marathi blogs on relationships पत्नीच्या अपेक्षा केव्हा पूर्ण होणार

marathi blogs on relationships

Bad relationship in marathi - good thought on relationship in marathi, relation between husband and wife in marathi

ही गोष्ट आहे एका नवऱ्याची ज्याला त्याच्या पत्नीची किंमत समजायला उशीर झाला बहुत का बोलणे प्रत्यक्ष वाचा तुम्हीच आता.

, relation between husband and wife in marathi
relation between husband and wife in marathi

relation between husband and wife in marathi blog

10-15 मिनिट झाले ह्या कट्ट्यावर बसून, पण मनात दाटलेल्या  आठवणी शिवाय काहीच येईना, मन काठोकाठ भरून आले आहे समोर वाहणाऱ्या पाण्यासारखे, खरच निसर्ग एवढ्या भारी आविष्कारांची देणी लुटतो पण आपणच कमी पडतो कुठे तरी लुटायला, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढी रम्य संध्याकाळ अनुभवत आहे, निसर्गाची लयलूट पाहत आहे. पण मी मुकलो ह्या आनंदाला आता निरस वाटत हे सर्व.
पाहिलत बाजूला मंदिर आहे मन मोकळे करायला व समोर आभाळ आहे जुने विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी प्रवृत्त करायला पण मीच फाटक्या झोळीचा निघालो हे पदरात पाडायला ही समज यायला खूप उशीर झाला आता...

Bad relationship in marathi blog


relation between husband and wife in marathi blog

relation between husband and wife in marathi blog


बघा ना, माझ्या लग्नाला 41 वर्षे होऊन गेलीत, बायकोला सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने तिला जवळच्या दवाखान्यात भरती केले उपचार तर चालू आहेत पण ती औषध पाण्याला किती प्रतिसाद देईल ते मलाच माहिती, दमली हो ती संसार, माणस जपता जपता कदाचित आजचा सूर्यास्त तिचा शेवटचा असावा... देवा ~~~

समजल पण नाही आमचे लग्न होऊन पोर-बाळ, नातवंडे केव्हा आलीत, कदाचित कित्येक वर्षांनंतर आजच मी एवढा निवांतपणे बसलोय... हे सुर्यदेवा कारे ह्या ढगाचा आडोसा घेऊन मला कोसतो आहेस, शिव्या शाप देतो आहेस !!!

मान्य करतो मी आज, हे जीवन क्षणभंगुर आहे. चुकलोय मी खूप. म्हणूनच आज माझी प्रिय पत्नी मला सोडून जाणार आहे आणि मी सुद्धा असाच केव्हा तरी अचानक तुला भेटायला येईल. पण ह्या 76 वर्षाच्या आयुष्यात मी असा निवांतपणा कधी अनुभवला सुद्धा नसेल पण आज का अनुभवा वाटल बर ?

कदाचित बायकोनंतर मन मोकळे करायला तूच एक सखा आहेस जो माझ्या चुका पोटी घालशील, पित्याच्या मायेने डोक्यावरून हात फिरवशील.

Marathi story of wife and husband 

परमेश्वरा ह्या लालबुंद आकाशात मला माझाच अस्त होताना दिसतोय, काय कमावले मी ह्या जीवनात. माझी पत्नी जी मरणाच्या प्रतीक्षेत आहे, तिच्या सोबत अश्या मोकळ्या अवकाशाखाली कधी मनमोकळ्या गप्पा सुद्धा मारलेल्या आठवत नाहीत की तिची हौस पूर्ण केलेली आठवत नाही,

कधी साडीच्या दुकानात गेलो व तिला एखादी साडी आवडली तर मी डोळ्याने दाबून दुसरी घ्यायला भाग पाडायचो का ? मला ती साडी घ्यायला परवडत नव्हती म्हणून की तिची हौस करायची नव्हती म्हणून ?

माझ्याकडे पैसे नव्हते अस पण नाही, मंग का त्यावेळी माझे मन एवढे संकोचिंत झाले ? तिला कधी स्वतःच्या चार चाकी मध्ये स्वतःसोबत फिरायला सुद्धा नेले नाही की मी फिरलो नाही पण का ? आता सुद्धा माझ्या खात्यात लाखो रुपये पडून आहेत काय करू आता त्यांचे ?

ती तिचे आयुष्य जगली असेल फक्त बालपणीच नंतर लग्नानंतर मात्र माझे व मुलांचे चोचले पुरवण्यात तिने आयुष्य खर्ची घातले मंग ती स्वतःसाठी जगली कधी ? ती जगली एक पत्नी, एक आई म्हणून मंग तिचे स्वतःचे असे अस्तित्व काय रे देवा ? म्हणजे

आमच्या सुखात ती स्वतःचे सुख शोधत होती बस! हीच होती का तिच्या जगण्याची व्याख्या ? म्हणजे झिजनेच हेच असते का बाईच्या आयुष्याचा सार !!!

Thought on relationship in marathi

अस असेल तर मंग माझ्या सारखा अपराधी माणूस मीच असेल ना ? मी तर माझ्या मित्रांसोबत अनेकदा पार्ट्या केल्यात, अनेक पेग कॉलेजच्या आठवणीमध्ये रिचवले, माझे आयुष्य मात्र मी आनंदात जगलो.

मी माझ्या मुलांना सुद्धा हव्या त्या वस्तू निःसंकोचपणे देऊन टाकल्या सायकल, मोबाईल, मोटारसायकल म्हणू नका. पण माझ्या पत्नीने कधी कोणता हट्ट पण केला नाही आणि मी हौसेने काही घेऊन सुद्धा गेलो नाही.

पण आता हे सर्व बोलून काय उपयोग ? मला माफ करा सरकार मी तुम्हाला समजू शकलो नाही आता समजलो तर फार उशीर झालाय माफ करा मला माफ करा... माझ्या कामाच्या नादात, पैसे कमावण्याच्या नादात सर्वांना विसरून अगदी स्वतःला सुद्धा वेळ देता आला नाही,

आता हात पायांनी साथ देणे सोडले तेव्हा मला माझी चूक समजली पण काय अर्थ ह्या चुकीच्या उमगण्याला, पण तू मात्र झिजलीस चंदनापरी झिजलीस सर्वांच्या आयुष्याला सुगंध देऊन स्वतः नष्ट झालीस तुझे मोल मी फार उशिरा समजलो.

अरे माझ्या रडगाण्याला कंटाळून हा सूर्यदेव केव्हाच अस्तास निघून गेला जाता जाता अवकाशात रंगबेरंगी छटा सोडून गेला...

अगदी माझ्या पत्नीच्या प्रेमळ, मायाळू आठवणी सारख्या नेहमी मनात साठवून ठेवाव्या अश्या...
सूर्यनारायणा हा फोन कोणाचा आला बर ! आपल्या दोघात व्यत्यय आणायला कदाचित सरकार.....

ठिकाण- भोर
फोटो- आकाश ओतारी

Bad relationship in marathi - good thought on relationship in marathi, relation between husband and wife in marathi

एका अपमानाची गोष्ट- अपमान हे असे कर्ज आहे ज्याची परतफेड

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने