छत्रपती शिवाजी महाराज व बहिर्जी यांची गोष्ट shivaji maharajanchi goshti

shivaji maharajanchi goshti - शिवाजी महाराज यांची गोष्ट

story of shivaji maharaj marathi - शिवाजी महाराज यांची गोष्ट shivaji maharajanchi goshti -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी - shivaji maharajanchi chan chan goshti तर चला सुरुवात करूया आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व बहिर्जी यांच्या गोष्टीला... 

shivaji maharajanchi goshti


अव्ह राज...शिवबा राज, आईकताय नव्ह ?

शिवबा राज - कोण हाय, बहिर्जी ! तुम्ही हाय सा व्हय, काय म्हणतासा ? लय दिसान आठवण काढलीसा, काय म्हणतीया आपली रयत, समद खुशाल हाय नव्ह तिकड ?

बहिर्जी- मुजरा घ्या राज...अव्ह राज समद ठाऊक हाय तुम्हासनी, काय करतीया तुमची रयत अन ह्या समद्या रयतेचे रखवालदार, तुम्ही आज्ञा केलीया म्हणुन फकस्त ह्या रयतेवर नजर ठेऊन हाय, नायतर आतापावेतो कितीक जिवाच्या खांडूळी केल्या असत्या बघा म्या.

शिवबा राज- रागावर अंकुश लावासा बहिर्जी, संतापान काय व्हत असतय व्हय, काय झालय काय कळूद्याकी आम्हासनीबी.

बहिर्जी- राज....उगा कश्याला, नाय एकवणार तुम्हासनी.

शिवबा राज- माझ्या रयतेची खुशाली मला समजायचा नग का ?

बहिर्जी- तस नव्हत म्हणायच मला थोरल धनी, सांगतू बर... राज, आता तुमच्या ह्या बहिर्जीचच घ्याकी महाराष्ट्र देशात फिरताना मला मावळ्यांच्या वेषात नाय फिरता येत व्हो, 

ह्या वेषात फिरताना लाज वाटतीया असबी नाय, अन फिरलो बी अस्तू पण तुमची रयत मला ह्या मावळ्यांच्या वेषात पाहिली की वाजनत्रीवाला म्हणून हिनावतीया, हो वाजनत्रीवाला ! कारण लोकांच्या लग्नात आता वाजनत्री वाजवायला मावळेच असत्यात की, जिथ आम्ही ह्यांना स्वराज्य मिळाव म्हणूनश्यान औरंग्याचा, अफजल्याचा, इंग्रज, पोर्तुगीज यांचा संभळ वाजवलसा, त्याच मावळ्यांना आता हे दिवस आल्यात बघा. 

shivaji maharajanchi chan chan goshti 

एवडच नाय, त्यादिवशी खूप फिरलो भुकेने व्याकुळ झालो तव्हा कुठ एक हाटेल दिसल म्हणूनश्यान तिकड जायला लागलू तर माझ्या स्वागताला बाहेर मावळच होत, काही तुतारी वाजवत होत तर कायजण हातात हाटेलच्या नावाची पाटी घेऊन उभ टाकल होतीत, हे पाहून मनात चलबिचल झाली अन पोटाची आग पोटातच नायशी झाली,  

राज... ह्यासाठीच आपण स्वराज्य निर्माण केल का ? आम्हासनी दिवाळीला केलेल्या किल्ल्यावर ठेवण्याइतपत ठीक होत की... पण...पण लग्नात वाजवायला, हाटेलाची जाहिरात करायला आम्हीच दिसलो का राज, कुठ स्वराज्यासाठी हाताची ढाल करून लढणार,  तुमच्या पालखीस रगात येई पर्यंत खांदा देणार आम्ही, आता हीच लायकी हीच पत शिल्लक काहो आमची ?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी 

काही दिसामाग आपल्या तान्ह्याची व शेलार मामाची लय आठवण यायला लागली होती म्हणून याव म्हणालो त्यांना भेटूनश्यान म्हणून म्या रातीलाच सिंहगडासी गेलो तर काय पाहतोय राज... तिकडे कोण दारू पित्याती, मांसाहार खात्याती, कोण खालेल्या वस्तू तिकडच टाकत्याती, गडावर पोरी फिरवस्त पर्यन्त नजर गेलीया ह्या गिधाडांची फक्स्त कोंढाणा नाय व्ह राज समधीकढ हीच खबर हाय...

त्या सिहँगडावर तान्ह्याच्या व शेलार मामाचा जीव पुरता गुदमरून गेलाय राज...त्यांना राम राम घेऊन पहिल्या राजधानिकड गेलो तर महाराणी सईबाईंची समाधी ऊन वाऱ्याबरोबर स्वराज्य आल तरी बी अजून लढतीया का आपला जनम फकस्त लढण्यासाठी झालाय ?  

काय उमजना म्हणून तडक रायरेश्वर तर्फ भोर किले रोहिड्यावर जाऊनश्यान महादेवापुढ गाऱ्हाण गाव म्हणलू तर तिकडचा रस्ताबी कव्हा पासून अपूऱ्या अवस्थेत पडला होतासा, आता कुठ सातारवाल्यानी त्यांच्या सीमेत येतो म्हणून केंजळगडाशी मार्ग आणिला म्हणून महादेवाशी भेट घडली.


आपल्या शतकात इज्ञान प्रगत नव्हत, आताच्या ह्या इज्ञानाच्या युगात मलाभी इतल्या परिस्थितीसी मिळत जुळत राहायला लागतय, म्हणून काय ते फेसबुकच खात उघडल, बर वाटल तुमचे मावळे बघून पण समय बितला तस म्या उमगलो तुमच्या नावाच शिवप्रेमी, शिवकन्या, शिवरायांचा लाडका म्हणून दुकान उगडलीता इकड लोकांनी कसल बी फोटू टाकट्याती त्याखाली कायभी लिहित्याती


आणी नुसती भीक मागत्याती, ही लोक आमच्या वाघाला फकस्त वाघच like करणार, ह्या फोटोसनी 5000 like झालच पाहिजे म्हणूनश्यान, नावपुढ शिवभक्त, शिवकन्या लावून, माथ्यासनी चंद्रकोर अन दाढी कोरून कोणी मावळा होत अस्तू का ? आम्ही कधी नावापुढ लावल का हो ! शिवभक्त बहिर्जी म्हणून आमची भक्ती होती ती अगदी मनामधी वसलेली, तुमच्या पायासनी वाहिलेली राज... 

का ती बोलून दाखवायची असती वे कुठ... बर चंद्रकोर लावण्यानी की दाढी कोरल्यानी काय फरक नसता पडला पण ही लोक शिवभक्त म्हणून तोंड भरस्तोपर्यंत मावा खाऊन किल्ल्यांच्या पायऱ्यांवर धुकत्यात कुठ ठेवली लाज ह्यांनी, मुळासकट जीभ उफडून फेकावी वाटत ह्यांची, 

कुठ दाढी वाढवून मडगार्डवर धूळ खात पडलेल्या तुमचा फोटो असलेल्या गाडीवनी पोरींच्या माग फिरट्यात हो ही शिवभक्त, मराठा असल्याची, बदनामीची कसलीच फिकीर नाय राहिली यांसनी, तुमची ही शिकवण नव्हती व्हो आम्हांसनी, काही लोकांनी तर तुमच्या नावासनी भांडवल केलसा दोन चार शब्द तुमच्या नावाने बोलूनश्यान बकल पैसा उखळत्याती, त्यात किती खरा इतिहास किती खोटा हे त्यांना महितीबी नसत राज...

 आपल्या रक्तरंजीत मराठा इतिहासाची किती दस्तऐवज धूळ खात पड्याती अन किती वाळवी लागून नष्ट होत्याती त्याचा हिसाब नाय कोणाकड महाराष्ट्र देशात मोडी लिपी इतल्या सरकारन कधीच बंद केलीसा मंग कसा समजायचा आपला इतिहास का तो किल्ल्याच्या अस्तित्वासारखा काळानुसार नष्ट व्हायचा राज.


अजून एक राहील किव्हो आपला भगवा आता रंग सोडू लागलाय, त्या भगव्याचही वाटे झाल्याती, कुणी लाल, कुणी निळा, कुणी हिरवा, कुणी पिवळा रंग फडकवू लागलेत, आता पंजाब, सिंध, गुजरात, मराठा मधील मराठा आता राजकीय लोभापोटी पूरा विभागला गेलाय जातींमधी...


पण कव्हा कव्हा उर भरून येतो राज... हे पाहिल की काही पोर ज्यांना खर हक्क हाय नावापुढ शिवभक्त लावण्याचा, माथी चंद्रकोर लावण्याचा जी आठवड्याची सुट्टीभी घरच्यांसोबत न घालवता, जात्यात एकाद्या पडक्या किल्ल्यावर तिकड जाऊन डागडुजी, साफसफाई करण्यात घाम घालून दिवस घालवत्याती, 

कोणी दिवाळी - दसऱ्याला किल्ल्यावरती जात्याती अन नारळ तोरण वाहत्याती अन त्यांच तन मन धन पुरत पुरत तुमच्या सेवेसी वाहत्याती तव्हा मला त्यांच्या कार्यात तुम्ही जिंदा दिसला, राज...तुम्ही जिंदा दिसला... 

राज रायगडी तुमचा राज्यभिषेकाचा थाट पाहून अंगात वारा संचारला व्हता, पोर घरी नाय काम करायची पर इकड जीव तोडत्याती हो तुमच्यासाठी जीव तोडत्याती... त्यात कुणी दुर्गवीर असतील, कुणी शिवछत्रपती परिवार असतील, कुणी राज्यभिषेक समितीवाली असत्यात अजून असा बऱ्याच हाईत यांचाही हिसाब नाय राज....

पावनखिंडीसी आता लय पोर धडक देऊ लागत्याती काहीतर दरवर्षी न चुकता वारी करत्याती मज्या करण्यासाठी नाय व्ह, आपल्या बाजीच्या आठवणीत अंगावर काटा येई पर्यंत पायाशी गोळा आला तरी फिरट्याती हो...राज काय झाल सा...लय बोलून गेलो नाय ना ? काय चुकल तर माफी असावी.

story of shivaji maharaj marathi - शिवाजी महाराज यांची गोष्ट

शिवबा राज- नाय व्ह बहिर्जी तुम्ही जादा नाय बोललासा जी खबर आहे ती तुम्ही देत असा, तुम्ही एक इसरलाशी, आपल्या स्वराज्याला तव्हा भी
जशी वाईट, गद्दार तशी चांगली पण माणस लाभली व्हती की अगदी तुमच्यावाणी, अन सध्या हीच परिस्थिती हाय की इकड, इथली चांगली माणस एकजूट व्हवून वाईटाला चांगल्या मार्गासनी लावट्याती की नाय बघाच तुम्ही, 

आता पुन्हा माँसाहेब जिजाऊ अन तुमचा शिवबा लोकांच्या मनावर पुन्हा नुसत शाहिरी साज चढवून नायतर, मनात घुसून राज्य करतो की नाय बघाल तुम्ही, बहिर्जी आपल्या स्वराज्याची गड किल्ल्यांची संपत्ती हाय तशी नाय पण नक्कीच एक दिवस स्वतःच्या पायी उभी राहिल।

 ती बी सरकारन नाय केल तर हे मावळ पुन्हा कुणी संता, धना, तान्हा, येसाजी होऊन भगव्याखाली एकजूट व्हवून करतील तर त्यांसी जुनी जाणत कान्होजीबाबा होऊ रस्ता दाखवतील थोडा समय लागल पण नक्की व्हईल, कुणी मायभूमीत, कुणी कर्नाटकी, पार विदेशात जाऊन कागदपत्रांचा अभ्यास करतील, बघाल तुम्ही काही दिसांन हा शिवबा नुसता फकस्त जपायचा मंत्र म्हणून राहणार नाय तर जगण्याच तंत्र म्हणून राहील मला माझ्या रयतेवर पुरा विश्वास हाय...

त्यामुळ मला फिकीर नाय वाटत बहिर्जी महाराष्ट्र देशात राहून तुम्ही तुमच कार्य चालूच ठेवाजी, मला आता निघाया हव, भवानी मातेच्या आरतीचा समय झाला उगा विलंब नको मातेस नाराज करू नाय चालायच चला निघतो जगदंब जगदंब...

बहिर्जी - जी राज... आता कुठ म्या निवांत झालोसा, मुजरा घ्यावा.....

©शैलेश कदम
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
@फोटो-नेटसाभार
Home

story of shivaji maharaj marathi - शिवाजी महाराज यांची गोष्ट shivaji maharajanchi goshti -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी - shivaji maharajanchi chan chan goshti तर चला सुरुवात करूया आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व बहिर्जी यांच्या गोष्टीला... 

shivaji maharajanchi goshti
shivaji maharajanchi goshti 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने