यालाच प्रेम म्हणावे love poem in marathi - मराठी प्रेम कविता

का यालाच प्रेम म्हणायचे

love poem in marathi - मराठी प्रेम कविता

Tags - कविता मराठी - prem kavita in marathi - Marathi love poem | प्रेम कविता | romantic poems | prem kavita marathi Marathi prem kavita prem kavita - एकतर्फी प्रेम.

love poem in marathi - प्रेम कविता मराठी

आम्ही अभ्यास सोडून दररोज मित्रांमध्ये ताटकळत तुमची वाट बघत थांबायच अन तुम्ही अमावस्या पौर्णिमेला घराबाहेर पडायच, 
आम्ही मित्रांना राम राम ठोकून एका कोपऱ्यातुन तुम्हाला चोरून चोरून बघायच, 
तुम्ही कानाडोळा करून एखाद्या पक्षावानी भुर्रकन निघून जायच, आम्ही तेवढया वेळेपुरते झुरायच,

का यालाच प्रेम म्हणायच ?


तुम्ही संध्याकाळी पाणी आणायला विहिरीकडे निघायच,
आम्ही घरातील भरलेला हंडा गडबडीत मोकळा करून तुम्हाला विहिरीवरती घाटायच,
तुम्हीबी ताटकळत आमची वाट बघत हंडा धुवत धुवतच बसायच
पोव्हरा दे ग...अस हक्कान म्हणत तुमच्याकडे आम्ही मन भरून बघायच
शेवटी तुमच्या हंड्यावर हंडा ठेवून दिल्यावरती तुम्ही तुमच्या अन आम्ही आमच्या घराकड निघायच

का यालाच प्रेम म्हणायच


love poem in marathi - मराठी प्रेम कविता
Love poem ani Prem kavita in marathi 


सायकलची दुरुस्ती करत आम्ही मुद्दाम तुमची वाट बघत रस्त्याच्या कडेला थांबायच
तुम्ही मैत्रिणीसोबत पाठीवर दप्तर टाकून ओढणी सावरत सावरत शाळेकडे निघायच
आम्ही तुम्हाला क्रॉस करून छटाकभर आरश्यातून चोरून एकटक बघायच
अचानक पुढून एसटी आल्यावर आम्ही बिथरून रस्त्याच्या कडेला पडायच
तुम्ही पळत पळत येवून लागल नाही ना, लक्ष कुठ होत म्हणत हसत हसत आम्हाला सावरायच
नाय नाय ब्रेकच लागला नाय म्हणत आम्ही लक्ष कुठ होत हे प्रकरण तेवढ्यापुरत झाकायच

का यालाच प्रेम म्हणायच


Prem kavita in marathi


आम्ही कपडे फाटस्टोपर्यंत एसटीच्या खिडकीतुन आतमध्ये घुसायच,
तुम्ही मुद्दाम उशिर करून आमच्या पुढ उभ टाकायच,
तुम्हाला जागा देऊन आम्ही मित्राच्या मांडीवर बसायच, 
खड्डे, वळणाचे आभार मानत, तुमच्या चोरट्या स्पर्शाने आम्ही हुरळून जायच, 
आता काम होतय, प्रपोज मारलाच पाहिजे ह्याच विचारात आम्ही रात्र रात्र जागायच, 

का यालाच प्रेम म्हणायच


मुलींच्या अपेक्षा काय असतात


अचानक तुम्ही लग्न ठरल्याने पाया पडायला मंदिरात गाजतवाजत यायच, 
आमच्या स्वप्नांचा बँड वाजल्याने आम्ही काही दिवस दर्दभरा आशिक होवून जगायच,
काही वर्षांनी तुम्ही थेट गावच्या जत्रेत पोराला कमरेवर घेऊन मिठाईच्या दुकानात दिसायच, 
तुमच्या बरा आहेस का याच उत्तर आम्ही श्वास सोडून गेला तरी आहे जिवंत असच द्यायच, 
हातातील जिलेबी बघून तुमच घाबड मामा, मामा म्हणत आमच्या अंगावर झेप घ्यायच, 
त्याचा हात जोराने दाबत बाळा मी तुझा काका हाय...मामा नाय...अस आम्ही रागाच्या भरात म्हणायच,

का यालाच प्रेम म्हणायच.....

© शैलेश कदम

Tags - कविता मराठी - prem kavita in marathi - Marathi love poem | प्रेम कविता | romantic poems | prem kavita marathi Marathi prem kavita prem kavita - एकतर्फी प्रेम. 

कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने