Attitude असावाच मराठी बोधकथा संग्रह bodh katha in marathi

मराठी बोधकथा संग्रह  bodh katha in marathi  


आम्हाला ही मराठी नवीन बोधकथा रावडीच्या हायस्कुलमध्ये संस्कृत विषय असताना शिकवली आहे. या गोष्टीमध्ये छान असा संदेश सोबत बोध आहे ही चांगली मराठी बोधकथा वाचल्यास समजेल तर चला सुरू करूया.

मराठी बोधकथा


एक आटपाट नगर असते व तेथील जंगलात एक साप राहत असतो. हा साप आटपाट नगरातील प्रजेला खूप त्रास देत असे, जंगलातून जाणाऱ्या - येणाऱ्या, गुरांकडे जाणाऱ्या व्यक्तीला हा साप काही कारण नसताना चावत असे यामुळे अनेक गावकरी मृत झाले.

यामुळे तेथील प्रजा त्रस्त झाली होती त्यांनी देवांचा धावा सुरू केला असता. साप ज्याठिकाणी राहतो त्या वारूळाच्या जवळ नारदमुनी अवतरले व त्या सापाला म्हणाले " हे नागराज तू विनाकारण का ह्या निरपराध गावकऱ्यांना त्रास देत आहेस त्यांना मारत आहेस, 

यावर नागराज म्हणाला, देवर्षी नारद मी जर ह्याना मारले नाही तर हे गावकरी मला मारतील, मी स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना मारत आहेत.

बोधकथा in marathi
मराठी बोधकथा संग्रह


यावर नारदमुनी म्हणाले- हे नागराज तू विनाकारण ह्या लोकांचा बळी घेत आहेस, तू त्यांना चावू नकोस असे म्हणून नारदमुनी निघून गेले.

काही महिन्याने नारदमुनी त्या जंगलातून फिरत असताना, तो साप अनेक जखमांनी भरलेला दिसला, त्याला नारदमुनी म्हणाले हे नागराज - तुमचे हे हाल कसे झाले.

नागराज म्हणाला- हे नारदमुनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी, गावकऱ्यांना त्रास देणे सोडून दिले, त्यामुळे मला कोणीसुद्धा घाबरेना झाले, मला काठ्या, दगडांनी मारू लागले मी कसा बसा वारुळात लपून जीव वाचवत आहे.


नारदमुनी म्हणाले- हे नागराज, मी तुला त्यांना जरूर चावू नकोस अस सांगितले होते, मात्र फणा उगारु नकोस अस थोडीच बोललो होतो. ज्यावेळी तुझ्या जीवावर आले होते त्यावेळी तू जरी फणा उघडला असता, तरी तुला मारणारे लोक अर्धमेले झाले असते व पळून गेले असते. 

ज्यावेळी स्वतःच्या जीवावर, प्रतिष्ठेवर ही गोष्ट येते त्यावेळी चावण्यापेक्षा फणा उगरणे विसरू नये तू तेच विसरलास आणि असह्य, दुबळा होऊन बसलास. खर तर तुझ्या विषापेक्षा लोक तुझ्या फण्याने जास्त घाबरत होते हे विसरू नकोस असे म्हणून नारदमुनी निघून गेले.

मराठी बोधकथा तात्पर्य 

मंडळी यावरून प्रत्येकाला काहींना काही बोध नक्की मिळाला असेल. कारण आपण कुत्रा चावू किंवा न चावू त्याच्या भुंकण्याने अर्धमेले होतो त्यामुळे आपला आक्रमक पवित्रा योग्य वेळी वापरात आणलाच पाहिजे मंग आपण किती सुद्धा शांत दिसू अगदी शांत वाहणाऱ्या समुद्रासारखे...
© शैलेश कदम

Tags - bodh katha in marathi | marathi bodh katha | मराठी बोधकथा संग्रह | मराठी बोधकथा लहान | मराठी बोधकथा लहान | मराठी बोधकथा तात्पर्य

अश्याच काही कथा 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने