कट्टर कार्यकर्ते स्टेटस जपा

कट्टर कार्यकर्ते स्टेटस जपा

कहाणी कट्टर कार्यकर्त्यांची


महाराष्ट्र नगर राज्यात दोन प्रमुख राजकिय पक्ष होते, एक रणसंग्राम व दुसरा नवक्रांती संघटना.  तिसरा पक्ष महाराष्ट्र कामगार पक्ष उदयास येत होता...

रणसंग्राम पक्षाचे नेते - दौलतराव शिंदे खूप मोठा माणूस व त्यांचा कार्यकर्ता राणा . राणाचा शिंदे साहेबांवर लय जीव असतो. तर दुसरीकडे रणसंग्राम संघटना याचे प्रमुख नेते आहेत श्री. बापू इनामदार इकडे पण बापूसाहेब इमानदार यांच्यावर जीव लावणारा व त्यांच्या सावलीसोबत असणारा राजाराम म्हणजे सर्वांचा लाडका राज्या...

हे दोन्ही पक्षांचे वैर पिढी दर पिढी वाढतच जात होत, कधी महाराष्ट्र नगरीचा मुख्यमंत्री रणसंग्रामचा बनत होता तर कधी नवक्रांती संघटनेचा बनत होता. दोघे पण नेते म्हणजे वाघ सिंहच होते कोण कोणाला कमी पडत नसत. 

त्यात साहेबांचे कार्यकर्ते म्हणा किंवा घरची माणस म्हणजे राजाराम व राणा हे दोघे एकाच सोंडाई तालुक्यातील एकमेकांना कोणाचे काहीच देणे घेणे नव्हते मात्र दोघांची प्रत्येकाच्या साहेबांवर मोठी श्रद्धा...

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते, महाराष्ट्र नगरीमध्ये प्रचाराचा डंका सुरू होता, दोघांच्या अस्मितेची लढाई सुरू होती, राणा व राजाराम यांना तहान भुकेचा काही संबंध उरलेला नव्हता, ते प्रत्येक खेड्या पाड्यात जात होते, पैशाचे बंडलच्या बंडल विश्वासाने गावातील, शहरातील नामांकित, जुन्या पुढाऱ्यांना देत होते.

आपल्या साहेबाला मोठ्या प्रमाणात तुमच्या भावकीचे, सोसायटीचे मत पडले पाहिजेल अस आवर्जून सांगत होते व हात जोडून निघून जात होते व साहेबांचा माझ्यावर किती विश्वास म्हणून माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली व लाखो रुपये वाटायला दिलेत म्हणून खोट्या विश्वात झोपी जात होते.

ते दोघे स्वतःच्या घरी पोचल्यावर इकडून बंगल्यावरून दौलतराव व बापूसाहेब पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीला फोन करून किती रक्कम मिळाली म्हणून विचारपूस करण्यास विसरत नव्हते ती वेगळी गोष्ट.
त्यात महाराष्ट्र कामगार पक्ष डोके वर काढत होता गेल्या निवडणूकित बऱ्याच ठिकाणी त्यांचे आमदार निवडुन आले होते, आता महाराष्ट्र नगरीमध्ये कोणाची सत्ता येईल याबद्दल शंका निर्माण झाली होती. 

आज प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता व त्यानंतर प्रचाराच्या तोफा शांत होणार होत्या, महाराष्ट्र नगरीमधील सर्वात मोठा मतदार संघ म्हणजे सोंडाई तालुका आज S.T.K महाविद्यालयात दौलतराव यांची जाहीर सभा होती व त्याच महाविद्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत बापूराव यांची सभा होती.

वातावरण दूषित होणार याची जाण पोलीसांना होतीच त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सभेच्या वेळा मात्र खूप भिन्न दिल्या जेणेकरून सर्व सुरक्षित व सुरळीत पार पडावे.

दौलतराव यांची सभेची 11 ची वेळ मात्र दौलतराव S.T.K महाविद्यालयात 12 वाजता पोचले, मागोमाग राणा त्यांच्यासोबतच होताच, हळू हळू सभेला रंगत चढू लागली, तशी दौलतराव अजून बेफाम होऊन भाषण देऊ लागले, सर्व मतदार जोर जोरात टाळ्या वाजवून समर्थन देऊ लागले.

 हे पाहून राणा भारावून जात होता तो सुद्धा त्वेषाने टाळ्या वाजवून स्वतःच्या साहेबाना प्रोत्साहन देत होता, दौलतराव याना वाटत होते भाषण संपूच नये, मात्र अगोदरच ते 1 तास उशिरा झालेले व आवेशात त्यांनी 1 तास जास्त भाषण केलेले, 

मध्येच राणाने जवळ येऊन पोलिसांनी आता कार्यक्रम आटोपता घेण्यास सांगितले आहे असे त्यांच्या कानात सांगितले, तेव्हा कुठे दौलतराव आवरते घ्यायला लागले. तो पर्यंत समोर असलेल्या मैदानातून बापूराव इनामदार यांच्या पक्षाची गाणी वाजायला सुरुवात झालेली म्हणजे अद्याप सभा सुरू झालेली नव्हती...

दौलतराव व राणा यांनी सभेचा लवाजमा गोळा करून घरचा रस्ता धरला दौलतराव यांच्या गाडी मागे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अश्या 15, 20 गाड्या मागोमाग होत्या, 

एवढ्यात दौलतराव यांना फोन आला की मागच्या काही कार्यकर्त्यांच्या गाड्या व बापूसाहेब यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांमुळे एकमेकांत वाद सुरू आहे, त्यांनी राणाला लगेच सांगितले, राणा मागे जाऊन बघ काय झाले ते, मला उगाच सध्या कसला वाद नकोय, वेळ आल्यास बापूला त्याची जागा दाखवून देऊ आपल्या लोकांना घेऊन ये मागोमाग मी जातो पुढे म्हणून दौलतराव निघून गेले. 

राणा आपल्या कार्यकर्त्यांच्या जवळ आला असता, त्याला समोर राजाराम आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करताना दिसला, तसाच राणा पळत पळत राजाराम जवळ गेला व म्हणाला 
" राजाराम जाऊदे भावा, तू जस तुझ्या साहेबांचे काम करतोस तस आम्ही आमच्या साहेबांचे काम करतो उगाच आपल्यात वाद नको, 

तुमच्या गाड्या एका बाजूला घ्या व आमच्या लोकांना जाऊदे" यावर राजाराम बोलला -  हे बघ राणा उगाच आमच्या लोकांच्या व साहेबांच्या नादी लागू नका ! आमचा नाद तर भले भले करत नाहीत तर तुझा साहेब कोण र... 

हे ऐकून राणाला राग अनावर झाला, तो राजारामला बोलला, राज्या जरा शिस्तीत रहा, तू कोणाला बोलत आहे कळतंय का तुला ! साहेबाने थंड घ्यायला सांगितले म्हणून गप्प आहे,  नाहीतर इथे रक्ताचे पाठ वाहिले असते, गप्प गुमान निघून हा नाहीतर परिणाम वाईट होतील... 

इकडे या दोघांची शाब्दिक चकमक काही थांबायला तयार नव्हती. राजारामच्या मागून एका बेवड्या कार्यकर्त्याने राणाच्या थोबाडीत मारली हे पाहून राणाच्या लोकांनी राजारामच्या माणसांना मारायला सुरुवात केली... 

राणा व राजाराम आता मात्र कट्टर वैरी झाले होते, का झाले होते ? कशामुळे झाले होते ? त्यांचा काही कौटुंबिक वाद सुद्धा नव्हता ! मात्र वैरी झाले होते. यातच रागाच्या भरात राणाने राजारामच्या डोळ्यावर हातातील लोखंडी कडे काढून जोरदार मार दिला. आता मात्र सोंडाई तालुक्यात अक्षरशः दंगल सुरू झाली होती, पोलिसांनी काही तासात सर्व परिस्थिती आटोक्यात आणली. 

मात्र यामध्ये काहीतरी कारवाई पोलीसांना दाखवावी लागणारच होती, राजाराम सरकारी दवाखान्यात डोळा गमावून झोपी गेला होता, त्याच्या शेजारी 12 वर्षाचा पोरगा मराठी शाळेचा गणवेश घालून parle g बिस्कीट खात बसला होता... 


तर आधारवाडी जेलमध्ये राणा, राजारामला मारल्याबद्दल व दंगल घडविल्याबद्दल शिक्षा भोगत होता... त्याच्या पोराबाळांचे हाल कोणाला पाहवत नव्हते...  इकडे राजकारणी लोकांची मुले दुसऱ्या देशात जाऊन शिकून येत होते, मोठं मोठे धंदे सांभाळत होते. इकडे राणा व राजाराम यांची घर कायमची उदवस्त झाली होती...

आता दौलतरावच्या राणाची जागा नवीन कट्टर कार्यकर्ता महेशने घेतली तर राजारामच्या जागी सुधीर आला.  महिन्याभरात निवडणुकीचा निकाल लागला त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती, स्पष्ट बहुमत अस राहिले नव्हते अखेर जुने वैरी आता कट्टर मित्र झाले दौलतराव व बापूसाहेब यांनी युती केली व नवीन सरकार स्थापन केले व त्यासोबतच ते राणा व राजारामला विसरून गेले...


कट्टर कार्यकर्ते
कट्टर कार्यकर्ते


कथा काल्पनिक असली तरी यावरून ज्याने त्याने कसा घ्यायचा तसा बोध घ्यावा. 

@ शैलेश कदम
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
#राजकारण
#माझे_घर_माझी_जबाबदारी

हे सुद्धा वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने