Facebook SDK

अंजिक्य रहाणे व अजिंक्य भारत

अंजिक्य भारत ( भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी 2021) भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीत दाखल होताच, सर्वच क्रिकेट तज्ञ यांनी भारताचा दारुण पराभव होणार हे भाकीत वर्तवली, त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून की काय त्यात अजून एक भर पडली व भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत लाजिरवाणी पराभव झाला...

त्यात शेम्बड्या तैमुरला प्रतिस्पर्धी जन्माला आल्याने विराट धावत भारतात पोचला आणि पनव्हती गेल्याने म्हणा किंवा अजून काही, इथून पुढे जे घडले, त्याने पूर्ण क्रिकेट विश्व आवाक झाले. 

सिराजच्या वडिलांचे निधन झाले तरी तो वर्णद्वेषाचे शेरे विसरून खेळपट्टीवर टिच्चून मारा करत होता, विराटसारखा भारतीय संघाला सोडून गेला नाही, बालिश, बिनभरोशी, वसिल्याच्या वाटणाऱ्या ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियन चिडख्या खेळाडूंची कपडे त्यांना घरचा आहेर म्हणून की काय क्रिकेट विश्वासमोर टराटरा फाडून टाकलीत. 

जगातील 3 दिगग्ज विलीयम्सन, कोहली व स्मिथ यातील स्मिथ मनातून उतरून गेला, टीम पेन कर्णधार स्वतःला अफजल्या समजून गाफील राहिला हातातून अनेक सोप्पे झेल, स्टम्पिंगच्या संधी त्याने सोडून दिल्या व शेवट बघाना ऑस्ट्रेलियन टीमचा माज, घमंड, वर्चस्व, अस्तित्वाचा भारतीय संघाने कोथळा फाडला.

पुजाराला नाव ठेवण्यात अर्थ नाही, कारण स्टार्क, कमिन्स, हेजलवूड यासारख्या दिगग्ज पण तितक्याच रडक्या कांगारून गोलांदाजांचे बाऊन्सर पचवणे सोप्पी गोष्ट नव्हती त्यात विकेट टिकवून एक बाजू लढवत ठेवणे ही बाब महत्वाची नाही का ? 

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धार नवख्या शार्दूल ठाकुरने व वॉशिंग्टनने सुंदर  बोथटली. त्यापेक्षा भारतीय गोलंदाजांचा मारा तिखट झाला यात दुमत नाही. 

नटराजन, सिराज, शार्दुल, वॉशिंग्टन लाजवाब कामगिरी.. तेंडुलकरचा जावई होईल न होईल पण शुभमन गिलने opener ची कमतरता भरून काढली, त्यात जसप्रीत, अश्विन, सर जडेजा यांना विसरून चालणार नाही. यातबरीच आपल्या द्रविड सरांचे विद्यार्थी बर का !!!!नेमका भारतीय संघाचा प्रशिक्षक पोटफुगे शास्त्री होते की द्रविड गुरुजी समजले नाही. 

अंजिक्य रहाणे व अजिंक्य भारत 2021

विराट आणि अजिंक्य रहाणे दोघांमध्ये बऱ्याच गोष्टीत तफावत, एक तापट तर दुसरा तितकाच शांत, एकाच्या तोंडात नुसत्या शिव्या तर दुसऱ्याचा चेहरा सर्वकाही बोलून जातो. 
नवीन खेळाडूंना सांभाळून घेण्यासाठी शिव्या देणारा नाही तर अजिंक्य रहाणे सारखा प्रोत्साहन देणारा कर्णधार होता म्हणून की काय, ह्या पोरांनी खेळामध्ये चुका विसरून जीव लावून दिला. 

जोपर्यंत विजयाचा शेवटचा चौकार बसला नाही तोपर्यंत अजिंक्य रहाणे स्तब्ध होता, त्यानंतर त्याने रोहितला मिठी मारून विजयाचा मनसोक्तपणे आनंद घेतला. 

कमी फौजफाटा सोबत असताना सुद्धा असा विजय मिळवणे अशक्य होता शेवटी, विजयी ट्रॉपीचा ताबा सुद्धा त्याने नवख्या खेळाडूंकडे सुपूर्द करून बाजूला झाला काय म्हणाव याच्या ह्या स्वभावाला, पाठींब्याला.

IPL सारख्या पैशाच्या बाजारात ज्याला डावलले गेले त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर धिंगाणा घातला व आतापर्यंतच्या कसोटी कर्णधारच्या यादीत व भारतीय प्रेक्षकांच्या मनात अंजिक्य रहाणे अजिंक्य राहिला...  अजिंक्य असो किंवा ठाकूर खरच मानल तुला !!!

@शैलेश कदम
#क्रिकेटरसिक 

आठवणी - अंजिक्य रहाणे व  अंजिक्य भारत ( भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी 2021) 

2 Comments

  1. नावाला साजेसा खेळ करुन दाखवला अजिंक्य ने... सुंदर लिखाण शैलेश 👌👌👍👍

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर 🙏💞

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post