Facebook SDK

arunachal tourism 01

 Arunachal tourism मध्ये आपण भेट देणार आहोत अरुणाचल, बुद्ध भूमी तवांग,  मॅकमोहन बॉर्डर, arunachal tourism मधील सर्व स्थळांना, त्यात अनेक माहिती नसलेल्या Arunachal tourism बद्दलच्या गोष्टी यामध्ये आम्हाला समजल्या तर चला वेळ न घालवता सुरू करूया.


arunachal pradesh tourism in marathi 01
arunachal pradesh tourism in marathi 01
   

arunachal pradesh tourism

       गेल्यावर्षी सिक्कीम येथील एक दिवाळी सैनिकांबसोबत ह्या कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, 

त्यामुळे आमच्या ultimate कुटूबांचा ह्या वर्षीची दिवाळी भारताच्या टोकाला असलेल्या अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांग जिल्हामधील बुमला बॉर्डरवर भारत व चिन सिमा म्हणजेच मॅकमोहन रेषेला टच्चुन हो अगदी टच्चुन असलेल्या ठिकाणी जावुन सैनिकांसोबत साजरी करण्याची ठरविली,

त्याप्रमाणे प्लॅन ठरले, सैनिकांसाठी काहिंनी खुप छान, आकर्षक अशी शुभेच्छापत्रके दिलीत, अनोळखी- ओळखीचे सवंगडी जमले व Arunachal tourism ची तारीख ठरली

दि.28/10/2019 रोजीची घरची दिवाळी सोडुन आपले सैनिक ज्याप्रमाणे देशाची अहोरात्र सेवा करीत आहेत त्यांना भेटण्याची, त्यांना जाणुन घेण्याची.

मंग काय आमचे ultimate कुटूंब कोणी मुंबई वरून तर कोणी पुण्यावरून वायुमार्गे निघालो थेट गुवाहाटी विमानतळ (airport near arunachal pradesh), आसाम येथे तस म्हटंल तर भरपुर लोकांचा हा पहिला वहिला विमानप्रवास.

त्यात 3 तासाची हि सफर आम्हाला फिरण्याची हौस म्हणुन आम्ही जातोय कि पैसा जास्त झाला आहे म्हणुन आम्ही बोंबलत फिरतोय अस अनेकांना वाटत असेल तर चुकताय मंडळी तुम्ही !!!

 

अरुणाचल पर्यटन- भाग 02 नक्की आनंद घ्या व जाणुन घ्या बौध्द धर्म आणि बरेच काही-

 

आम्ही जातोय ते भारतीय सैनिकांना धीर देण्यासाठी, आपलुकी जागवण्यासाठी तुम्ही सिमेवर आहात म्हणुन आम्ही ह्या उघड्या आभाळाखाली बिनदास्त वावरत आहे. सर्व सण, सुट्टया, मौज-मस्ती नित्यनियमाने उपभोगत आहे.

पैसाचे बोलाल तर आम्ही सर्व महिन्याकाठी मिळणा-या पगारात घर चालवणारी शिवबाची मावळ आम्ही 19 भारी ! देशासाठी काहितरी आपले देण आहे त्याचाच हा वाटा समजा...

तर काहिंनी पुणे विमानतळावरून प्रवासास सुरुवात केली तर काहिंनी घाटकोपर रेल्वे स्टेशन, मेट्रो वारी करीत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून,

सर्व मंडळी मुंबई विमानतळावर पोहचताच कोणामध्ये कोणता न्युनगंड होता अस वाटल नाही, कारण कोणत्याही नवीन परिस्थीतीपुढे नमायचे नाही हे आमच्या शंभु राजांची शिकवणी,

आम्ही सर्वांनी विमानतळावर जेमतेम फोटो काढुन सुरुवात केली विमान प्रवासास कोण कुठे तर कोण कुठे बसलेले त्यामुळे बाजुला बसलेल्या अनोळखी माणसांसोबत बोलण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता,

भारतातील विमान सुध्दा उशीरा उडत बरका लक्षात असुद्या बाकी काही नाही !!!

सफेदभोर हवाई सुंदरींनी व पंजाब दा पुत्तरने सेफ्टी बेल्ट कसा लावावा, ऑक्सीजन मास्क कसा लावावा याचे प्रात्याक्षिक दिले व त्यानंतर सेफ्टी जॅकेट सिट खालुन कसे काढावे व कसे वापरावे हे एका ओळीत सांगुन बाई निघुन गेली,

आम्ही तिच्याकडे बघतच राहिलो कारण सिट खालुन डोकावुन पाहिले पण घंटा कोणाला समजले नाही की जॅकेट कोठे आहे व कसे वापरावे, अस कुठ अस्त व्हय ? पण अस्तय, अस्तय इमानात असच अस्त.

आमचे उशीरा असलेले विमानाने अवकाशास पकडण्यास सुरुवात केली.

 

विमान उडल्यानंतर काहिवेळ छान वाटल, हळु हळु विमान कापसासारख्या ढंगामध्ये जावु लागले तसी आमची विमानाची उत्सुकता संपली.

कारण एक तास खिडकीच्या बाहेर पाहिले तर ढग नुसते ढगच आणि बाजुला पाहिले तर स्टॅंडर्ड जपण्यासाठी उच्च वर्गाची इंग्रजी झाडणारा भारतीय माणुस ह्यापेक्षा दुख ते काय ?

ना पुढील स्टेशन ठाणे, ना स्वारगेटवाले पुढे सरका, पुढे सरका म्हणणारा बेस्टचा कंडक्टर कसेबसे तीन तास खर्ची घातले.

नंतर कान हवेने पॅक झालेलो आम्ही सर्व एकत्र मिळालो ते गुवाहाटी विमानतळावर तिथेच एक हॉटेल बुक करून आम्ही सर्व मंडळी झोपी गेलो उद्याच्या प्रवासासाठी ....

क्रमशः Arunachal tourism part 02 करीता 

© शैलेश कदम


हे सुद्धा वाचा - 

Arunachal tourism 02

दलाई लामांची निवड कशी होते जाणुन घेवु

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post