स्वप्नांचा पाठलाग motivational story in marathi

स्वप्नांचा पाठलाग swapnancha pathlag


motivational story in marathi


वाटते तेवढी सोप्पी असते का हो जिंदगी, सरळ दिसणाऱ्या रस्त्यात अचानक कोठून तरी वेडीवाकडी वळणे येतात, आपण ह्या गोष्टीसाठी तयार नसतो, 

मनाला कोणताच थांग पत्ता न लागता आपण सोप्या रस्त्याने चालता चालता अनेक संकटे पार करून अवाढव्य अश्या जंगलात फसलेलो असतो. 

आपल्याला सवय असते ती सरळ असलेल्या मार्गावर चालण्याची पण अनपेक्षित पोचलेलो अश्या ठिकाणी जेथे मदतीला स्वताखेरीज कोणी नसत. 

यावेळी आपल्याकडे असतात 3 मार्ग पहिला मार्ग मागे जाऊन तो सरळ मार्ग शोधण्याचा, दुसरा आहे तिथेच थांबून राहण्याचा व तिसरा जो होगा सो देखा जायेगा म्हणत पुढचा मार्ग काढण्याचा...

स्वप्नांचा पाठलाग मार्ग पहिला

पहिल्या मार्गाला गेलेल्याला रस्ता सोप्पा जातो कारण तो अगोदर बनलेला असतो परन्तु जाता जाता त्याच्या मनात एक उत्सुकता ताणली गेलेली असते की, मी पुढे का गेलो नाही ? 

मी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्याच्या पुढे काय असेल ? सरळ मार्ग असेल की असाच ओबडधोबड मार्ग असेल ? त्याने जेथून सुरुवात केली तिथे जाईपर्यंत त्याचे आयुष्य समाप्त होत.

स्वप्नांचा पाठलाग मार्ग दुसरा


दुसऱ्या मार्गावरच्या मनुष्याने आहे तिथेच थांबण्याचा मार्ग अवलंबला असतो, तो काही दिवस सुखात असतो मात्र नंतर तो मनुष्य हताश झालेला असतो, कारण तो विचार करतो !!! 

मला पुढे जायचच नव्हत तर मी इकडेच आलोच कश्याला ? आलो आहे तर इथेच का थांबून राहिलो ? माझ्याकडे सर्व क्षमता असताना मी प्रयत्न करायला हवा होता. 

swapnancha pathlag

swapnancha pathlag


म्हणत तो पुढे मार्गक्रमण करतो व विचार करतो पुढे जाऊन तरी काय ? हा रस्ता संपेल का ? असे म्हणत तो फक्त विचार करत तेथेच स्थित झाला व त्याचा शेवट झाला.

स्वप्नांचा पाठलाग अंतिम मार्ग

तिसरा मार्ग अवलंबलेल्या व्यक्तीने मनात विचार केला, आपले लक्ष हेच आहेकी ! ह्या सरळमार्गी दिसलेल्या रस्त्याचा शेवट करण्याचा. आता त्रास तर झालेलाच अजून थोडा होईल मागे गेलो तर आयुष्य मागे जाईपर्यंत सम्पलेले असेल, 

इथेच थांबलो तर माझ्या संकटाना लढण्याचा काय अर्थ उरेल. इथ येईपर्यंत मला असंख्य झालेल्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताने अनेक धारदार खडकावर अभिषेक घातलेले अजून ते रक्ताचे डाग खडकात मुरलेले नाही. 

तर काय उपयोग ह्या देहाचा व माझ्या अर्धवट लढाईचा म्हणत हा व्यक्ती पुढे निघते, पुढे काय होईल याची काहीएक पर्वा न करता, त्याचे मनात एकच गोष्ट होती की, माझे ध्येय मला निश्चित भेटेल अथवा नाही हे मला माहिती नाही, 

पण परत मागे किंवा हतबल होऊन रडत बसने हा माझा पिंड नाही किमान हाती अपयश आले किंवा याच प्रवासात मरण आले तरी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला हेच माझे यश आणि हाच विजय असेल म्हणत तो पुढे मार्गस्थ होतो. 

© शैलेश कदम

हे पण वाचा - 

4 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने