marathi stories read online - गावाकडच्या गोष्टी

 marathi stories read online - गावाकडच्या गोष्टी

मराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा marathi Katha, marathi Kadambari , marathi story , marathi Stories , marathi goshti, prem katha, rahasya katha, gudh katha, marathi stories read online, Pratilipi marathi story, Divya marathi 


Divya marathi story - जीवाची जत्रा

आमच्या घरासमोरच गावातील ग्रामदेवता असलेल्या महांकाळबाबाचे मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता त्यामुळे तो नेहमी गजबजलेला असायचा, त्यात रविवार म्हंटल की, मराठी शाळेला सुट्टी असल्याने आमचा आरामशीर उठण्याचा वार !  

7 वाजताच काळ्या सावळ्या इवल्या tv वर, नये और पुराणे रंगो की होली येहे fair and lovely रंगोली म्हणत हेमा मालिनी सुरू झालेली असायची,


माझ्या आईने पहाटेच्या देवपूजेनंतर दरवाजा लवकरच उघडून ठेवलेला असायचा, त्यात उबदार गोधडीवर अजून रोहिड्यावरून उगवू पाहणाऱ्या सुर्यदेवाच्या मायेचा भर. 

कृष्णमालिका सुरू होण्याच्या काही वेळ अगोदरच कानावर गावकऱ्यांची कुजबुज सुरू व्हायची  आणि  रस्त्यावरून त्यात घराजवळून जाणारे गावकरी कधी गप्प जात्यात व्हय ?  त्यात आमचे बबन भाऊ, नथुबाबा पवार, शंकर अण्णा सप्रे असतील, मंदिरात दर्शन करण्यासाठी जाताना माझ्या वडिलांना " अय बुवा चल म्हणत हाक मारणार  !  


वडील त्यांच्या सोबत मंदिराकडे निघत असताना ही वरिष्ठ मंडळी परत एकदा  - आर उठा पोरांनो झोपलाय का अजून, उठता काय नाय,  पाणी तापल की पार, म्हणत मंदिराकडे निघून जातात !!!  खरच असल्या प्रेमाला, गावापणाला, जिवाभावाच्या आपुलकीला आकाश ठेंगणे वाटते राव ! शहरामध्ये अश्या माणुसकीला आम्ही मुकलोय.


परत एकदा ह्याच गावात, जिवाभावाच्या माणसात, त्याच रायरेश्वराच्या कुशीत, नागेश्वराच्या सानिध्यात, रोहिडा - केंजळगडाच्या वाटेत शतदा जन्म मिळाला तरी जगण्याचा महोत्सव होऊन जाईल.


कारण रविवार म्हणजे महंकाळेश्वराचा वार ! म्हणजे गावातील आडा-वाडीची लोक दर्शनासाठी पहाटे पहाटे गर्दी करतात व नारळाचा प्रसाद चढवतात आणि ही परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे.

 

marathi stories read online - गावाकडच्या गोष्टी
Pratilipi marathi

आमच्या रोहिडा खोऱ्यातील गावाकडच्या रविवारची किंमत शहरातील तुमच्या weekly off ला कशी येईल शेठ !  आमचा आजा पंजा म्हणजे तीन महिने भात शेती इतर महिने तलवार हाती घेऊन कधी काळी शिबवाच्या फौजेत दुष्मनाच्या मानगुटीवर बसून त्याच रगात पिलेला माणूस !  सध्या टिकाव, फावडे, कुऱ्हाड, कोयत्या, विळ्यासोबत हाताला घट्टे पडेपर्यंत शेतात राबणारा, 


गुरा - ढोरांसोबत अगदी डुईचीवाडीच्या पायथ्याशी, ठकू - मकू, आसऱ्याच्या खिंडीत वाघजाईपर्यन्त भरीव पोटऱ्यानी न थकता, न थांबता जाणारा, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी बोलक्या, पाणीदार डोळ्याने " कष्ट करा व भरपूर जगा लेक हो"  असा आयुष्याचा सार सांगणारा, चिखलाने रंग धरलेली कोपरी आणि धोतर नेसलेला गावचा फिट न फाट म्हातारा.


आणि शहरातील टाय - बुटात लिफ्ट मधून उतरून , AC ऑफिसात काम करणारा, night pant टी शर्ट घालून बंद जिमच्या दुनियेत पोट कमी करण्यासाठी पळणारा हा आहे आमच्या मते आइतवार आणि weekly off मधील किंवा गावपण व शहरपण यातील काय तो फरक.


बाहेरील कुजबुजीने झोपेच अगोदरच रंगोली झाली तरी, घरासमोरून जाणाऱ्या मेंढीचा आवाज, भांड्याचा आवाज तसेच लहान मुलांचा आवाज आल्यास मन प्रसन्न व्हायचे.

घरासमोर अशी गर्दी जाताना दिसली की समजायचे आज देवाला बकरे आहे म्हणजेच देवाची जत्रा आहे, कोणाचा तरी नवस पूर्ण झाला, नावरस जन्माला आला, किंवा वर्षो वर्षिची परंपरा म्हणून सुधा खंड न पड़ता दरवर्षी ही जत्रा भरते. 


