मराठी पुस्तक Kolhatyach por marathi book review in marathi

मराठी पुस्तक Kolhatyach por marathi book review in marathi 

Tags- मराठी पुस्तक | Kolhatyach por marathi book review in marathi | कोल्हाट्याच पोर | Kolhatyach por kadambari in marathi |
Kishor Shantabai Kale book |
Kolhatyach por author

कोल्हाट्याच पोर


तमासगीरीन म्हणजे आपण उधळलेल्या पैशातून हव्या त्या गाण्यावर नाचणाऱ्या, गाणाऱ्या, आपण केलेल्या once more वरती मनात नको असले तरी पुन्हा पुन्हा येवून अंग हलवणाऱ्या, भेदक नजरेने इशारा करणाऱ्या बायका अशी त्यांची व्याख्या,

 कधी विचार केलाय एवढा बिनदास्तपणा त्यांच्यात आला कुठून ? कुठे व कशी मुर्दाड झाली त्यांच्या नजरेची भीती ? शेवटी पोटाचा प्रश्न आला की नाही राहत काही जगण्याचे नियम ना मध्ये येते कोणती जात, 

जर कलेवर पोट भागत नसेल तर मंग वेळेप्रसंगी मनात नको असताना त्याला कठोर बनवून परपुरुषाला विकाव लागत शरीरसुद्धा कवडीमोल भावात न विसरल्या जाणाऱ्या रात्रीसाठी ! कारण परिस्थिती कोणाला काय करायला लावेल याचा नियम नाही, यामध्ये सर्वच स्त्रीया अश्या असतात अस सुद्धा नाही.

कारण एका स्त्रीमुळे दहा स्त्रीयांकडे आपण त्याच नजरेने पाहतो, अश्या तमासगीरांच्या घरात स्त्रीचा जन्म होतो तो फक्त नरक यातना भोगण्यासाठी कारण जो पर्यंत सौंदर्य, जवानी आहे तोपर्यंत तिला महत्व तारुण्य संपल की, वृद्धापकाळात इतर नाचणारीनीची पोर सांभाळायची, 

हे सुद्धा वाचा -


भूतकथा अरुणाचल प्रदेश मधील
शेतीची राखण करायची हीच काय तिची दुनिया अश्या तमासगीराच्या घरात जन्माला येणाऱ्या व बापाचा पत्ता नसलेल्या पोराला शाळेत नाव सुद्धा आईच लावावे लागते - किशोर शांताबाई काळे म्हणून किती केविलवाणी परिस्थिती.

अश्या नाचणारीनीच्या सौंदर्यावर भाळून अनेक कुबेर येतात दारी मागणी घालायला, देतात आयुष्यभर सांभाळण्याचे वासनेने भरलेले वचन पैसाच आमिष दाखवून, नाचणारीच आयुष्य नको त्यापेक्षा कुणाची तरी दासी झालेले बर, किमान लोकांच्या वाईट नजरा चार भिंतीच्या आडतरी येणार नाहीत या एका अपेक्षेपोटी स्त्रीसुद्धा होकार देते, 

त्या स्त्रीचा चिरा उतरवला जातो, तिने चिरा उतरवलेल्या व्यक्तिशिवाय कोणाशीही शारीरिक सबंध ठेवायचा नाही, त्याच्याशी एकनिष्ठ राहायच लग्नाची पहिली बायको घरी असताना सुद्धा, अश्यातच चिरा उतरवणारा धनाढ्य व्यक्ती तिचा हवा तेवढा भोग घेवून काही महिन्याच्या गर्भवतीस घराबाहेर हाकलून देवून आयुष्यभर सांभाळायच वचन जातो विसरून.

 काय अवस्था झाली असेल तिची ? का तिला वाटत नसेल असावा आपला सुद्धा सुखी संसार ? मंग ही गर्भवती करते गर्भपात नाहीतर वाढवते बिना बापाच पोर ! 


Kolhatyach por marathi book review in marathi
Kolhatyach por marathi book review in marathi

मराठी पुस्तक Kolhatyach por marathi book review in marathi कोल्हाट्याच पोर


मंग पुन्हा एकदा तयार होते काळजात घुसवून कट्यार त्यानंतर पायाला गठ्ठ बांधायचे गुंगरू रक्त साखळे पर्यंत, पडद्यामागून आला तिच्या रडणाऱ्या तान्हुल्याचा आवाज तरी तो न एकल्यासारखा करून ढोलकीच्या तालावर नाचत राहायच "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" म्हणत अन जायचे सामोरे डोळ्याने बलात्कार करणाऱ्या नजरेला आणि जीवनाचा फड मोडेसपर्यंत जगायचा तोच आयुष्यभर वेगवेगळ्या वगनाट्यासह नशिबात लिहिलेला तमाशा.
*फोटो- नेट साभार

 © शैलेश कदम

हे सुद्धा वाचा

मराठी पुस्तक | Kolhatyach por marathi book review in marathi | कोल्हाट्याच पोर | Kolhatyach por kadambari in marathi |
Kishor Shantabai Kale book |
Kolhatyach por author


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने