नशिबाची पंगत gavakadchya goshti in marathi | गावाकडच्या गोष्टी

gavakadchya goshti in marathi 

गावाकडच्या गोष्टी - gavakadchya goshti in marathi - village story in marathi - gavakadchya goshti marathi

गावाकडच्या गोष्टी - नशिबाची पंगत

शेवटची मंगल अष्टका कानावर पडू लागताच; फटाकड्याच्या तड तड तड आवाजात भावड्यानी हाय नाय तेवढ्या सगळ्या अक्षदा पुढ उभं असलेल्या टक्कल पडलेल्या माणसाच्या डोक्याव जोरात भिरकावल्या, 

अन धावत पळत गव्हाच्या शेतात जावून घटकाभराची का होईना पण हक्काची जागा पकडली व वेळोवेळी थुका लावून अंगठ्याने दाबून बन बसवलेली व टाचच्या ठिकाणी छोट बिसुक पडलेली पॅरागॉन चप्पल पायातून काढून त्या चपलीवर बुड टेकवत सावरून पंगतीला जेवायला बसला, 

तो पर्यंत गावातील टूकार पोर, पत्रावळी व दुरणचा प्लास्टिकचा बंडल फोडून उत्साहाने वाटत आली होतीत, तेवढ्यात भावड्याच्या कानावर भोंग्याचा आवाज आला; "लग्न मालकाची आग्रहाची विनंती जेवल्याशिवाय कोणीही जावू नये, टेम्पो ड्रायव्हर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर लग्न मंडपात यावे", 

भावड्याला कशाचीच घाई गडबड नव्हती कारण घरी लवकर गेले किंवा उशिरा गेले तरी असले चमचमीत जेवण त्याला दिवाळी दसरा सोडले तर दुर्लभ होत, तोच नाहीतर त्याचा बाप, आई व बहीण द्रौपदी पण लग्नाला आली होती, गावातलच वऱ्हाड असल्यामुळे गावातील सगळी रोजनदारी बंद होती; तो पर्यंत त्याच्या ताटात गरमा-गरम भात आला होता, 

भावड्याने भानावर येवून थोडा अजून टाक र... असा हक्काने अजून भात मागून घेतला त्याला माहिती होत, पंगत उठायच्या तयारीत असेल तव्हाच हे घाबड परत येणार अस म्हणत भावड्याने थोडा भात पत्रावळीच्या बाजूला काढून त्यावर दुरण चिटकावून टाकला, मंग त्यात थोडी आमटीवरील तर्री मागून घेत दुरणमध्ये आमटी घेतली व थोडी भातावर टाकली, 

वांग-बटाटा भाजीवाला वगराळानी पत्रावळीमध्ये भाजी वाढून निघून हि गेला पण भावड्याची नजर दूरवर कुठतरी खिळली होती, ती म्हणजे "डाव्या हाताच्या मध्यभागावर घमेल सावरत चाललेल्या कळीवाल्यावर" त्याने भावड्याच्या पंगतीला वाढायला सुरुवात केली, 

gavakadchya goshti marathi

आता भावड्याचा बाजूला बसलेल्या पोराच्या पत्रावळीत कळ्या पडल्या; इकडे भावड्याने पत्रावळीच्या एका बाजूला भाताच्या व वांग-बटाटा भाजीच्या मधोमध कळीवाल्याला जागा करून दिली, त्याजागेवर पिवळसर व किंचित लाल रंगाची, साखरेचा थर असलेली गोलाकार कळी पडताच क्षणी भावड्याने आधासीपणाने त्याची एक बुचकळी भरून कळी तोंडात टाकली 

चावत चावत खुश होवून सगळीकडे नजर फिरवली आता कुठे त्याच्या जेवणाला खरी सुरुवात झाली होती,
तिकडून एक गांधी टोपी घातलेल, अंगात पांढरा सदरा व लेंगा घातलेला माणूस माईकचा ताबा स्वतःकडे घेवून सगळ्यांना सूचना देत होता, 

"ए मागच्या पंगतीला भातवाला जाऊद्या त्याच्या मागोमाग आमटीवाला फिरवा" व मध्येच "वदनी कवळ घेता नाम घ्या अस म्हणायला सुरुवात केली, भावड्याने त्याच्या अगोदरच कार्यक्रम सुरु केला होता, त्याला जेवण कोणत्या जाती-पातीच्या कार्यक्रमातील आहे याच काही देणं घेणं नव्हत त्याला फक्त पोट भरन हाच धर्म माहित होता, 

प्रार्थना न करता कळीच्या चवीबरोबर त्याच्या अंतरमनातील ईश्वर खुश होत होता तस पाहिलं तर

 "आयुष्य सुद्धा एक पत्रावळी दुरुणच कि परमेश्वराने

जेवढ वाढलय त्यात समाधानी राहून, त्याचा पूर्ण आस्वाद घ्यायचा नाहीतर शरीर काय अन पत्रावळी शेवटी शिल्लक राहतो तो कचराच कि",
 

भावड्या जोमान खात होता, तेवढ्यात वाऱ्याबरोबर थोडीसी माती भावड्याच्या पत्रावळीत उडाली, त्याची त्याला फिकीर नव्हती, माती पचवायच बळ तर त्याला लहानपणीच मिळाल होत, त्यान तसाच दुरन उचलून त्याला खाली लागलेला भात; आमटी सोबत कालवून खायला सुरुवात केली, 

आता पंगत उठायची वेळ आली होती अन भावड्याचा अंदाज खरा ठरला होता भात वाढणार घाबड लोकांचा हात सुकायला लागला तरी आल न्हवत, लोक उठायच्या तयारीत होती भावड्यानी आमटीनी ओलसर झालेली शिल्लक कळी मोठा "आ" वासून तोंडात टाकुन दिली व दुरणमधील वरती खोबऱ्याचा बारीक तुकडा तरंगत असलेली शिल्लक आमटी मटकन पिवून टाकली आणी तसाच तो डाव्या हाताने चड्डी झाडत उठला;

चप्पल घालत शेताच्या बांधाजवळ ठेवलेल्या स्टीलच्या बादलीत हिरवा प्लास्टिकचा ग्लास बुडवून बांधावर हात धुतला व निळ्या टीपाडातील पाणी गटागटा पिवू लागला, 

gavakadchya goshti in marathi

त्यातील काही पाण्याचे थेंब भावड्याच्या ओठावरून त्याच्या शाळेच्या पांढऱ्या शर्टवर पडत होते, आता कुठ भावड्या खऱ्या अर्थाने तृप्त झाला होता, कारण त्याने भुकेवर विजय मिळवला होता, त्यांनी तसेच ओले झालेले हात त्याच्या खाक्या चड्डीला मागे पुसले व उरफाटा हात तोंडावरून फिरवीत वऱ्हाडाच्या गाडीकडे रवाना झाला.....

gavakadchya goshti in marathi
gavakadchya goshti in marathi

गावाकडच्या गोष्टी - gavakadchya goshti in marathi - village story in marathi - gavakadchya goshti marathi

3 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने