shivneri fort trek blog

किल्ले शिवनेरी दाखवा

Shivneri fort trek blog

TAgs - Shivneri trek, shivneri trek time, shivneri trek blog, shivneri fort trek, shivneri fort trekking, shivneri trek difficulty level, shivneri fort trek difficulty level, shivneri fort trek time

Shivneri fort trek blog

                 
असाच कामानिमित्त जुन्नर तालुक्यात जाण्याचा योग आला तेथील  काम झाल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास सुरु करावा असा विचार मनात होता परंतु येथून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी फक्त ५० ते ६० कि.मी अंतरावर असल्याचे समजल मंग काय पकडली महामंडळाची एसटी निघालो थेट जुन्नर.

किल्ल्याच्या पाय्थापर्यंत गाड्यासुद्धा वेळोवेळी मिळत गेल्या व जगात चांगल्या लोकांची कमी नाही याची प्रचिती आली. किल्ल्याच्या चढाई अवगड नाही, त्यात पायऱ्या असल्याने चढाई सोप्पी होऊन जाते. किल्ल्यावर जाताना इतिहासाचे साक्षीदार बुलंद असे दरवाजे लागतात. अशावेळी फोटो काढण्याचा मोह कोण टाळणार मंग काय काढला HTC बाहेर केल्या स्वप्रतिमा काढायला सुरवात.

Shivneri fort trek blog

Shivneri fort trek blog


Shivneri fort trek blog

Shivneri fort trek blog


थोडे वर गेल्यानंतर प्रथम शिवाई दर्शन, शिवाई मंदिराचे बाजूला ५/६ लहान मोठ्या गुंफा लागतात तेथेच एका गुंफेत एक निसर्गाने स्वताहून वातानुकुलीचा दर्जा दिला असावा असे मंदिर आहे.

Shivneri fort trek blog

Shivneri fort trek blog


पहाटे लवकर उठून अंघोळ करून जुन्नरला निघालो होतो परंतु वरुण राजाच्या मनात वेगळाच खेळ चालला होता त्याला, मला पुनश्च अंघोळ घालाविशी वाटली असावी त्याने त्याची आकांशा पूर्ण केली व मला मुसळधार पावसात देवदर्शनापूर्वी न्हाऊ घातल.

लोग तो ऐशो-आराम मे जन्नत धुंढते हे
लेकीन असली जन्नत तो मेरे सामने खडी थी
Shivneri fort trekking blog

Shivneri fort trek blogनिसर्गाचे सौंदर्य पाहायचे असेल तर ते पावसाळ्यातच पाहावे. मी सुद्धा भिजत - भिजत इतिहासाची कलाकृती पाहू लागलो. वर किल्ल्यावर शिवकुंज दिसतो तसेच मुस्लीम बांधवांचा पीर सुद्धा. 

तेथून पुढे गेल्यानंतर लागत ते मा जिजाऊरत्न छत्रपती शिवरायांचे पवित्र जन्मस्थळ अजूनही जोमाने उभे आहे. बाजूला आहे ते काही वाड्यांचे अवशेष ह्या अवशेषांचे बद्दल सरकारने इतिहास संशोधकांचे मदतीने बांधकाम करण्यास काही हरकत नाही. 

Shivneri fort trek blog

Shivneri fort trekking blog


तेथील स्वच्छतेबद्दल ट्रेकिंग करणाऱ्या लोकांचे आभार मानावे वाटतात. अशीच काळजी घेतली तर आपली पुढील पिढीसुद्धा मराठा इतिहासाचे साक्षीदार पाहू शकतील.
 राहाण्याची व पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे.

 
 
पाहूनी जीजाऊच्या छाव्याच्या अद्भुत लीला
हर्षाने नाचला असेल शिवनेरी किल्ला

Shivneri fort trek blog

Shivneri fort trek blog

TAgs - Shivneri trek, shivneri trek time, shivneri trek blog, shivneri fort trek, shivneri fort trekking, shivneri trek difficulty level, shivneri fort trek difficulty level, shivneri fort trek time

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने