arunachal pradesh tourism 03 अरुणाचल प्रदेश पर्यटन
![]() |
arunachal pradesh tourism 03 अरुणाचल प्रदेश पर्यटन |
arunachal pradesh tourism 03 अरुणाचल प्रदेश पर्यटन
मध्ये नवीन दिवस तसे काहीतरी नवीन ठिकाण हे येणाऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य तर आजच वैशिष्ट्य होता बुमला बॉर्डर याबद्दल आता जास्त काही सांगत नाही.
आज आमच्या सुमो गाडीवर ताशी ऐवजी नवीन ड्रायव्हर आलेला होता त्याच नाव प्रिन्स, तो नावाप्रमाणेच होता हे आम्हाला काही वेळातच समजल (त्याबद्दल वॉलवर एक स्वतंत्र लेख दिलेला आहे) त्याच्या सोबत मनसोक्तपणे गप्पा मारले नंतर आम्ही पोहचलो बिडीबाबाला (रस्त्यावर एक मंदिर आहे छोटूस) पार करत 15200 फुटांवर असलेल्या बुमला बॉर्डरवर पोहचलो.
जसवंत सिंह रावत यांचा पराक्रम व दुष्मन चीन नक्की वाचा व अभिप्राय द्या
याठिकाणी गेल्यावर सर्वांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू एका जागी जमा करून हातात दिवाळीची शुभेच्छापत्रक घेऊन तेथील सैनिकांना देऊ केलीत,
त्यातील काही सैनिक येणाऱ्या भारतीयांना मॅकमोहन रेषा (mcmahon line )समजावून सांगत होते, कोठून कोठे ही सीमा आहे, चीनची हेलिपॅड कोठे आहे सैनिक कोठे असतात
सर्व माहिती समजावून घेतलेनंतर भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या उद्घोषणेत तेथील सैनिकांचा राम राम घेतला.
कोयला चित्रपटात तन्हाई तन्हाई तन्हाई या गाण्यावर ज्याठिकाणी नृत्य केले होते त्याठिकाणी आम्ही आलो, माधुरी लेक म्हणून ती जागा प्रसिध्द आहे, साला माधुरीने एक ठुमका क्या लगाया यह लेक तो फेमस हो गया.
जाता जाता साधारण 2000 फूट खाली उतरले नंतर मराठा ग्राउंड येथे, इकडे आल्यावर प्रथम सैनिकांच्या भेटी गाठी झाल्या.
Arunachal pradesh tourism Maratha ground
त्यानंतर पाहुणचार म्हणून अद्रक, काळी मिरी, लिंबू मारके तयार केलला गरमागरम चहा आम्हा सर्वांना देण्यात आला आमचे tea lover तुपे पाटील यांच्या मनमे लड्डू फुटा अशी गत झाली.
दिवसभर चहाच्या तलफेत असलेले हे अचानक इतका जबरी चहा भेटल्यावर पेटून उठले.
दिवसभर चहाच्या तलफेत असलेले हे अचानक इतका जबरी चहा भेटल्यावर पेटून उठले.
पाहूनचार झालेनंतर आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील सर्वात उंचीवर असलेली मनमोहक अश्वारुढ मूर्ती आहे,
याठिकाणी शिवरायांच्या समोर पणत्यांची आरास करत एक आगळी वेगळी दिवाळी सैनिकांसमवेत साजरी केली त्याची दखल लोकमत, पुढारी वृत्तपत्रांनी सुद्धा घेतली. शिवरायांना मुजरे टाकून आम्ही मावळे पोहोचलो तेथ तवांग फेस्टिव्हल मध्ये आता काय राडा होणार सांगायला नको !!!
arunachal pradesh tourism
मध्ये आजच्या tawang festival night चे खास आकर्षण होते कपिल शर्मा, धूम 3 मधील मलंग फेम गायिका शिल्पा राव, एक तिबेटीन गायक, स्थानीक गायक तोषी. आम्हाला कोणाच देण घेण नव्हत.
आम्हा 15 पोरांचा समूह (काहीनी रूमवर निद्रा घेणे पसंद केले) कदाचित तवांग फेस्टिव्हल करता आकर्षणाचा मुद्दा असावा,
कारण आमच्या 3,4 तासाच्या मौज मस्तीत फेस्टिव्हलमधील स्थानिक मुले कित्येकदा आमच्या मध्ये सहभागी झालीत.
व नाचण्याचा आनंद घेतला, तेथील मुली सुद्धा आम्ही जे नृत्य प्रकार करू त्याचे अनुकरण करत आमच्याकडे पाहून हास्य करीत कदाचित आमचा समूह मोठा असल्याने त्या आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या नाहीत.
एवढच काय फेस्टिव्हलमधील मुख्य कॅमेरे, ड्रोन सुद्धा कित्येकदा आमच्यावर स्थिरावले... सगळ्यात भारी किस्सा त्या स्टेजवर गिटार वाजवणाऱ्या कुलकर्णीचा होता, जाता जाता त्याने कोनाला नाही पण आम्हाला हात करून गेला.
तिबेटी झेंडे bike वर का असतात
आम्ही गेल्यापासून तिथे काही मुले अगोदरपासून नाचत होतीत, तिकडे कपिल शर्माची बोरिंग कॉमेडी सुरू असताना सुद्धा ही नाचायची थांबली नाहीत.
ते इतके energetic नाचत होतीत आम्हाला संशय आला की आणि काहीतरी नशा केलेली असावी पण तस काहीच नव्हत, ही मुले साधारण 5 ते 6 तास न थांबता नाचत होतीत आनंद घेत होतीत,
घरी जाता जाता आमच्या अमोल दादाला व योगेश आलेकरीला गुंड उचलणा-या माणसांचा घोळका दिसला. दमलेले असताना सुद्धा आता ह्यांचा मराठा बाणा जागा झाला, रक्तवाहिन्या हिमालयन बाईक सारख्या धावू लागल्या,
गर्दीला मागे सारत ह्या मावळ्यांनी ती गुंड उंचलून 4 ते 5 वेळा पाठीमागे बिरकावून टाकून दिल्या व आम्ही संतोष जुगदर साहेबांच्या मॅपवर स्वर्गाच्या 100, 200 पायऱ्या चढत चिर निद्रेत विराजमान झालो...
मुंबईकडे रवाना होण्यासाठी
समाप्त.
©शैलेश कदम - सिक्कीम पर्यटन व आमची 700 किमीची bike ridings नक्की अभिप्राय द्या
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
#गावाकडचा_आशिक
#ultimate
#arunachal pradesh tourism in marathi. #tawang monastery's #तवांग मठ मराठीमध्ये #बुमला पास
Post a Comment