Facebook SDK

औरंगाबाद दर्शन 


कार्यालयात काम करीत असताना वरून विचारल गेल औरंगाबाद जाणार का ? आमच्या सारखे भटके चालून आलेली संधी थोडीच सोडणार मंग काय मारल रेल्वेच तिकीट अन सुरु केला प्रवास अन पोहचलो ठाण्याहून ७ तासात औरंगाबाद त्यात हे शहर आपल्याला नवख पण मित्र परिवार तेथील असल्यामुळे आमचा बेत ठरला.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद

 पहिला दिवस बाबा ST स्थानकातून कन्नड st पकडून कूच केली ती दौलताबाद्च्या दिशेने १५ कि.मी अंतर पार केल्यावर गाडीतून उतरल्या उतरल्या दुष्टी पडतो भुईकोटांचा राजा किल्ला दौलताबाद. किल्ल्यात प्रवेश करताच लागतो तो अवाढव्य दरवाजा व बाजूला किल्ल्याच्या भविष्याचा विचार करून तयार केलेल्या विविध प्रकारच्या धातूच्या तोफा अजूनही त्याच डोलात उभ्या आहेत.

 सध्या आमचे भविष्य देश रक्षण करणा-या देशाच्या जवानांच्या बुलेटप्रूफ jacket व व्यापारासाठी लागणाऱ्या बुलेट ट्रेन मध्ये अडकलेले आहे.

अजून पुढे जाताच नजरेत भरतो पूर्ण किल्लयावरील प्रत्येक हालचाल टिपणारा गरुडासम नजरेचा १०० फुटी चांद मिनार व उजव्या बाजूस भारतमातेच मंदिर आहे तिथले अवशेष काही औरच सांगतात कधी मंदिराची मस्जिद झाली तर कधी मस्जिद चे मंदिर कारण येथे येणारा प्रत्येक राजा आपल्या धर्मानुसार स्थापत्य करत असावा. 

पुढे गेल्यावर आहे चीनी महाल ज्यामध्ये महाराणी येसूबाई ब शाहू राजे यांना कैद करून ठेवले होते अस समजल काही अंतर गेल्यावर सुरवात होते ती किल्ल्याची अजून न उमगलेली बाजु भूलभूलय्या.आम्ही गेलो तेव्हा एकच अंधारी चालू होती ज्याने थेट किल्ल्यावरती जाता येत. 

बाकीचे भूलभूलय्ये बंद केले आहेत कारण स्वत रजनीकांत जरी गेला तरी परत येऊ शकत नाही तिथे आपली काय कहाणी ह्या भूलभूलय्याचा उपयोग शत्रू सैनिकांना गरम तेल, विषारी काटे, विषारी बाण असे विविध उपाय करून जायबंदी करण्यास होत असे. 

अजून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस दिसते ते गणपती बाप्पाच मंदिर व समोरच द्रुष्टी पडतो बारादारी मुघल सुभेदाराची निवासाची इमारत. इमारत पाहून पुढे गेल्यावर दिसते काला पहाड नामक तोफ व सर्वात वरच्या भात तोफेची सम्राद्नी दुर्गा तोफ ज्यावर श्री दुर्गे अस कोरलेल आहे.

Devgiri

Arungabad Devgiri fort - daulatabad


ह्या किल्ल्यास यादवांनी बांधला नंतर महमद तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद केले याच ठिकाणी बहामनी सत्तेचे ५ शाही मध्ये रुपांतर झाले. हा किल्ला शेवट पर्यंत अजिंक्य राहिला कारण हा किल्ला सैनिकांच्या बळावर जिंकणे अशक्य ते पाहताच शत्रू समजून जातो जर हा जिंकायचाच तर फितुरी अन विश्वासघात या शिवाय पर्याय नाही. 

हा किल्ला पाहण्यासाठी दोन-अडीच तास पुरे होतात ह्या किल्ल्यासाठी योद्ध्यांनी आपल्या रक्तानी अभिषेक घालून हि दौलत जपण्याकरिता जो रक्तरंजित इतिहास घडवला तो उगीच नाही. ते हा किल्ला पाहिल्याशिवाय समजणार नाही.ह्या किल्ल्याच्या धुंदीत आम्ही परत तेथून जीप गाडी पकडून पुन्हा १५ कि.मी पुढे वेरूळ लेणी पाहण्यासाठी हजर झालो

aurangabad maharashtra ajanta ellora

aurangabad maharashtra ajanta ellora


तेथील लेण्यांचे थक्क करणारे सौंदर्य न्हाळण्यासाठी चालत चालत आपल्याला ३ तास लागतात फोटोसाठी कॅमेरा चांगला हवा जर मोबाईल मध्ये काढणार असाल तर सोबत power bank असावी. लेणी पाहताना काही लेण्यामध्ये बौध्द व हिंदू लेणी दिसतात.वेळोवेळी झालेल्या हल्ल्यामध्ये लेण्यांना हाणी पोहोचलेली पाहून उपद्रव करणाऱ्यांचा राग येणे स्वाभाविक आहे.

aurangabad ajanta ellora

aurangabad ajanta ellora


लेणी पाहून झाल्यावर आम्ही चालत १० मिनिट अंतरावर असलेल्या घृष्णेश्वर मंदिराजवळ गेलो तिथेच औरच कहाणी तेथे विक्री करणारे चप्पल ठेवायचे आमिष दाखवून खरेदी करायला लावतात. 

त्यामुळे आम्ही तेथे bag ठेवून मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर तेथे विक्री करणा-या महिलांनी किंमत जास्त लावली थोडी खडाजंगी नंतर आम्ही पुढे निघालो. मी कधी कोणत्या मंदिरात नारळ वगैरे वाहत नाही देवाला फक्त आपली उपस्थिती हवी असते त्याला आपल्याकडून लालच नको आहे आपण २ रुपयाचे देणार व हजारोचे मागणार ज्याला करायच आहे तो स्वबळावर करील त्याला देवाची साथ मिळेल.

मंदिराबाहेरील गाड्या सारख्या चालूच असतात. आम्ही गाडी पकडून थेठ गेलो खुलताबादला तेथून म्हैसमाळ जवळ आम्ही गेलो नाही कारण थंड हवेच्या ठिकाणी राहणारे आम्ही कश्याला जाणार थंड हवेच्या ठिकाणी. 

अश्यात घडयालच्या काट्याने रात्र समीप आल्याचे संकेत दिले मंग खुलताबादला प्रथम भद्रा मारुतीचे दर्शन घेतले व तेथील संस्थान मध्ये २५० रुपयामध्ये रूम भाडेतत्वावर घेतली व २५ रुपयाची जेवणाची थाळी घेऊन दुस-या दिवसाचा बेत ठरवून झोपी गेलो.
 
दुसरा दिवस खुलताबादला आलमगीर औरंगजेब व मलिक अंबर याची कबर आहे तेथे मुदाम गेलो नाही कारण औरंगजेब म्हणाला असता.

      ये रब्बा ये मरहटे पगला गये है क्या
      जब जिंदा था तब शिवाके खौफने जिने नही दिया
      अब मरनेके बाद मेरे कब्रतक आ गये, सुकून से मरने बी नही देते ये लोग 

      दिवस सुरु होताच औरंगाबाद स्थानकातून पकडला लाल डब्बा कायदेशीर १२० रुपये मोजून १०० कि.मी अंतर पार केले कि आली अजंठा लेणी. दुपार झाली होती मंग ७० रुपयाची थाळी घेतली त्याठिकाणी विदेशी पर्यटक आले होते त्यांचेकडून १०० रुपये घेतले तेव्हा माझे पोट भरल्यासारख वाटल. 

मंग कूच केली लेण्याकडे हि लेणी पाहताना उत्साह कमी झाला कारण माझ्या दुर्ष्टीने वेरूळची लेणी उजवी होतीत इथे फक्त खास वाटल ते झोपी गेलेले बुद्ध प्रतिमा व येथील प्राचीन रंगकाम या ठिकाणी परत याव अस वाटल नाही कारण प्रवास खूप आहे. 

त्यानंतर highway वरून जाणारी जीप पकडली गाडीत टेप चालूच होता तुझे ना देखू तो चैन मुझे आता नहि हे याच धुंदीत पोहचलो औरंगाबादला तिथे मित्राने राहण्याची सोय केली होती. थकलो भाग्लेलो आम्ही अनतांत विलीन झालो.

औरंगाबाद अजंठा लेणी

औरंगाबाद अजंठा लेणी


उजाडला तिसरा दिवस लवकर उठून ९ वाजता गेलो पानचक्की. छान संकल्पना पाण्याच्या उपोयोगाने आपण जात फिरवून त्याद्वारे धान्याचे पीठ तयार करू शकतो. त्यानंतर चालत-चालत गेलो ते बीबी का मकबरा हा औरंजेबाच्या मुलाने त्याच्या आईसाठी बांधला असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा - 

 

Bibi ka maqbara

औरंगाबाद बीबी का मकबरा


मकबरामध्ये औरंगजेबाची पत्नी राबियाची कबर आहे. या ठिकाणी भरपूर विदेशी पर्यटक येतात पण त्यांना स्मितहास्य करून आम्ही पुढे निगुन जायचो त्यांच्या रंगरूपाला पाऊन आम्ही त्यांच्या प्रेमात मात्र आम्ही अजिबात पडलो नाही कारण त्या twilight मधील bela अन मी fandry मधील जब्या असो. 

हि विदेशी इकडे भारतात येतात कारण त्यांच्या देशात पाहण्यासाठी काही नाही अन आपल्या देशात न पहाव अस काही नाही.  पण असा एतिहासिक वारसांसाठी सरकारने योग्य त्या मध्यामातुन उपाय योजना राबवणे आवशयक आहे. आपण औरंगाबाद २ दिवसात पूर्ण पाहू शकता. तर कधी जाताय ?
विशेष आभार- विकास राजपूत, माउली नरोडे व इंद्रा जोगदंड.

आपण नुसत पैसाच्या माग धावून धावून मरणानंतर शांतता स्मशानातच लाभेल  
जर भूगोल व इतिहासाचा संगमाचा अनुभव घेतला तर जिवंतपणी स्वर्गसुख लाभेल

असा होता आमचा प्रवास औरंगाबाद म्हणजेच आपले संभाजी नगर होय. 

Post a Comment

Previous Post Next Post