राहुल द्रविड
Rahul dravid chi mahiti marathi madhe
पद्म भूषण, पद्मश्री, @राहुल शरद द्रविड हा माझा आवडता खेळाडू त्याबद्दल हा लेख त्याला समर्पित करीत आहे. Rahul dravid chi mahiti marathi madhe
Rahul dravid chi mahiti
एखाद्यामद्ये गुणवत्ता ठासून भरलेली असताना विधात्याने त्या भूमिकेला न्याय न देता उपेक्षित ठेवल्यास मला खूप चीड येते त्या भूमिकेत महाभारतातील कर्ण असो नाहीतर भारताचा माजी कर्णदार- राहुल द्रविड.
![]() |
Rahul dravid chi mahiti marathi madheका कोण जाणे परंतु मला सचिन, धोनी पेक्षा राहुल द्रविड नेहमीच भावला, सचिनचा nervous 90 attitude वरती तर धोनीच्या गटबाजी धोरणावरती (मुरली विजय, रैना, जडेजा, अश्विन) असो नाहीतर सेहवाग, गंम्भीर प्रकरण त्यामुळे मला त्यांची चिड यायची ती अजूनही आहेच, त्यात राहुल द्रविड निश्चितच खेळाडू म्हणून test, one day, T20 च्या मैदानात ताठ मानेने जगला व जगभरातील रसिकांची मने जिंकली व प्रेम मिळवले. राहुल द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेट ला पडलेले सुंदर स्वप्न, कसोटी क्रिकेट मधील भारताचा मानबिंदू ...अपेक्षा पूर्ण करणारा हुकुमी खेळाडू ,गोलंदाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहून हुकुमी फटका मारणारा तंत्रशुद्ध फलंदाज. स्लीप मधील अप्रतिम क्षेत्ररक्षक, अव्वल यष्टीरक्षक,उत्तम कप्तान आणि प्रतिस्पर्धी संघाचा विजय आणि भारताचा पराभव यामध्ये उभी असलेली खंबीर भिंत ! राहुल द्रविड.....३१,२५८ चेंडू कसोटी कारकिर्दीत खेळलेला एकमेव कसोटीपट्टू. #the_wall_fan_club_jammy_mr_defendable |
Post a Comment