathi lekh - आयुष्य कसे जगावे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने