डायन राणी व सफरचंद मराठी भयकथा Real horror stories in marathi

Real horror stories in marathi


आम्ही अरुणाचल प्रदेश येथून चीन सीमेवर मॅकमोहन रेषेकडे जाणार होतो त्याअगोदर तवांग जिल्ह्यात मुक्काम करता तेथील स्थानिक लोकांनी सांगितलेली horror stories मधील ही भयकथा गोष्ट ही तशी भयकथा नसली तरी काहीतरी वेगळी माहिती horror stories नक्की आहे... 

मराठी भयकथा सुरू करू


डब्बानेंग ही एक तवांग जिल्ह्यातील एक दुर्गम ठिकाणी असलेली वस्ती, येथे एक तरणाबांड राजा राज्य करीत होता त्याचे नाव केपू कलंबो व त्याला एक सुंदर अशी राणी होती दून हजम्बो, दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते, राजाचे राज्य सुद्धा सुखात होते तस प्रत्येक गोष्टीत असत अगदी तसच, 


Real horror stories in marathi

Real horror stories in marathi
एक दिवस राजा असच आपल्या राज्यात सैनिकांसह गस्त करीत होता, फिरता फिरता राज्याची नजर एका घराबाहेर असलेल्या शेतकऱ्यांच्या सुंदर मुलीवर पडली, दिसायला ती मुलगी उंच अशी, 

तिचा रंग- म्हणजे जणू सुर्यप्रकाश तिचे वरून परावर्तित व्हावा असाच, बांध्याने सडपातळ नाजूक अशी, तिचे भुरळे भुरळे केस, छोटेशे निळेभोर डोळे, टोकदार साजेशे असे नाक पाहता क्षणी राजाच काय कोणी सुद्धा प्रेमात पडेल अशीच होती ती... 

राजाने आपल्या प्रधानास त्या मुलीबद्दल तिच्या पित्यास मागणी घालायला सांगितली, राजआज्ञा पाळत प्रधानाने त्या सुंदर मुलीच्या पित्यास जावून तुमची मुलगी आपल्या राजाना आवडली असून तिला ह्या नगरीची राणी करण्याचा मानस राजासाहेबांचा आहे तर आपल्याला काय वाटते याचा प्रश्न प्रधानाने केल्यावर, 

तो पिता उतरला, " प्रधान साहेब आपल्या नावलौकिक मिळवलेल्या व साहसी राजाला मुलगी देणे माझेच भाग्यच असेल तुम्ही मुहूर्त काढा आमची काही तक्रार नाही आम्ही स्वखुशीने तयार आहोत... 

ह्या गप्पा ती शेतकऱ्याची मुलगी चोरून ऐकत होती ती मनोमन प्रसन्न झाली होती कारण राजा हा विद्वान होता, पराक्रमी होता त्यात आता तिचा हुकूम आता पूर्ण राज्यावर चालणार होता ती राजाची अर्धांगिनी होणार होती...

आता राजाला दोन राणी होत्या एक मोठी राणी दून हजम्बो आणि आताची छोटी राणी अम्मा खंडोमवा, राजा दोन्ही राण्यांना सारखाच प्रेम करीत होता, परंतू मोठ्या राणीस ते लहान राणीचा आपल्या आयुष्यात झालेला प्रवेश आवडला नाही.

म्हणून हळूहळू तीने आपले पूर्व रूप धारण करायला सुरुवात केली जे तवांगवाले त्यास दून म्हणजे डायन म्हणत, आता ही मोठी राणी डायन बनून राज्यातील माणसांना छळू लागली, त्यांना वश करून गुलाम बनवू लागली, 

ह्या डायनला रोखणे अवगड होऊ लागले, तिला मारणे अशक्य होत त्यात लहान राणी जी दैवी अवताराची होती तिला पुत्ररत्न झाले व साक्षात बौद्ध अवतारात मुलाने जन्म घेतला त्याचे नाव " संगे " असे ठेवण्यात आले... 

कालांतराने दुसऱ्या राणीने व तिचा मुलगा संगे याने भिक्षू लोकांचे मदतीने दून हजम्बोला कैद करून गावापासून दूर असलेल्या तिबेटच्या रस्त्यावर एका काळ्या रंगाचा स्तुपात मंत्र-जाप करून कोंडून ठेवले अजून ही ती त्या महालात जिवंत आहे कारण डायनला मृत्यू नसतो म्हणून, 

तिच्या जवळपास 30 मीटरच्या अंतरावर जरी कोणी गेले तरी ती माणसांना वश करून स्वतःजवळ बोलावून घेते आणि एकतरी बळी द्यावा लागतो, अजूनही तिची असह्य वेदना देणारी किंकाळी ऐकू येते असे स्थानिक लोक मानतात...

ह्या डायनच्या वंशाच्या अजून काही मुली अजून त्या भागात जिवंत आहेत, त्या अजूनही जगातील सुंदर नारिंपैकी एक आहेत, त्यांचाकडे आपण एकटक पाहत राहिलो, 

गोडीगुलाबीने बोलू लागलो व त्यांना हे आवडल नाही तर त्या आपल्याला नुकसान पोहचवू शकतात, त्यांच्याकडून आपण एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूवर त्या स्वतःची नख मारून विष त्यामध्ये टाकून देतात त्या विषाचा आपल्यावर हळू हळू प्रभाव पडतो... 

हा रोग ना कॅन्सर, ना हिवताप, ना कोणताच प्रकारचा संसर्ग यावर डॉक्टर सुद्धा निष्कर्ष देऊ शकत नाहीत, त्यामुळे बाहेरच्या कोणत्याही ठिकाणी खरेदी करताना बंद पाकिटातील वस्तू घेण्यावर भर द्यावा.

जर ह्या मुलींसोबत आपले लग्न झाले तर त्या दरवर्षी एक एक करून सर्वांना मारून टाकतात, अशी आख्यायिका तेथील स्थानिक लोक सांगतात... 

@ शैलेश कदम
horror stories in marathi

Real horror stories in marathiआम्ही ट्रेकिंग करिता तवांग जिल्ह्यात फिरताना स्थानिक लोकांनी वरील मराठी भयकथा Horror stories आम्हाला सांगितली होती.
धन्यवाद.

अजून हे सुद्धा वाचा 

 

अपमानाचा असा बदला कोणी घेतलेला नसेलPost a Comment

थोडे नवीन जरा जुने