Tibetan flags meaning in marathi तिबेटी झेंड्यांचा अर्थ

पंचशील ध्वज तिबेटी झेंडा लडाख झेंडे बुद्ध ध्वज

Tibetan prayer flags meaning in marathi 


मंडळी तिबेटीयन झेंडे bike वर का लावतात,  meaning of Tibetan flags on bikes - Buddha flag, ladakh flags - Budha flag on bike in marathi तिबेटी झेंडे ह्या सर्वांचा यांचा अर्थ आपण पाहणार आहोत.

Tibetan prayer flags on bike 


आपण फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच लडाखला, सिक्कीम, अरुणाचल बाजूकडे गेलेल्या आपल्या मित्राच्या मोटारसायकलवर ladakh flags on bike गाडीमध्ये लावलेले पट्ट्या पट्ट्यांचे विविध रंगी झेंडे पाहतो, ते का लावत असतील बर ? शायनिंग मारायला की अजून काही ? त्याचे महत्व काय ? जेवढी माहिती मिळाली ती ह्या लेखात देत आहे, काही त्रुटी असतील तर नक्की सांगा...
Tibetan prayer flags meaning in marathi
Tibetan prayer flags meaning in marathi 

Ladakh bike flags meaning in marathi 


ह्या Tibetan flags चा  प्रथम वापर गौतम बुद्ध यांनी केल्याचे म्हंटले जाते, या पाच रंगाच्या फिती असलेल्या झेंड्यास प्रार्थना झेंडे किंवा डार चो असे म्हंटले जाते,  “डार” म्हणजे संपत्ती, संपत्ती यामध्ये आले शरीर, बुद्धी, ज्ञान ई. यांचा समावेश होतो तर  “चो” याचा अर्थ प्राणी संवेदनशील प्राणी.

Tibetan prayer bike flags मध्ये पाच वेगवेगळे रंग असतात व तेच साखळी पध्दतीने एकामागून एक पुन्हा पुन्हा येतात. Tibetan flags वरील निळा झेंडा पवन घटकांसाठी जो आकाशाचे प्रतीक आहे. पांढरा झेंंडा वायूचे प्रतीक आहे,  लाल झेंडा अग्नीसाठी आहे, पिवळा पृथ्वीकरिता तर हिरवा रंग पाण्याचे, निसर्गाचे प्रतीक आहे. तसेच Tibetan flags वरील हे पाच रंग वेगवेगळ्या दिशा सुद्धा दाखवतात जस की उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि केंद्र...

हे Tibetan flags म्हणजेच budha flags, ladakh bike flags झेंडे साधारण तिबेटचे नवीन वर्ष सुरू होते त्यावेळेस जुन्या झेंड्याच्या बाजूला अथवा त्यांच्या जागी दरवर्षी नवीन Tibetan flags झेंडे लावले जातात किंवा कोणाचे लग्न असेल, त्यांचे सण असतील त्यावेळेस हे आवर्जून लावले जातात. 

तिबेटच्या संस्कृतीनुसार हे Tibetan flags , budha flag's, ladakh flags झेंडे ठराविक दिवसांना उभारले जातात तर आपण चुकीच्या दिवशी हे उभारले तर एक प्रकारे अपशकुन असून आपल्याला यश प्राप्ती न मिळता अपयशाला सामोरे जावे लागेल असा त्यांचा समज आहे. 

Tibetan flags झेंडे जसे जसे अस्पष्ट होत जातील तशी आपली प्रार्थना सफल होत आहे असं समजावे, सरतेशेवटी हे झेंडे अपवित्र होवू नये कोठेही चुकीच्या जागी वापर होऊ नये, कारण त्यावरील मंत्र, शब्द हे पवित्र आहेत म्हणून त्यांना जाळले जातात,

त्यांच्या जागा नवीन Tibetan flags झेंडे घेतात. हा ध्वज जमिनीवर ठेवू नये जर जमिनीवर ठेवला तर त्यास अपशकुन मानले जाते म्हणून ते आपणास नेहमी हवेत फडकताना दिसतात जमिनीवर नाही.

Tibetan flags om mani padme hum  mantras meaning in marathi

ह्या Tibetan flags वर पाच रंगाच्या झेंड्यावर एक मंत्र लिहिला जातो तो म्हणजे  'ओम मणि पद्मे हम'  om mani pad me hum हा तिबेटी लिपीमध्ये 6 अक्षरांचा मंत्र ह्या मंत्रामध्ये बुद्धांची शिकवण आहे सर्व सार आहे असे तिबेटचे लोक मानतात, या मंत्राचा अर्थ आता पाहू- 

ओम चा अर्थ ओम म्हणजे universe सर्व जग यामध्ये सामावले आहे.

मणि यामध्ये म याचा अर्थ आपण स्वतः, मी पणा दूर करणे, अहं वृत्तीपासून परावृत्त होणे.

णि चा अर्थ वासना पासून मुक्ति

पद्मे म्हणजे "कमळ" ते शहाणपण दर्शवते

हम म्हणजे "आत्मज्ञानाचा आत्मा, द्वेषापासून मुक्ती होय.

ह्या मंत्राचा नियमित जपाचे खूप फायदे आहेत, दररोज जर ठराविक जप केले तर आपल्या सात पिढ्याना त्याचा फायदा होऊन आपण लहान प्राणी वर्गात जन्म घेत नाही, तसेच आपल्यातील नकारात्मक वृत्तीचा लोप होतो, आपल्याला स्पर्श करणाऱ्या वस्तू पावन होतात अशी समज तिबेटीयन लोकांची आहे.

हे प्रार्थनेचे झेंडे - Tibetan flags एका जागी थांबू नयेत ते स्थिर होवू नयेत म्हणून जिथे हवा जास्त प्रमाणात खेळती राहील अशा ठिकाणी उंचावर बांधलेले असतात जेणेकरून हे ध्वज नेहमी वाऱ्यावर झुलत राहतील. 

या Tibetan flags ध्वजावरील मंत्रामुळे ज्यामध्ये बुद्धांची शिकवणी आहे, यामुळे एक चांगली शक्ती, सकारात्मक ऊर्जा, निरोगी, निर्मळ वातावरण त्या ठिकाणी तयार होते व ते वाऱ्याच्या लहरीसोबत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाता जाता शक्तिशाली कंप तयार करतात

यामुळे सर्व वातावरण, परिसर शुद्ध होऊन योग्य वेळी पाऊस पडावा, पशु प्राणी यांना कोणतीही नैसर्गिक इजा होऊ नये, पिके, फळांची वाढ योग्य व्हावी, दुष्काळ पडू नये, युद्ध होऊ नये असे कित्येक कारणासाठी याचे महत्व आहे.© शैलेश कदम
#ultimate
#जिन्दगी_नाही_भेटणार_दोबारा
#गावाकडचा_आशिक

Ladakh bike flags meaning in marathi
Ladakh bike flags meaning in marathi 

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने