Facebook SDK


बौद्ध धर्म 

bauddha dharma

वर वापर केलेला इंग्रजी bauddha dharma बौद्ध धर्म हा शब्द खटकत असेल ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणणे काही लोक buddha dharma बौद्ध धर्म असा सुद्धा लिहितात  व वरती दाखविला तसा सुद्धा bauddha dharma बौद्ध धर्म लिहितात. त्यात आपल्या भावना एकच हे महत्वाचे असो विषयाला हात घालू.

buddha dharma 

Tags - buddha dharma chi mahiti marathi buddha dharma Information in marathi bauddha dharma बौद्ध धर्म मराठी. 

आम्ही मित्रांसोबत अरुणाचल प्रदेश मधील बुद्ध भूमी असलेल्या तवांग जिल्ह्यात फिरायला गेलो असता तेथील एका गाईडने आम्हाला बौद्ध धर्म, दलाई लामा तसेच रंगबेरंगी तिबेटी झेंडे  समजावून सांगितले आम्ही बौद्ध धर्माच्या प्रेमात पडलो नसेल तर नवलच त्याने सांगितलेली कहाणी हमारी जुभानी नक्की वाचा आवडेल तुम्हाला मात्र आवडल्यास अभिप्राय आवर्जून द्या पोच पावती म्हणून.

buddha dharma chi mahiti marathi


तवांग प्रवासात आम्हाला लाभलेला अस्सल हिरा म्हणजे हा प्रिन्स, तो नावाप्रमाणेच आहे, हे आम्हाला गाडीत बसल्यावर काही वेळातच समजल, सुरुवातीला आम्हाला काही हिंदी मेलडी ऐकवल्यानंतर वैभव बांदल यांनी चाय पे चर्चा सुरू केल्यावर त्याने गाडीतील टेप बंद करून आमच्या सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली त्याने आम्हाला तिथेच जिंकल आणि आम्ही जास्तच तवांगचा म्हणा किंवा तेथील माणसांच्या, संस्कृतीच्या प्रेमात पडलो.


बौद्ध धर्म

बौद्ध धर्म 

तर त्याच्या बरोबर झालेल्या चर्चेचे इतिवृत्त थोडक्यात पाहू, work like a servant and live like a king हा त्याच्या जगण्याचा मूलमंत्र, अवघे वय वर्षे 24 असलेला हा प्रिन्स इंग्रजी अगदी सहजरित्या बोलतो, 

तसेच गरजेपुरते इतर देशांच्या दोन, तीन भाषा सुद्धा बोलतो जस फ्रेंच व जर्मनिज. एका शाळेत शिक्षक असलेला हा मुलगा, पोट्रेट चित्र काढतो, bike रेसिंगच्या नादात उजवा पाय गमावलेला हा, त्याचा पाय तापलेल्या सळईने कसा काय जोडला ती वेगळी दर्दनाक कहाणी !!! 

अरुणाचल म्हणजे बुद्धभूमी येथील बौद्ध लोक अतिशय प्रेमळ असेच, शक्यतो त्यांची आपापसात भांडण होत नाहीत जर चुकून हो चुकून झाली तर भांडण करणाऱ्यापैकी एकाचा बळी निश्चित असतो असे प्रिन्स सांगतो, 


लोक म्हणतात दारू पिणे वाईट असत, सिगारेट वाईट असत पण आम्ही लोक त्याचा बाव करीत नाही आम्ही जरूर दारू, सिगारेट पितो पण आमच्यामुळे कोणा व्यक्तीला त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो कारण आमचा जिल्हा किंवा राज्यच म्हणा ते पर्यटनावर चालत.

 त्यामुळे पर्यटकांना किंवा आमचा आपापसात भांडण करून आम्ही आमच्याच पायावर दगड मारून कश्याला घेऊ, आमच्या वातावरणामुळे आम्ही धूम्रपान किंवा दारू पितो आणि तो आमचा एक नित्यनियमाचा अविभाज्य घटक आहे. 

आमच्या घरात कोणी नवीन बाळ जन्माला आले तरी आम्हाला त्याला दुधाऐवजी दारू पाजतो खोट वाटेल पण हे वास्तव आहे एवढच काय आमच्या येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा चहा ऐवजी welcome drink आम्ही घरी बनवलेली दारुच असते बर, because we are born for drink अस तेथील प्रत्येकाचे मत.

buddha dharma Information in marathi bauddha dharm


तारामती मंदिराजवळ एक दगड ज्याला आपण गुंड उचलणे बोलतो, तो आम्ही सर्वांनी उंचालण्याचा जीवतोडुन प्रयत्न केला परंतू कोणाला तो गुंड अपेक्षेपेक्षा जास्त उचलता आला नाही,

 पंरतु ह्या काटक शरीरयष्टी असलेल्या जेमतेम 24च्या घरात असलेल्या ह्या प्रिन्सने आम्हा सर्वांच्या पेक्षा जास्त तो गुंड उंचालला, तो म्हणाला रात्री बियर जास्त झाली व सकाळी जेवण नाही केले नाहीतर हा दगड नक्कीच मागे फेकला असता, त्याचा आत्मविश्वास म्हणावा की त्या लोकांची ताकद कदाचित त्यामुळेच इकडील सरासरी आयुर्मान 100 पेक्षा जास्त आहे.

मंडळी तसे इकडील बौद्ध लोक पुनर्जन्मावर खूप विश्वास ठेवतात, घरातील कोणी व्यक्ती मयत झाला तर त्या घरातील मोठा मुलगा, व्यक्ती संबंधित मयत व्यक्तीचे स्वतःच्या हाताने मोजून 108 तुकडे करतो व ब्रम्हपुत्रेस वाहतो.

कारण आपण मेल्यानंतर आपले शरीर सुद्धा कोणाच्या तरी कामी यावे असे त्यांचे मत सध्या या कामासाठी एक व्यक्ती असतो तो मृत व्यक्तीचे 108 तुकडे करतो व नदीमध्ये माश्यांना खायला टाकतो आणि मृत व्यक्तीच्या घरी काही दिवसानंतर स्वता त्यांचा लामा (स्थानिक धर्म प्रमुख) घरी येऊन तो व्यक्ती कोठे जन्म घेणार आहे याची इत्तमबुत माहीती देतो. 
©शैलेश कदम
#ultimate
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
#गावाकडचा_आशिक

हे सुद्धा वाचा 

2 Comments

  1. खूप छान जमलंय.. मजा आली वाचताना

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post