Facebook SDK

उसेन बोल्ट मराठी माहिती

usain bolt marathi mahiti

जाणून घेऊन उसेन बोल्ट बद्दल माहिती नसलेली मराठी मध्ये माहिती. usain bolt all information in marathi usain bolt marathi mahiti

usain bolt marathi mahiti
usain bolt marathi mahiti 

Usain bolt all information in marathi

वेस्ट इंडिज मधील एक प्रसिध्द बेट म्हणजे जमैका, या देशास आपण विस्फोटक फलंदाज क्रिस गेल व वेगवान गोलंदाज कोर्टनी वोल्स यांच्यामुळे ओळखतो परंतू जमैकास खरी ओळख प्राप्त झाली ती म्हणजे वेगाचा बादशाह विक्रमादित्य उसैन बोल्टमुळे.

जमैकाची राजधानी किंगस्टन पासून साडे तीन तासाच्या अंतरावर असलेल्या शेरवूड कांटेट या गावात 21 ऑगस्ट 1986 रोजी उसैनचा जन्म एका सर्वसाधारण बोल्ट कुटुंबात झाला वडील वेलेसली व माता जेनिफर हे किराणा मालाचे दुकान चालवून उदरनिर्वाह करीत होते, गावात ना वीज ना धड पिण्याच्या पाण्याची योग्य सोय तरी काहीएक तक्रार न करता ते आनंदाने राहत होते.


उसैनला शिक्षणासाठी गावातील सरकारी शाळेत दाखल करण्यात आले, 12 वर्षाचा उसैन प्रामाणिकपणे शाळेमध्ये जावू लागला एकेदिवशी दुपारची सुट्टी झाल्यावर त्याला त्याचा जेवणाचा डबा घरी विसरल्याचे समजले, 

पोटात अक्षरशः कावळ्यांनी आहाकार माजवला होता, काय करावे काय सुचत नव्हते बाजूला बसलेल्या शिक्षकांनी हे पाहिले व त्याला एक अट घातली "तू जर समोर जेवण करीत असलेल्या शाळेतील वेगवान धावपटू विध्यार्थ्यास 100 मीटर शर्यतीत हरवले तर माझा डबा मी तुला देईल" मंग काय ह्या अटीतटीच्या सामन्यात उसैन प्रतिस्पर्धी मुलावर भारी पडला न जाणता उसैनची सोनेरी मुहूर्तमेढ इथेच रोवली गेली असावी.

उसैन त्याचा लहान भाऊ सदीकि याच्या सोबत फुटबॉल व क्रिकेट खेळत असे बाकी खेळांपेक्षा तो क्रिकेट मध्ये जास्त रमू लागला, तो वेगवान गतीने गोलंदाजी करत असे नेहमीप्रमाणे तो क्रिकेट खेळत असताना त्याची स्फूर्ती व वेग पाहून त्याच्या प्रशिक्षकानी त्यास फक्त धावण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. 

Bike वर रंगीबेरंगी झेंडे का असतात

त्याप्रमाणे त्याने स्वतःला धावण्याकडे जोखून दिले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेनंतर तो दुसऱ्या शाळेत गेला त्यावेळी त्याचे वय वर्ष 15 असताना त्याची उंची 6 फूट 5 इंच एवढी होती. 

अश्यातच ऑलिम्पिक एथिलीथ- मॅकलिन त्याचा प्रशिक्षक बनला व त्याचे खडतर प्रशिक्षण सुरू झाले दररोजचे 12-12 तास सराव चालायचा. 2002 साली जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत world record करीत त्याने सुवर्ण पदक पटकावले.

 जमैका मध्ये उसैन बोल्ट नावाच वादळ गल्ली बोळात गोंगावू लागले, तो वृत्तपत्र, प्रसारवाहिनी वरती प्रसिद्धीझोतात येवू लागला, आता उसैन निवांत झाला होता, आपल्या वेगाला तोड नाही, अशी हवा डोक्यात गुसायला सुरुवात झाली होती. 


usain bolt mahiti in marathi 


हाच तो काळ जिथे उसैन बोल्ट काय तर इतर कोणीही मनुष्य आपण यशोशिखरावर असताना जमिनीचे सुद्धा अस्तित्व विसरून जातो. अशावेळी नियती आपणास सांभाळण्याची संधी वेळोवेळी देत असते तदनंतरही आपण सावरलो नाही तर आपल्या कार्यकिर्दीचा शेवट हा अटळ असतो, पराभवातून सहजासहजी बाहेर पडता येते पण यशातुन बाहेर पडणे अवघड असते.

अगदी तसच झाले 2004 साली अथेन्स ऑलिम्पिक मध्ये जमैकाच्या राष्ट्रीय संघात उसैनचा समावेश झाला 200 मीटरच्या पात्रता फेरीत झालेल्या पराभवामुळे उसैनला नैराश्याने ग्रासले त्याला स्वतःची चूक समजायला लागली, शारीरिक क्षमता असून उपयोगाचे नाही त्यासाठी प्रचंड मेहनत हवीच, पार्टी, मौजमजा यापासून तो दूर राहू लागला, यातून तो कसाबसा सावरला अखेर त्याला त्याच्यामधील जुना उसैन पुन्हा सापडला.


2004 च्या पराभवानंतर उसैनने परत मागे वळून पाहिले नाही त्याचे नावे अनेक विक्रम प्रस्थापित झाले लागोपाठच्या 3 ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण , 100 मीटर मध्ये 9.58 व 200 मीटरमध्ये 19.19 सेकंदाची वेळ त्याने स्वतःचेच रेकॉर्ड तोडून नव्याने प्रस्थापित केले, तो पृथ्वी वरील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ओळखू जाऊ लागला 

व त्याची विजयानंतरची Signature victory pose लहान-थोरांत प्रसिध्द झाली, अगदी ओबामा सुद्धा त्याची नक्कल करण्याचा मोह आवरू शकले नाहीत, त्याचे रेकॉर्ड ब्रेक video इंटरनेटवर आहाकार माजवू लागले. आज जर मी धावपटू नसतो तर वेस्ट इंडिज संघात एक जलदगती गोलंदाज असतो असे उसैन आवर्जून सांगतो.

Faster than Lightning अश्या उसैनने गेल्या आठवड्यात आपल्या शेवटच्या 100 मीटर स्पर्धेत सहभाग घेतला, या स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनला आपण बोल्टला मागे टाकले यावर विश्वास बसत नव्हता ते ही फक्त 3 मायक्रो सेकंदानी त्याने त्याचा आनंद काही सेकंद जोरात आक्रोश करून साजरा केला


पत्नीला नेमके काय हवय हेच आपल्याला समजत नाही


तो त्याचा हक्कच होता कारण त्याने जगजेत्यास पराजित केले होते परंतू तो लगेच सावरला त्याने प्रेक्षकांकडे पाहून तोंडावर बोट ठेवले (कदाचित शांत रहा असा सल्ला दिला असावा) तो धावत उसैन बोल्ट पुढे जावून खाली बसून व त्यास मानवंदना दिली हे कृत्य पाहून संपूर्ण स्टेडियम भारावून गेले होते

या स्पर्धेत उसैनला 3 मायक्रो सेकंदासाठी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उसैनची शेवटची शर्यत 100×4 रिले होती, त्याला निरोप देण्यासाठी त्याचे जगभरातून भरपूर चाहते आले होते, स्पर्धा सुरू झाली जमैकाचे 3 खेळाडू 300 मीटरचे अंतर पूर्ण करून पास उसैन कडे दिला.


Usain bolt information in marathi


 त्याने साजेशी अशी सुरुवात केली परंतू पायास अचानक सुरू झालेल्या वेदनेमुळे तो मैदानावरती असह्य होवून झाला हे पाहून काहीवेळ का होईना स्टेडीयम मधील प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला उसैनचाच नाहीतर क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनचा सुद्धा शेवट अश्याच प्रकारेच निराशाजनक झाला होता.

असो असे असले तरी उसैन खऱ्या आयुष्यात करोडो लोकांच्या मनावर अधीराज्य गाजवणारा वेगाचा अनभिषिक्त सम्राट होता. उसैन बोल्टने जमैकामध्ये अनेक ठिकाणी अपंग लोकांसाठी समाजसेवी संस्था स्थापन केल्या. 2008 साली चीनमधील सिचुआन प्रांतात भुंकप झाला तेव्हा तेथील पीडित लहान मुलांसाठी 50000 डॉलर दान केले, आता तो शारीरिक क्षमतेचा कौल मान्य करून निवृत्त झाला आहे, तरी त्यास त्याच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा.

उसैन बोल्ट मुलाखतीत सांगतो, मी लहान असले पासून मला एक सवय जडली होती शर्यत चालू असताना अंतिम रेषेजवळ आल्यानंतर मागे वळून पाहायची, मी ह्यापेक्षाही चांगली वेळ नोंदवू शकलो असतो हे मला माहिती होत परंतू मी विक्रमासाठी कधीच धावायचो नाही जर असे केले असते तर प्रत्येक स्पर्धेत लोकांची माझ्याकडून विक्रम करण्याबद्दलची अपेक्षा वाढली असती व माझ्यावरील दडपण वाढले असते.

 मला दडपणाखाली राहणे कधीही आवडत नाही मात्र माझे अंतिम ध्येय जिंकणे हेच असायचे त्यासाठीच मी मैदानात उतरायचो, एक गोष्ट तो आवर्जून सांगतो तुम्हाला जर उत्कृष्ट बनायचे असेल तर तुम्ही तुमच्या पराभवाला महत्व द्या कारण पराभव झाल्यानंतरची जी वेळ असते तीच वेळ आपल्याला बिघडवते किंवा घडवते व भविष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देते. ही वाईट वेळ आपल्याला आपल्यातील क्षमतेची व ताकदीची जाणीव करून देते.

© शैलेश कदम

जाणून घेऊन उसेन बोल्ट बद्दल माहिती नसलेली मराठी मध्ये माहिती. usain bolt all information in marathi usain bolt marathi mahiti

शिवाजी महाराज आणि सध्याची परिस्थिती

Post a Comment

Previous Post Next Post