harihar fort trek blog in marathi
आम्ही केलेला harihar fort trek blog आहे यामध्ये harihar fort harihar fort distance from pune - mumbai harihar fort difficulty level harihar fort directions harihar fort dangerous आहे पण किती याबद्दल तसेच आम्ही केलेले प्रवासवर्णन दिलेले आहे तर चला harihar fort वर चढाई करूया.
![]() |
harihar fort trek blog |
harihar fort trek blog in marathi
ह्या किल्ल्याचा फोटो पाहताच भटकी लोक ह्याच्या प्रेमात पडले नाहितर नवलच तसा मी ही ह्याचया प्रेमात पडलो व याला भेटायच ठरवल भरपूर दिवस झाल पण इकडे जायच प्रयोजन होत नव्हत अखेर मुहूर्त ठरला दि.24 जून 2016 ला शेवटची कसारा व तेथून निरगुडपाडा सकाळी 5.45 ला एका अनोळखी ग्रुपसह (आता ठराविक मुले ओळखतो) तेथे पोहचलो.
![]() |
harihar fort trek blog |
सकाळी सकाळी एवढ़ दव व धुक पसरल होत आम्हाला तसा सहसा दृष्टिक्षेपात पडनारा 16व्या शतकात शिव-मावळ्यांचे पद-स्पर्श लाभलेला हरीहर कुठे हरवला समजले नाही. आम्ही मंग थंडी हवा अन अंगावर पावसाचा मारा सहन करीत करीत मजल दरमजल चढ़ाईस सुरुवात केली.
![]() |
harihar fort trek blog in marathi |
आमचा 26 लोकांचा ग्रुप सुरुवातीची चढाई पूर्ण जोशात केली, ज्यावेळी चढ़ाई अवगड होवु लागली तेव्हा आमच्या स्पेशल 26 मध्ये सूधा 4-5 टीम तयार झाल्या, पायात स्पार्कचा बुट असून कामाच नाही अंगातच स्पार्क लागतो हे खर, सरत सरत शेवटी आम्ही किल्ले हरिहरचा आकर्षणाचा मान बिंदु ज्यामुळे महाराष्ट्रातील काना कोपरयातील भटके इथे येण्यास प्रवुत्त होतात त्या ठिकाणी आलो.
समोरील नजारा पाहुन मी तर त्याला स्वर्गाचे दार अशीच उपमा देईल कारण पहिल्या पायरीवर पाय ठेवताच बाकिच्या पाय-या धुक्यात लुप्त होतात त्यामुळे आपण नेमके जातोय कोठे व हया पाय-या आपणास कोठे नेतात हे सहसा समजत नाही व ह्या पाय-या सुद्धा पूर्ण दगडात कोरीव त्यावर पाउसाचा मारा होवुन थोडाफार चिखल लागुन निसरडया झालेल्या. पायरीवर घडवलेल्या खोबनीचा वापर करून चढ़ाई सोप्पी होते
![]() |
harihar fort trek blog in marathi |
समोरील नजारा पाहुन मी तर त्याला स्वर्गाचे दार अशीच उपमा देईल कारण पहिल्या पायरीवर पाय ठेवताच बाकिच्या पाय-या धुक्यात लुप्त होतात त्यामुळे आपण नेमके जातोय कोठे व हया पाय-या आपणास कोठे नेतात हे सहसा समजत नाही व ह्या पाय-या सुद्धा पूर्ण दगडात कोरीव त्यावर पाउसाचा मारा होवुन थोडाफार चिखल लागुन निसरडया झालेल्या. पायरीवर घडवलेल्या खोबनीचा वापर करून चढ़ाई सोप्पी होते
तरी एका पायरीवर एका वेळी एकच ये-जा करु शकतो त्यामुळे हरीहरची 200 फुट अंतरात 70 अंशात असलेल्या साधारण 130 पाय-या चढताना सावधगीरी महत्वाची या ठिकाणी आपला केव्हाही हरीहर होवु शकतो
कारण एखाद्या पायरीवरुन जरी तोल सटकला तरी आपण थेठ किल्ल्याचा पायथा घाटनार येथे चुकिला माफी नाही त्यामुळे हा किल्ला चढ़ाई माझ्या मते अवगड प्रकारात मोडतो तरी रोहिड खोरयातील महादेव डोंगर रांगात अपेक्षे पेक्षा जास्त वाढलेलो मी उत्तमरीत्या चढ़लो असो, शेवटी आम्ही पाय-या चढ़ाई करून हरीहरच्या द्वारात प्रवेश केला तेथून खाली पाहिलेला नजारा ओ हो अप्रतिमच ज्याना निसर्गाचे अविष्कार जवळून अनुभवावे वाटतात त्यांच्यासाठी किल्ले हरीहर एक पर्वनीच आहे.
![]() |
harihar fort trek blog in marathi |
आमचे काहि मित्र दरवाज्यापुढे येवून कटद्याजवळ फोटो काढण्यात व्यस्त होती अचानक खालुन कसला तरी मोठा आवाज झाला सगळी लोक भीथरली गेली आवाजाबद्दल मनात काहुर माजु लागल्याने व दोन पाउले मागे आलीत समोर पाहतो तर वानरराज एटित वर येवून आम्हा समोर पोझ देवुन उभे होते. आम्ही शांत होवुन तेथून काढता पाय घेतला तेथून चढ़ाई सोप्पी झाली ति अंबारी पर्यन्त.
या गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही येथे एक गोष्ट चांगली पाहायला भेटली गड- कोटाचा आदर बाळगुन लोकानी येथील स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवली आहे येथे ट्रेकिंगला येणारे लोक आप-आपला कचरा आपल्या सोबत गेऊन जात होती. रविवारच्या दिवशी येथे ट्रेकर्सची गर्दी मोठ्या प्रमाणात असते येथे फक्त आपल्या बॅग व्यवस्थित ठेवा वानरराज पोट भरन्याच्या तयारीत असतात व खावाच्या वासाने जवळ येवून मर्कटचेष्टा करतात. कैप्टन ब्रिग्जचे आभार ज्याने ह्या पाय-या नष्ट न करता त्या जतन करून ठेवल्या.
harihar fort trek blog in marathi
मनात तगमग चालली होती मोहिनी घातलेल्या तुझ्या रुपाला भेटन्याची
तुझ्या सिमेत प्रवेश करता वरुण आला स्वागत करून चार शिंतोडेे शिफंडून गेला ही
सोबतीला ठेवले धुके अन समोर धुक्यात हरवलेला तु
दरबाराबाहेर तुझीया मेघराज मला नजरबंद करु पाहत होता
झुगारुन सर्व नजीक पोहचताच हरीहरा तु तर मयसभेत व्यस्त होतास
तुझी रचना ही अफाट अशी जिथे पायरी चढलो तरी स्वर्ग अन पडलो तरी स्वर्गच होता.
शैलेश कदम.
harihar fort trek blog
आम्ही केलेला harihar fort trek blog आहे यामध्ये harihar fort harihar fort distance from pune - mumbai harihar fort difficulty level harihar fort directions harihar fort dangerous आहे पण किती याबद्दल तसेच आम्ही केलेले प्रवासवर्णन दिलेले आहे
Post a Comment