राजगड किल्ला ट्रेक - Rajgad fort trek blog

rajgad fort information in marathi

Tags - Rajgad | rajgad fort information in marathi | rajgad fort height | rajgad fort distance from pune | rajgad fort from pune | rajgad fort map | rajgad trek distance.


Rajgad


किल्ले राजगड ( rajgad fort ), हिंदवी स्वराज्याची राजधानी
गडांचा राजा, राजियांचा गड, राजगड ( rajgad ) हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. 

पुण्याच्या नैऋत्येला ( rajgad distance from pune )  ४८ किमी अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडी नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. 

तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. 

एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. rajgad fort height
शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.

rajgad fort height
 rajgad fort height


काळेश्वरी बुरुज आणि परिसर:

सुवेळा माचीच्या दुसर्‍या टप्प्याकडे जाणार्‍या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.

या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.


बालेकिल्ला: ( rajgad balekilla )

राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत.

दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला "उत्तर बुरुज" असे म्हणतात.

येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.


Raigad fort

Rajgad fort 




पोहोचण्याच्या वाटा :
१) गुप्त दरवाजाने राजगड :-
पुणे - राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

२) पाली दरवाज्याने राजगड:-
पुणे - वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे "पाबे" या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायर्‍याची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

३) गुंजवणे दरवाज्याने राजगङ :-
पुणे - वेल्हे या हमरस्त्यावरील "मार्गासनी" या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.

४) अळु दरवाज्याने राजगड:-
भुतोंडे मार्गे आळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.

५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची:-
गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माचीवर येते.
राहाण्याची सोय :
१) गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२) पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत


Rajgad fort information in marathi

Rajgad fort information in marathi



जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.



जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून ३ तास लागतात.


महाराणी सईबाई यांची समाधी
महाराणी सईबाई यांची समाधी


Tags - Rajgad | rajgad fort information in marathi | rajgad fort height | rajgad fort distance from pune | rajgad fort from pune | rajgad fort map | rajgad trek distance.

हे सुद्धा वाचा - 




thanks to trekshitiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने