Facebook SDK

police bharati mahiti

पोलीस भरती कागदपत्रे, पोलीस भरती प्रश्नपत्रिका,  पोलीस भरती ट्रेनिंग, पोलीस भरती माहिती, पोलीस भरती वयोमर्यादा, पोलीस भरती अभ्यासक्रम, पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म 

पोलीस भरती आणि मी

पोलीस भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीची गोष्ट  खास तुमच्यासाठी -

police bharati mahiti
पोलीस भरती माहिती


पोलीस भरती 

पोलीस भरतीची जाहीरात झळकल्यानंतर पोलीस भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहणारे इच्छुक उमेदवार उत्साहात तयारीला लागतात तर काही उमेदवार अगोदर पासूनच अविसरत तयारी करीत असतात.

पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म भरण्याची माहिती मिळाल्यावर ते पुन्हा एकदा स्वताला सिद्ध करण्याच्या तयारीला लागतात. कोणी घर सांभाळून मैदानाची तयारी करीत असतो तर कोणी पूर्णवेळ स्वताला झोकून देत असतो मात्र यामध्ये नुसती दिखावगिरी करून गावात हवा करणारे मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात.

दिवसाचा सराव संपल्यानंतर मंग चर्चासत्र रंगते ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते तालुक्याच्या आमदारापर्यंत त्यात भावड्या सारखा हुशार उमेदवार सर्वाना समजावून सांगून दिवसाची सांगता करत पुस्तकांची, पोलीस भरती प्रश्नपत्रिका यांची देवाण-घेवाण चालूहोते कोणी k-सागर वापरत तर कोणी तात्यांचा ठोकळा मंग प्रत्येक जन आपल्या आपल्या घरी जातो

कोणी दुसऱ्या गावातून आलेला असतो तर कोणी त्याच गावातला. हळू-हळू पोलीस भरती ऑनलाइन फोर्म भरण्याची तारीख जवळ येते तसी प्रत्येकजन कोठे जागा जास्त, कोठे कमी स्पर्धा कोठे असेल कोणत मेरीट गेल्यावेळी कमी लागल याचे निष्कर्ष विचारात घेतात.

अगोदरच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका गोळा करतात व सर्व मिळून एकामागोमाग पोलीस भरती कागदपत्रे जमा करून फोर्म भरण्यासाठी तालुक्याचे ठिकाण घाटून फोर्म भरून टाकतात.भारतीय सैनिक होणे सोप्पे नाही

पोलीस भरती माहिती

मंग अश्यातच मैदानाचा कसून सराव चालू होतो पहाटे-पहाटे कोंबडा आरवायच्या आत गावची भटकी कुत्री चुकवत, गावात साखरझोपेचा थर पसरलेला असताना हि पोलीस होण्याचे स्वपन उराशी बाळगलेले जवान मैदानावर घाम गाळत असतात.

कोणी लांब उडी कमी जाते म्हणून तर कोणी गोळा कमी जातो म्हणून हतबल होतो पण त्यांच्या दुर्देम इच्छाशक्ती पुढे आकाश हि ठेंगण वाटायला लागत.कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमाप करण्याचा दिवस जवळ येताच.हि मंडळी मंग स्वप्नाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत पुढे जातात. कोणी उंची कमी म्हणून बाहेर जातो तर कोणी छाती कमी म्हणुन बाहेर जातो बाहेर गेल्यावर हे धाय मोकलून रडतात कारण त्यांनीथोडीच हे दिवस पाहण्यासाठी स्वपननगरीत जीवापाड मेहनत करून सहा-सात महिने खर्च केलेले असतात.

अचानक भावड्या व त्याच्या मित्रांच्या मोबाईलवर वर संदेश येऊन धडकतो कि आमुक-आमुक दिवशी तुमची मैदानी चाचणी होणार आहे तर ह्या ठिकाणी, ह्या वाजता हजर रहा.

मंग भावडयाची झोपच उडते.मैदानी चाचणी ठिकाणी जाण्यासाठी तो २-३ दिवस अगोदर घरातून निघतो ते पण परक्या माणसात, अनोळखी ठिकाणी जाता-जाता त्याची भाबडी आजी कोणत्या तरी देवाचा अंगारा पुडीतबांधून देते.तर आई जेवणाची सोय म्हणून कागदात चपाती-भाजी व एखादी जास्त दिवस टिकणारी चटणी देते.

अन बाप पैशाची जमवा-जमव करतो. अशी परिस्थिती महाराष्ट्रात लाखो घरात असते प्रत्येकाला वाटत असत माझ्या बाबान खाकी घालूनच याव.परंतु ह्या संवेदन लोकांना कोण सांगणार कि बोटांवर मोजणाऱ्या जागांमध्ये ह्याला आपल नशीब आजमावयाच असत.

मंग भावड्या मैदानाच्या जवळच्या ठिकाणी मित्र परिवारासह ठाण मांतो त्याच्या स्वपनाला आज आभाळान चांदण ओढलेल पांघरून असत व धरणीमायेच आथरून.

तो झोपताना धरणीमाईला कान लावून गावच्या आठवणी ऐकत उद्याच्या भविष्याचा भाग होण्यासाठी झोपी जातो. उद्याच्या दिवस पाहण्यासाठी त्याने अश्या कितीतरी रात्री मोकळ्या आकाशाखाली घालवलेल्या असतात. 

अश्यातच रात्रीच रुपांतर पहाटेत झालेल असत. मंग प्रातर्विधी आठपुन (सध्या याची सोय सरकारने केलेली असते.) मैदान गाजवायला ग्लुकोज पावडर पाण्यात मिसळून तयार होतो.अश्यातच चेस्ट क्रमांक लावून भावड्या मैदानात उतरतो.

१०० मी अनवाणी पळताना त्यालागावचा दुष्काळ पायाला चटके देतोय अश्या आकांतात तो धावत असतो व लांब उडी मारताना ५.०० मीटर लांब उडी त्याला दुष्काळपार करू शकत नाही.

परंतु त्याच्या कुटुंबास दोन वेळेचे जेवण नक्कीच देईल तो हे जाणून होता. अस एक-एक करून १६०० मी, गोळा फेक करत शक्य तेवढे गुण मिळवतो व अभ्यास करण्यासाठी पुन्हा गाव गाठतो. यामध्ये मात्र त्याचे थोडे बहुत मित्र गळाले असतात.

यशाला shortcut नसतो हे खर.भावड्या आता मैदानी चाचणी गाजवल्यानंतर अभ्यास करण्यात जीव झोकून दिवसरात्र अभ्यासाला लागतो व दिवसभर आयुष्याचे व्याकरण व झोपता झोपता गुणांचं गणित मांडत झोपत असतो.

कधी ज्याला काहीही भूगोल नाही असा हा इतिहासबरोबर लढत-लढत पोलीस भरती प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी लेखी परीक्षेच्या जवळ येवून धडकतो व शेवटी गुणवत्ता यादीत झळकतो.

अश्यावेळी भावड्याच्या घरच्यांची आनंदाची व्याख्या न केलेलीच बरी.


Tags - पोलीस भरती कागदपत्रे, पोलीस भरती प्रश्नपत्रिका,  पोलीस भरती ट्रेनिंग, पोलीस भरती माहिती, पोलीस भरती वयोमर्यादा, पोलीस भरती अभ्यासक्रम, पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म 


Post a Comment

Previous Post Next Post