माझा लढा inspirational story in marathi प्रेरणादायी गोष्ट

माझी लढाई प्रेरणादायी गोष्ट

inspirational story in marathi 

सादर करत आहोत एक motivation story inspiration story in marathi हा लढा म्हणजे एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरणादायी कथा कशी वाटली नक्की सांगा.

inspirational story in marathi

inspirational story in marathiडोकं शांत ठेवायला हवं होतं कि झालं ते तडकाफडकी चांगलं झालं काही समजत नव्हतं म्हणून आजमवायला जनमत घेतलं ते सुद्धा माझ्या बाजूने होते याअर्थी मी जिंकलो !

या विजयाबरोबर मी शत्रू निर्माण केले तेही स्वार्थी व उच्चकोटीचे आता पुन्हा जोमाने लढाईला खरा अर्थ निर्माण होईल, मी हि लढणार अपराजित वीरासारखा हीच सुरुवात समजून अन्याया विरुद्ध बाहू थोपटुन लढायच फक्त लढायच.

होतील दाही दिश्याकडून तलवार, भाल्यांचे वार, होईल  बाणांचा वर्षाव, शरीरास होतील जीवघेण्या यातना, रचल जाईल चक्रव्युव, होतील शकुनी कावे

मी मात्र अश्वावर वाऱ्यासारखा स्वार होऊन, घोड्यांच्या टापांनी उधळून लावील सगळीकडे मातीचे लोट, रणांगणी गोंगावेल शत्रूच काळीज चिर्रर्र करणार तुफान,

आपल्याच ताफ्यातून आला एखादा सूर करण्या मला निस्तेज तरी शिरेल मी चक्रव्यूय भेदण्यास, फसलो जरी अभिमन्यू बनून या चक्रव्यूव्हात तरी लढत,

लढतच राहील दोन्ही हाती समशेर घेऊन ती हातून गळेपर्यंत चालवत राहील, येतील हत्ती चालून मजवर मागे सरेल दोन पावले तोही,

जेव्हा मी सर्व ताकद एकवटून फिरविल गदा असह्य आक्रोश करीत,

संपतील सर्व शस्त्र-अस्त्रे तेव्हा उचलेल रथचक्र हि भासेल दुष्मणास अगदी सुदर्शनासारखे असा लढेल साहसी वीरा सारखा, अखेर दुष्मनही नतमस्तक होईल नजरेची भेदकता पाहून, उतरले जातील दुष्मनी झेंडे,

गगणातून एरावतरूढ इंद्रही अंगावरील शहारे पाहत बोलेल हा अर्जुन, कर्ना पेक्षा श्रेष्ठ धनुदारी, भीमा पेक्षा ताकदवर व धर्मापेक्षा सत्यप्रिय कोण जन्मला ? जो सत्यासाठी लढतोय !!!  मंग मी हि शंखनादात सूर्यदेवाच्या मावळतीसह निपचित देह सोडेल अखेरच्या श्वासापर्यंत चिरकाल भंग न होणाऱ्या शांततेत लोप होण्यासाठी एक सोनेरी विजयी इतिहास बनून.

 © शैलेश कदम

कसा वाटला माझा लढा प्रेरणादायी कथा, गोष्ट, inspirational story in marathi motivation story in marathi .

हे सुद्धा वाचा - Post a Comment

थोडे नवीन जरा जुने