हयाच विचारात मस्तपैकी आमच्या आण्णांच्या दुकानातून रुपयाला चार अशी 5 रुपयांची बटर आणून दाबून खायची आणि मंदिराकडे जाऊन अंदाज घ्यायचा.  ताजुद्दीन भाईंनी दोन निलगिरीच्या मधोमध एका मजबूत बांबू बांधून त्यावर उलटे लटकलेल्या बकऱ्याचे काम कुठपर्यंत वाजवले ते. मी एकटाच Sherlock Holmes नव्हतो पूर्ण खालचे आवाड ते ST STAND पर्यंत असे Sherlock होते. ज्यांना कुतुहुल होत की प्रसाद वाटप केव्हा आहे. 


मस्तपैकी मुंडी कापून देवाला प्रसाद दाखवून मुंडीचा मान, कातड्याचा मान ज्याचा असेल त्यांना त्यांच्या मान प्रसाद स्वरूपी दिला जातो. मात्र मुंडी जर कुत्र्याने अथवा जनावराने पळवून नेले तर दुसरे बकरे द्यावे लागते मंग आताचा नैवेद्य अवैध असतो तो देवाला चालत नाही . 


Marathi stories online 


तो पर्यंत जत्रा करणाऱ्या व्यक्तीने जेधेआळीतील पाण्याच्या आडाजवळ भल्या मोठ्या ताडपत्रीवर कलेजी, वजडी, फेफसा, पाया, चरबी अजून बरेच नगांचा 25, 30 असे वाटे करून ठेवलेले असतात. ज्यांनी हे गावपण जगले त्यांना हा वाटा आठवला असेल 😉,  कोणीतरी मंग जगू बुवांच्या बैलगाडीवर बसून 100 पाणी वहिवर वाटे खरेदी करण्याऱ्या लोकांची नावे टिपत असतो.

इकडे उंचच उंच निलगिरीच्या झाडाखाली विटांचा लालबुंद चर पेटलेला असतो आणि त्यावरील टोपात आळणी पाण्याचा रस्सा कढत असतो, मंग घरून वर्तमानपत्राच्या कागदात बांधून आणलेले मसाल्याचे पदार्थ टोपात टाकून रस्याला उकळ्या द्यायला सुरुवात व्हायची. त्याचसोबत शिजायचा रस्यामध्ये सुई दोऱ्याने शिवलेला देवाचा प्रसाद पण.


निसर्गाच्या शक्तीसोबत एकत्र झालेला, आळणी पाण्याचा रस्याचा वास चैतन्यपूर्ण वाऱ्यासोबत पूर्ण गावात पसरला नाही तर शपथ, जेव्हा आळणी पाणी कढायला सुरू होते, तेव्हा आम्ही लहान पोर दोन, चार भांडी एकात एक घालून मंदिरात ठाण मांडून आसुसलेल्या नजरेने जत्रा मालकाच्या हाकेची वाट पाहट बसलेलो असतो, 


ये पोरांनो बसा लवकर.... अश्या हाकेबरोबर चिलीपिली हातात बसतील तेवढी भांडी घेऊन प्रसादाचा लाभ घेण्यासाठी बसलेलो असायचो.  पण इथला नियम भारी घरातील असो नाहीतर कोणी पाव्हना सर्वांना वाटा सारखाच त्यात गल्लत नाही. सुरुवातीला आळणी पाणीवाला गरमागरम पिवळसर रस्सा वरती तेलाचा थोडा थर, खोबऱ्याचा तुकडा पसरलेले आळणी पाणी ताटात वाढून जातो, 


मनभरून आळणी रस्सा मेंदूला झिणझिण्या येईपर्यंत आणि आत्माच्या कोणत्यातरी कोपऱ्यात त्याची चव घुसत नाही तोपर्यंत हा आळणी रस्सा मनभरून वढायचा. स्वर्गसुख काय म्हणतात ते यालाच की ! न कसला लोभ न कसली आशा बस इश्वराच्या सानिध्यात इश्वराचा महाप्रसाद खायला मिळावे.


पाळीपाळीने काळीज, वजडी, मटण असे पदार्थ वाढले जायचे ( प्रमाण खूप कमी असायचे पण आपली काही तक्रार नाही ) त्यानंतर निलगिरीखाली मुरलेला गरमागरम भात यह ! कामच तमाम ना जिगर ! 


आम्ही आमच्या जवळील दोन, तीन भांडी हे प्रसाद भरून हात भाजला तरी एक दोन ठिकाणी खाली उतरून पुन्हा उचलून मनातील महंकाळेश्वर प्रसन्न  🙏 करून घरचा रस्ता धरायचा.


© शैलेश कदम

#जिंदगी_नाही_भेटणार_दोबारा

#गावाकडचा_आशिक

#गोष्टी_गावाकडच्या

#जीवाची_जत्रा


हे सुद्धा वाचा - 

अपमानाचा बदला कसा घ्यावा


तुम्ही आयुष्य कस जगत आहात ? 

 

Attitude असावा का नसावा
 

मराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा marathi Katha, marathi Kadambari , marathi story , marathi Stories , marathi goshti, prem katha, rahasya katha, gudh katha, marathi stories read online, Pratilipi marathi story, Divya marathi 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने