Facebook SDK

arunachal tourism 02

arunachal tourism 01 मध्ये आपण पाहिलात मुंबई ते आसामचा विमान प्रवास मात्र खरे arunachal tourism तर पुढे आहे म्हणजे बुद्ध धर्म आहे कसा, तवांगचा मठ वगैरे तर चला सुरू करूया arunachal tourism 02 ला.


arunachal pradesh tourism 02

arunachal pradesh tourism

आम्ही मुंबई   वरून गुवाहाटीला आलो आणि गुवाहाटी वरून सकाळी सकाळी लवकर उठून 19 लोकांची टोळी दोन गटात विभागली एका सुमो गाडीचे नेतृत्व #ultimate man योगेश आलेकरी व आमचे दिलखुलास पाटील रोहित तुपे यांनी केले.

सोबत सुमो चालक बडा भाई तर दुसऱ्या सुमो गाडीचे नेतृत्व मंडळाचे आधारस्तंभ वि-शांत वचकल व सर्व आघाडीवर अभ्यास असणारे वैभव बांदल यांनी सोबत सुमो चालक - ताशी (रेल्वे ताशी किती वेगाने धावते असले गणिताचे सूत्र वगैरे नाही त्याचे आडनाव ताशी आहे).

तर अश्या दोन सुमो गाड्या एका मागोमाग (guwahati to tawang) गुवाहाटी मागे ठेवून रात्री पोहचल्या तेथे तवांग जिल्हयात (tawang district) मध्ये गेल्यावर मित्रांच्या ओळखीच्या एका हॉटेलात (hotel in tawang) चार रूममध्ये सर्वांनी बस्तान बसविले.

मंग काय दोन दिवस व दोन रात्री आमच्या प्रवासात व झोपण्यात गेल्या म्हंटल तर वावग ठरणार नाही पण आम्हाला त्याच काही वाटल नाही कारण आपल घर सोडून थोडीच आपण एवढ्या लांब तक्रारी करायला आलोय...

रात्री उशिरा झोपून पण सर्व मित्र सकाळी लवकर उठली तशा तवांगचा सूर्य लवकरच उगवतो म्हणून ह्या राज्यास उगवत्या सुर्याचे राज्य म्हणत असतील, (land of rising sun state in india).

आम्ही उठलो तेव्हा कुठे उन्हे पडायला सुरुवात झालेली हॉटेलच्या गॅलरीमधून तवांगचे दृष्य (tawang weather) नजरेत भरावेच ऐसेच होते.

 

अरुणाचल प्रदेश भाग 01 नक्की अभिप्राय द्या

 

लाकडी घरांवर, दुकानांवर अलगद सूर्याने आपला हात ताठ करून बुद्धभूमीस कोणता तरी वर द्यावा असा प्रकाशझोत सर्व घरांवर पडलेला, वाऱ्याच्या थंडगार झुळूकीसोबत सर्व तवांग जिल्हा (tawang district) मध्ये गेल्यावर मित्रांच्या ओळखीच्या एका हॉटेलात (hotel in tawang) चार रूममध्ये सर्वांनी बस्तान बसविले.

ज्यामुळे सुशोभित दिसत होता.

त्या निळ्या, पांढऱ्या, हिरव्या, पांढऱ्या, पिवळ्या पाच रंगाच्या पट्ट्या वाऱ्यासह झुलत होत्या (त्या पट्टांबद्दल  (tibetan pryaer flags) माहिती स्वतंत्र लेखात दिली आहे) जणू स्वप्नात सुद्धा याचा विचार कधी केला नव्हता ते समोर पाहत होतो...

आता प्रत्येकाची प्रातर्विधी उरकण्याची लगबग सुरू झाली, काहींना गरम पाणी मिळाले, तर काहींनी तोंड धुवून गप्प बसण्यात समाधान मानले,

पण असल्या थंडीमध्ये गप्प बसेल तो आमचा पै. अमोल दादा कसला गड्याने थंड पाणी अंगावर ओतून अंघोळीच्या नित्यनियमात खंड पडू दिला नाही,

सर्वजण आपापल्या सवारीमध्ये स्थानापन्न झाली, गाड्या निघाल्या थेट तवांग मॉनेस्ट्रीकडे, तस पाहिले तर पोटाला पॅलेस, ल्हासा, तिबेट मधील मठानंतर आशियातील हा दुसऱ्या क्रमांकाचा मठ ज्याची स्थापना 1680 च्या सुमारास मराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी केली.

यामध्ये 24 फूट उंचीची पिवळ्या वस्त्रामध्ये असलेली सोनेरी बुद्ध मूर्ती दिसेल त्यांच्या पुढे ध्यानधारणा, विपश्यना करण्यासाठी गाद्या संपूर्ण मठामध्ये दिसतील...

या तवांग मठाकडे प्रवेश करण्याअगोदर काकालिंग नावाचे अतिशय सुंदर असे प्रवेशद्वार आहे.

त्याच्या बाजुस एक मोडकळीस आलेले व सध्या बांधकाम सुरू असलेले पुरातन पुस्तकालय आहे, तवांग मठातून बाहेर आल्यावर आपल्याला एक छानस दृश्य दिसेल.

जणू लाल मुंग्या अस्तव्यस्त फिरत आहे म्हणजेच लाल रंगाची कपडे घातलेले, डोक्यावरील केस अगदीच कमी केलेले, छोटे, छोटे भिक्षु दिसतील, त्यांना फोटोसाठी विचारले तर आपल्यापासून चार हात लांब पळून जातात...

सदर (तवांग मठ ) tawang monastery मधून बाहेर लागूनच एक पुरातन संग्रहालय आहे यामध्ये आपल्या तवांग संस्कृती बद्दल भांडी, हत्यारे, सुवर्ण पुस्तक, पोशाख इत्यादी पुरातन वस्तू पाहायला मिळतील.... tawang monastery stay करीता उपलब्ध नाही.

tawang monastery मधुन खाली उतरून आम्ही थेट गेलो, तवांगचे खास आकर्षण असलेली अवाढव्य अशी बुद्ध मूर्ती, खालून वर पाहिले तरी स्मित हास्य करून ध्यान मुद्रेत लिन असलेले सिद्धार्थ थेट अवकाशाचा गवसणी घालतात, याठिकाणी केलेलं time lapse तर लाजबाब येतात,

वातावरणात साफ असल्याने आम्हाला येथील नजारे अजुन आकर्षित करीत होते...

हे सर्व पाहता पाहता साधारण रात्र झालेली समजली नाही, आजचा शेवट होता war मेमोरियल मध्ये येथेच गेल्यावर 1962 चे भारत चीन युद्ध, त्याची पाश्र्वभूमी, चाल- चढाया याबाबत सर्व काही मोठ्या पडद्यावर तसेच सैनिकांनी तयार केलेल्या देखाव्यात आम्हाला पाहिला मिळाले त्याठिकाणी शुभेच्छा पत्रके वाटून आम्ही रवाना आमच्या हॉटेलकडे दिवसाची सांगता करण्यासाठी.....

क्रमशः

©शैलेश कदम

या लेखात how to reach tawang monastery, tawang monastery, tawang monastery stay, तवांग मठ, तवांग पर्यटन, तवांग जिल्हयाची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.अरुणाचल पर्यटन भाग - 03 नक्की वाचा व अभिप्राय द्या

Post a Comment

Previous Post Next Post