उनाड मराठी कविता - unad

उनाड - unad

सादर करीत एक उनाड - unad मराठी कविता, ज्यांना मनसोक्तपणे, मनमोकळेपणाने जगावे वाटते, जो सैरभैर, नेहमी स्वप्नांचा पाठलाग करतो तो उनाड - unad

उनाड

झग मग झग मग दुनिया माझी दिशान मजला ठाव कोणती

या दुनियेचा मिच शिपाई या दुनियेचा राजाही

वाटेल तिकडे भटकत राहतो मलाच मी शोधत राहतो

कधी पावसात चिंब न्हातो कधी भर उन्हात उगाच बसतो

दिसता झुळुक मुखड़ा पाहतो नजर चमकता वळुन बघतो

ओळखी पाळखीचा नाच पाहतो अनोळख्यामध्ये नाचत राहतो

मनी ठाय ते करु वाटते बंधन मझला छळू पाहते

भांडण कसले ठाव मलाना मिच दुस-याची जुम्पून देतो

पैस्या आडक्याचा हव्यास मला ना मि तर जगतो हवे वरती

जात-पातीचा उगा ढिंढोरा उनाड माझा धर्म मानतो

- उनाड 

©शैलेश कदम

उनाड - Unad

उनाड

तर नक्की सांगा कशी वाटली उनाड मराठी कविता तसेच आवर्जून वाचावे अस काही 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने