संताजी घोरपडे यांचा पराक्रम पोवाडा

संताजी घोरपडे यांचा पराक्रम पोवाडा

Tags - संताजी घोरपडे का पवाड़ा,  संताजी घोरपडे पराक्रम,  संताजी घोरपडे, संताजी घोरपडे यांचा पराक्रम, संताजी घोरपडे यांचा पोवाडा

संताजी घोरपडे यांचा पोवाडा

पाठी ढाल, हाती तलवार, कमरेला करकच्च बांधला शेला

दुष्मनास मी धूळ चारतो, राज... मुजरा घ्यावा मुजरा

आज्ञा घेवून गडी रांगडा, रणमार्तंड चढला घोडी

मूठ आवळली, रक्त खवळले, डोळ्यात विस्तव झाला गोळा

टाच मारता अश्व इनामी, तुडवू लागला बिकट सह्याद्रीच्या वाटा

दिसता गनिम हात रोखला, तलवार- भाल्यासह उत्स्फुरतल्या मराठा फौजा

हर हर हर हर महादेव एल्गारासी, संतानी केव्हाच अभिषेक तलवारीचा केला

चौफेर भगवे वादळ घुमू लागले, तलवारीवर तलवार धडकल्या ढालीवरती ढाला

अगणीकास यमसदनी धाडले, घुसवले कित्येकांच्या जिव्हारी भाला

उभे- आडवे कापीले वैरी, मृत्यूला सामोरी पाहता बिथरली दुष्मनाची सैना

संताजीच्या रौद्राचा अंकुश लागून, हत्ती-घोडे झाले सैरा वैरा

मराठ्यांचा सेनापती जर ऐसा त्यांचा राजा असेल कैसा

हत्यार टाकून शत्रू पळाले, भागो संता आया संता

धरणीमाय नाहली रक्ताने, रणभूमी झाली धन्य, धन्य

विजयी मुद्रा घेवून रायगडी पोहचली संताजीची स्वारी,

पाठी ढाल, हाती तलवार, कमरेला करकच्च बांधला शेला

दुष्मनास मी धूळ चारली, राज... मुजरा घ्यावा मुजरा, राज... मुजरा घ्यावा मुजरा.

© शैलेश कदम

संताजी घोरपडे यांचा पराक्रमाचा पोवाडा

Tags - संताजी घोरपडे का पवाड़ा,  संताजी घोरपडे पराक्रम,  संताजी घोरपडे, संताजी घोरपडे यांचा पराक्रम, संताजी घोरपडे यांचा पोवाडा

संताजी घोरपडे यांचा पराक्रम पोवाडा
संताजी घोरपडे यांचा पराक्रम पोवाडा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने