love story in marathi ही आहे एका कॉलेजमधील लव्हस्टोरी

love story in marathi 

एक कॉलेज लव्हस्टोरी कदाचित ही Love story in marathi तुमची पण सुद्धा असू शकते बर का 😁 जास्त वेळ न घेता सूरु करू आपली 

love story in marathi 

कॉलेज एडमिशन डेट  नंतर भरपुर दिवसातुन वर्गात आलो. मस्तपैकी सकाळी सकाळी वर्ग सुरु झाला, accountच मास्तर debit- all expenses and losses,

credit - all income and gains अस काहीतरी शिकवून वर्गाबाहेर निघून गेल, मी झोपेच सोंग घेत,

हात तोंडावर ठेवून डोळे उघडे राहतील एवढी जागा करून झोपी गेलो, पोरांना माहित नव्हतं कि पोरींना मागच्या बाकावर बसून बघायचो पहिल्या बेंचवर

बसलेल्या शिंद्यांच्या सोनीला, का बघायचो माहीत नाय,

पण बघतच राहायचो, फक्त बघतच राहायचो, तिच्याकड बघता बघता मधल्या बेंचवर बसलेली खोपड्याची पुनी dd national वरील चित्रपटात येना-या जाहिराती

सारखी मधी मधी येवून माझी एकाग्रता भंग करित होती,

तरी मी त्या जाहिरातींना न कंटाळता सोनीला एकटक निरखत होतो, "माझा आख्खा लाकडी बेंच कर्कटकने कोरून त्याचा 7/12 मी तिच्याच नावावर

करीत, निळ्या पेनच्या शाईची मोहोर त्यावर लावली होती"

आता फक्त माझ्या घरच्या रेशन कार्डवर तिची single entry करायची तेवढी राहिली व्हती " ह्या विचारात असताना,

हलकासा वारा वर्गात येवून खेळु लागला तसा खिडकीतुन येना-या थंडगार वा-याच्या झुळूखीबरोबर सोनीच्या केसाचा आकडा तिच्या गालावर हलुवार झोके घेवू लागला.

ती डिजिटल घड्याळातील आकड्यांप्रमाणे डोळ्यांची उघडझाप करीत, मैत्रिणीशी बोलता बोलता गुलाबी बांगड्या भरलेल्या हाताने वारंवार चेहऱ्यावरील आकडा

कानामागे अलगद सरकावत होती,

दिसायला काळी-सावळी तरी नाका डोळ्यात तरतरीत अशी, मक्याच्या कणसासारखे एकसंध दात, थोडी हसली तरी गालावरची खळीमुळे ती चार चौघात काही

औरच दिसायची, अश्या सौंदर्यापुढे तिला दागिन्यांनाची गरज ती काय होती ?

संध्याकाळी नित्यनियमाने गुरांमाग चिपाठी घेवून नाकासमोर चालणारी ती व तिच्या माग सुरक्षित अंतर ठेवत मोटरसायकलीवर 6 कि.मी अंतर तुडवत क्रिकेटला

रामराम करून येणारा मी हे सूत्रच बनल होत जणू,

त्या सोनीमध्ये अन हिच्यामध्ये लिलया फरक जाणवत होता, तरी मी त्याच नादात तिला पाहण्यात गुंग होतो, अगदी तपश्चर्येला बसलेल्या शिवभक्त रावणासारखा.

अचानक काही समजेना काय झाल! स्तब्ध शांतता अन सगळा वर्ग उभा का बर ?

तेवडयात मी भाणावर येवून तपश्चर्या मोडून उभा झालो पुढे पाहतो तर काय एक ओळखीचे गृहस्थ पुढे उभे होते, हे तर अर्थशास्त्राचे खान मास्तर ! त्यानी

बसण्याची सुचना करण्यागोदरच मी खाली बसलो,

कारण खान सरांचा स्वभाव सर्वी ठाय होता, 45 मिनीट प्रमाणिकपणे शिकवणे विद्यार्थ्याने काय करावे, काय करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न होता फक्त शिकवताना

वाक्यागनीस "डबल अंडरलाईन" बोलायला मात्र ते विसरत नव्हते,

मास्तरनी शिकवायला सुरुवात केली खरी, पण मास्तर काय शिकवत होता हे त्याला अन वर्गाला ठाव ? पण सोनीची एक एक अदा शांत पाण्यात विज कोसळावी

तसी मनावर चर्रर्रर्कन आघात करत होती,

श्वासागणिक तिच्या वेनितला मोगरा अधिकच घुमत होता, माझी नजर तिच्या नजरेला धडकुन अशक्य अश्या भारत-पाक मिलाफाची वाट बघत होती, विलंबाने का

होईना तो क्षण आलाच माझ्यासाठी बजरंगी भाईजान बनलेल्या वा-याने त्याच काम चोख बजावल,

फळ्यावर लक्ष केंद्रीत केलेल्या सोनीचा बाकावरील रुमाल वा-याच्या झोकात हळुवार खाली पडला, हा सैर बैर वारा सुद्धा तिच्याच रूपावर भाळला त्यात आश्चर्य

वाटायची गोष्ट नव्हती !

स्वतःला सावरत रुमाल उचलताना तिची तिरकी नजर अचानक माझ्यावर पडली, दिवाळखोर भागीदार झाल्यासारखा मी बुचकळ्यात सापडलो होतो,

अंगाचा थरकाप उडून ह्रदयाचे ठोके मागणी व पुरवठ्यासारखे खाली-वर होऊ लागले परन्तु काय उपयोग तोंडावर हात ठेवल्याने तिला माझे कृत्य समजले नव्हते,

त्यामुळे सीमांत उपयोगिता संम्पलेला मी तोंडावरिल हात काढून खुल्या बाजारपेठेत उतरल्यासारखा बेमालूमपणे तिला खान सरांच्या कमी उंचीचा फायदा घेत

निरखु लागलो होतो.

बेंचवरील जोडीदार बडबड्या किरण आज सोनीच्या नावाने मला डिवचत नव्हता म्हणून सहज त्याच्यावर नजर टाकली तर, हा एवढा मान तुटेस पर्यंत कोणाकडे

पाहतोय काय उमजत नव्हत,

एवढा शिकवण्यात लक्ष देणारा, चिखलगाव मार्गे एसटीचा सरळ प्रवास करणारा हा मुलगा, ती एसटी सोडून निरा-लोणंदवालीच्या एसटीत कधी घुसला काय

समजलं नाही,

स्मितहास्य करून नजर वर्गात चौफेर फिरवली तर सर्व शांतता दिसत होती, च्यायायला हि काळ्यांची करुणी एकटक माझ्याकडे एवढ्या रागात का बघतीया ?

माझ्यावर लाईन मारतीय का काय ? छे छे ती कुठ अन मी कुठ ! कंपणीतील तुटलेल्या furniture वरील deprecation सारखी दिसणारी ती,  तर मी त्याच

कंपनीच्या goodwill सारखा होतो, मर पडू दे तिला,

आपण बर आणी आपली लाईन बर म्हणत पुन्हा रुबाबात बेंचवर आडवा झालो, परंतू अजून सोनी माझ्याकडे काय घंटा पाहायला तयार नव्हती, पाहतो तर काय

वारा पुन्हा त्याच दिमाखात माझ्या मदतीला धावून आला होता,

अर्थशास्त्र ग्रहण करणाऱ्या सोनीचा रुमाल त्याच लयीत खाली पडणार, तेव्ड्यात नकोषी वाटणारी किर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करीत घंटा कानी पडली, अन सर्व वर्ग कधी

न जुळणाऱ्या balance sheet सारखा आमच्या मधोमध उभा झाला.

तर ही होती एक love story in marathi 

ना तु अप्सरा, ना तु सुंदरा, ना तु कोणी परी,

भरपुर नक्षञ ह्या वर्गात, मनावर कोसळली उल्का स्वभावाची,

कातर-कातर आवाज तुझा, त्यात जान भरलीय गालावर ऊसळलेल्या लाटांनी,

काळ्या -सावळ्या रुपड्यात काय खास मढवली ग देवानी,

का सारखाच होतो भुकंप तुझ्या उरी, चालतेस पाडसाच्या पावलानी,

अजुन तु न पाहीले, ना पुरते ओळखले मला, ही वेळ न व्यक्त होण्याची,

यदा-कदाचित भाळलो मी तुजला, तर तयारी माझीही सैराट होण्याची.....

ही कॉलेज वाली लव स्टोरी कॉलेज लव्हस्टोरी - college love story in marathi कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.

© शैलेश कदम
(कथा काल्पनिक आहे, लेखकाच्या वास्तविक जीवनाशी याचा काहीएक संबंध नाही, नावे जुळल्यास तो योगायोग समजावा)

कॉलेज लव्हस्टोरी - college love story in marathi
कॉलेज लव्हस्टोरी - college love story in marathi 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने